'सवत '

Submitted by manasibhide on 31 July, 2018 - 09:19

राजाराणीचा संसार, गोडीगुलाबीने चाले
पण संसारवेलीला, फुल एकही ना आले
साऱ्यांनाच पाहिजे गं ,वंशाचा तो एक दिवा
धनी माझा तरी कसा, अपवाद हा ठरावा .

कोणीकोणी ना त्यावेळी,माझा पाठीराखा झाला
सग्या सोयऱ्यांनी त्याचा, नवा संसार मांडला
पाठचीच बहीण ती ,आली ‘सवत’ होऊन
आशीर्वाद मागतसे, माझ्या पायाशी वाकून.

माझ्या उरी माया दाटे, परी कोणा मी लावावी
तिच्या संसाराची वेल , आता फुलावी बहरावी
जरी वांझ म्हणूनिया, माझ्या पाठी शिक्का यावा
सवतीच्या मुलांना गं, लळा माझाही लागावा .

मानसी भिडे

Group content visibility: 
Use group defaults

छान