लहान मुलांना "जात" संकल्पना कशी सांगाल?

Submitted by सिम्बा on 30 July, 2018 - 03:27

Tr निमित्त झाले मराठा मोर्चाचे.
सकाळी मुलगी शाळेसाठी तयार होत असताना vanवाल्या काकांचा मेसेज आला,
सकाळी स्कुल बसेस, vans काही ठिकाणी अडवल्या आहेत, बरोबर मुले असल्याने आंदोलकांचा सूर समजावण्याचा होता , पण संध्याकाळ पर्यंत वातावरण कसे असेल माहित नाही , त्यामुळे आज van सर्विस बंद राहील.

मग मुलीला शाळेत पाठवायचे कि नाही ? पाठवले तर परत आणायचे कसे या बद्दल आमची चर्चा चालू होती.
साहजिकच शाळा बंद का? कोण vans अडवते आहे वगैरे चौकशी मुलीने केली.
या आधी मराठा मोर्चा बद्दल तिने फोटो किंवा उडत्या बातम्या ऐकल्या होत्या ( शेजारच्या बिल्डिंग मधली अमुक तमुक मावशी मोर्च्याला एन्फिल्ड घेऊन गेली होती स्वरूपाच्या) पण त्यातले गांभीर्य तिला तेव्हा कळले नसेल
आज थेट तिच्या जगण्याशी संबंध आल्याने तिला जास्त शंका होत्या.

आरक्षण म्हणजे काय? कशासाठ? मुळात जात म्हणजे काय??हे विषय सकाळच्या घाईत सांगण्यासारखे नव्हतेच, त्यामुळे संध्याकाळी नीट सांगेन म्हणून वेळ मारून नेली.
संध्याकाळ जवळ येत आहे, आणि तिला उत्तर देणे भाग आहे.

तुम्ही तुमच्या मुलांना "'जात" हि संकल्पना कशी सांगितलीत? किंवा सांगाल.? कि तुम्हाला कधी जाणीवपूर्वक सांगावी लागली नाही.
माझ्या केस मध्ये आम्ही घरात/ मित्र परिवारात कधीही जातीचा उल्लेख केलेला नसताना तिला तिची जात, पोट जातीसकट माहित होती , हा माझ्यासाठी धक्का होता. (वय वर्षे ८-९ )
तिला धर्म संकल्पना सांगताना विशेष त्रास झाला नाही, वेगळ्या देवाची पूजा करणारे लोक, इतपत स्पष्टीकरण तिला तेव्हा (वय वर्षे ५-6) पुरेसे होते. पण एकाच देवाला पुजणारे तरीही वेगळे लोक आणि त्यात मानली जाणारी उतरंड हे तिला कसे समजवावे?

काही टिप्स असतील तर नक्की सांगा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समाजातील काही धुर्त पुर्वजांनी आपल्या गटाचे वर्चस्व पिढ्यान पिढ्या रहावे याकरता सामान्य लोकांची केलेली फसवणुक म्हणजे जात.

व्यवस्था कायम टिकावि म्हणुन केलेले काल्पनिक लिखाण म्हणजे जातिचा आधार.

सर्व हक्क स्वताकडे ठेवुन सेवा ह्या गोंडस नावाखाली वाटलेली वेठबिगारी कामे म्हणजे आरक्षण. फायद्याचे १००% स्वताच्या गटाला सेवेचे इतर गटांना.

या १००% आरक्षणाविरुध्द बंड झाले व या आरक्षणाने कायम मागास राहिलेल्या जातिंना थोडेफार आरक्षण देण्यात आले

सिम्बा, असे सोप्या प्रकारे शिकवा.

मेरीट आणि आरक्षण या मुद्द्यांचा एकत्रित विचार करणे हे देशातले बुद्धिवादी किती संभ्रमित आहेत याचे दारूण दर्शन आहे.
आरक्षण प्रतिनिधित्व आहे. त्याचा आणि मेरीटचा संबंध नाही. मेरीट हे वासरात लंगडी गाय शहाणी या प्रमाणे भारतातल्या भारतात आहे. त्यासाठी वासरे आधी अधू आणि अपंग करून ठेवली होती. शेती सोडून इतर कुठलाही व्यवसाय परंपरेने करू न शकणा-याला तू उद्योगधंदा काढू शकत नाही, तुझ्याकडे मेरीट नाही असे म्हणणे म्हणजे स्वतःकडे शहाणपणा, तार्किक विचार यांचा अभाव असल्याचे प्रदर्शन होय. आपण स्वतः किती दिवे लावले आहेत हे वर दिलेले आहे. त्यामुळे परंपरेने जे लोक बलुतेदारी आणि गावकुसा बाहेरच्या व्यवस्थेत अडकले त्यांना १०० पैकी १०० गुण का मिळत नाहीत म्हणून चिमटे काढणे हे आरक्षण असणे किती गरजेचे आहे हे सिद्ध करणारे ठरते. इतके अप्पलमोटे, अंध विचारवंत अपवादानेच इतर कुठल्या देशात जन्मत असतील म्हणूनच आपल्या देश सोडून इतर देशात सेटल व्हावे लागते आणि तिथल्या समाजव्यवस्थेचे गोडवे गावे लागतात.
प़ण तिथेही अ‍ॅफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन आहे, भारतियांसाठी अल्पसंख्याक म्हणून आरक्षण आहे हे काही आपण सांगत नाही.
देशात पहिल्या आलेल्या टीना डार्बीलाही आरक्षित कोट्यातूनच नोकरी मिळालेली आहे. तिला काही ओपन मधे घेतलेले नाही. आता तिच्यामुळे कुणाची संधी गेली ?
त्रास करून घेऊ नका जिवाला.
आरक्षण म्हणजे पाकिस्तान समजा. पाकिस्तानात तुम्हाला मिळते का अ‍ॅडमिशन ? तसेच हा कोटा राखीव आहे. त्याने तुमच्या संधी कशा काय जातात ? तुमचा ओपनचा कोटा आहे त्यात तुम्ही कमी पडलात असे म्हणा फारतर.

वरदाची पोस्ट एकदम बावनकशी वाटली. बाकी दुपारी लिहीणार. सिंबा, तुम्हाला इथे मतेच अपेक्षीत आहेत की खाजगी अनूभव पण अपेक्षीत आहेत? मी लिहीणार होते म्हणून विचारले, अर्थातच मी एकांगी लिहीणार नाहीये.

@सिम्बा : तुमचे मुलीबरोबर बोलणे झालेले आहे तरीही मी माझा सल्ला देतो. एकाच विचारसरणीचे लोक एकत्र आले , त्यांचे ग्रुप बनले जसे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये सोसायटीमध्ये ग्रुप बनतात तसे. आणि त्या ग्रुपला नावे दिली गेली ज्याला जात म्हणतात अशाप्रकारे समजावा. आरक्षणामुळेच चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळते त्यामुळे इतरांची कशी वाट लागते वैगैरे वैगैरे तिला अजिबात सांगू नका. लहान मुले मातीच्या गोळ्यासारखी असतात त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक होण्यासाठी आपण त्यांना योग्य तो आकार दिला पाहिजे. इतर गोष्टी त्यांना आपोआप कळत जातील.

तुमच्या मुलाला / मुलीला फक्त आरक्षण आणि जात एव्हढेच प्रश्न पडले का ? आणि त्यासाठी तुम्ही मायबोलीवर आलात.
मी जात सोडलेली आहे. पण आजूबाजूचे सर्वच जात मानत असतील तर माझी ओळख जातीवरून करण्याचे थांबत नाही. त्यामुळे मुलांना जात काय आहे हे सांगावेच लागते. तुम्ही सांगितले नाही याचे आश्चर्य वाटते. दोन तीन वर्षांची मुले असतील तर ठीक.

हेला, लोकशाही आहे म्हणुन दाद तरी मागता येते दलितांना.
धर्मावर आधारीत राज्य झाले तर त्यांना कोणीच वाली रहाणार नाही.

तुम्हांला मार्क चांगले नसतील तरी आरक्षणाच्या जोरावर चांगल्या कॉलेजात अ‍ॅडमिशन मिळू शकते आणि एखाद्या हुशार पण आरक्षण न मिळणार्‍या मुलाची संधी पटकवता येऊ शकते हे ही मुलांना सांगा. आज ना उद्या त्यांना कळेलच.
<<

१. मार्क अजिबात नसताना, प्रायवेट कॉलेजातल्या / अल्पसंख्यांक उर्फ नॉन आरक्षणवाल्या जैन कॉलेजातल्या अ‍ॅडमिशन्स मला ठाऊक आहेत.

२. मेरिटवर, आरक्षण नाकारून ओपन कोट्यातून अ‍ॅडमिशन घेतलेल्या मागासवर्गीय मुलांना ठरवून नापास केलेले ठाऊक आहे.

३. देवयानी खोब्रागडे चर्चाही चांगलीच लक्षात आहे.

तेव्हा हे असली शेरेबाजी युस्लेस आहे या पलिकडे तुमच्या या प्रतिसादाला काहीच उत्तर नाही. जिथे आहात, तिथे अल्पसंख्यांक असल्याने जी सिच्युएशन फेस करावी लागते आहे, त्याबद्दल जरा मनन चिंतन करत असाल, अशी आशा करतो.
***

अय्या, मी इतकी मेहनत करून फॅब्रिकेट केला आणि अरेरे, आरारा, तुम्ही लग्गेच ओळखलंत.... स्वतःवरून इतरांची परीक्षा इतकी मस्त करता ना तुम्ही. डॉक्टरी याच्यात सुद्धा केलीत का हो?
<<

जात म्हणजे फक्त वेगळी वेशभूषा/कामे/स्वयंपाकाच्या पद्धती, असे जर मुलांना सांगावे असे तुम्ही म्हणत असाल, तर
१. तुम्ही प्रचारक आहात.
३. अत्यंत naive आहात.

२. लिहित नाही. Happy

*एंटायर* संघी मिसइन्फॉर्मेशन अन इन्व्हर्स लॉजिक यात डॉक्टरी नव्हे, पीएच्डी आहे माझी.

मग घरातून जातिभेदाचे बाळकडू पाजणारे तथाकथित उच्चवर्णीय आणि दुसरीकडे लहानपणापासून आरक्षण तरतूद जाणीव करुन देणारे ह्यात नक्की फरक काय!
<<

बाळकडू पाजले जाते ते उच्चवर्णीयांकडून. कोणती वहाण कशी पायात ठेवायची, कोण शिकून वर चढू लागला, की शिष्यवृत्त्या थकवून किंवा कानात शिसे ओतून वा अंगठे कापून त्याला गाडायचा, हे शिकवून.

आरक्षण तरतूदीची जाणीव करून देणारे, बाळ, तू वहाण नाहीस, हे समजून घे. तुला अजूनही एक चान्स आहे, अन तो पहिले शिक्षणात आरक्षण म्हणून या देशाच्या सध्याच्या घटनेत आहे, असे शिकवतात.

पुढचे नोकरीतले आरक्षण, अन "बॅकलॉग" या अभ्यासाच्या गोष्टी आहेत. किमान हे सगळे ("गुलटे" कसा शब्दय ना? तसे अनेक शब्द या "कॅटॅगरी" वाल्यांना वापरतात हे मला माहीत आहे.) xxxx युरोप-जपान-अमेरिकेतही नोकर्‍या घ्यायला कसे काय पोहोचू शकतात! हा संतापही मी यऽ वेळा पाहिला आहे. जरा भारताबाहेर असलेल्या गेल्या १० वर्षांतल्या लोकांचा जातीनिहाय डेटा पहा, त्या आधीच्या १० वर्षांशी तुलना करा. मग उजेड पडेल डोक्यात कदाचित.

तेव्हा आपले बाळकडू ओकून टाकलेत तर बरे होईल. तोपर्यंत मी माझ्या मुलाबाळांना आरक्षण तरतूद समजवून सांगेन. की बाळ, तुला नसले, तरी ज्याला आहे ते का आहे.

अरे हो.

ते "कर्म" अन कर्मविपाक राहिलंच!

इथे अत्यंत गलिच्छ गालिप्रदान करण्याचा मोह होतो. मोहावरून मोहन अन जागो मोहन प्यारे आठवतात.

कर्मविपाक हा त्यांचा आवडीचा विषय.

मी अस्पृश्य आहे हे माझे 'मागच्या जन्मीचे' कर्म ही अफलातून आयडिया ज्या कुणी उच्चवर्णीयांच्या आरक्षणासाठी काढली, त्याला लय सलाम! बीएम्केजे अन वंदे मात्रम.

तेव्हा,
माझ्या भारतीय मित्रा,

तुझ्या मुलांना जात सांग.

ती काय असते अन कुठे कुठे नडते, ते कुठल्याही अन सगळ्याच काँटेक्स्ट्स मधे सांग.

Teach them free thinking,

And,
Let them identify and know the monster for exactly what it is, and in all its ugly might.

Then, and only THEN they might be able to face it.

And maybe, defeat it someday.

I'm certain, my lifetime wont last to see that day..

जात म्हणजे फक्त वेगळी वेशभूषा/कामे/स्वयंपाकाच्या पद्धती, असे जर मुलांना सांगावे असे तुम्ही म्हणत असाल, तर
१. तुम्ही प्रचारक आहात.
३. अत्यंत naive आहात. << अगदी हेच डोक्यात आले
वरदा ++१
वेळ आली तर कदाचित मी रु सारखच काहीतरी सांगेन...

माझा भाचा आहे 11 वर्षाचा .... १२ चा निकाल लागला होता आणि शेजारच्या मुलाला हव्या त्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाली नव्हती परंतु त्याच्या मित्राला जातीच्या आरक्षणामुळे ऍडमिशन मिळाली होती, त्याच्या पेक्षा कमी टक्के असून देखील. साहजिक तो मुलगा नाराज होता आणि चर्चा चालली होती यावर. तेव्हा भाच्याने विचारले हे आरक्षण म्हणजे काय आणि दादाला ऍडमिशन कशी नाही मिळाली त्याला टक्के जास्त असून देखील ... कोणाला समजले नाही त्याला काय सांगायचे ते ... तेव्हा मी सांगितले कि बाळा ज्यांना स्वतःच्या बुद्धीने काही करता येत नाही त्यांना आरक्षणाच्या कुबड्या लागतात ... हॉल मध्ये एकदम शांतता पसरली ....

हॉल मध्ये एकदम शांतता पसरली....?

............................ का? कोणी तुमच्या कानाखाली वाजवली की काय... बावळटासारखी उत्तरे दिली म्हणून?

आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावर, इतक्या casually, इंटरनेट च्या आभासी पडद्यामागून मतं / वैय्यक्तिक टीका करण्यात अर्थ नाही. आरक्षणाच्या दोन्ही बाजूंना गैरफायदा घेतलेली, पळवाटा काढलेली कैक उदाहरणं आहेत, त्यामुळे तो कोळसा इथे उगाळायची गरज नाही. कुणी कायदेपंडित, समाजशास्त्रज्ञ वगैरे असल्यास त्यांचा अभ्यास काय सांगतो ते वाचायला आवडेल.

आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावर, इतक्या casually, इंटरनेट च्या आभासी पडद्यामागून मतं / वैय्यक्तिक टीका करण्यात अर्थ नाही. आरक्षणाच्या दोन्ही बाजूंना गैरफायदा घेतलेली, पळवाटा काढलेली कैक उदाहरणं आहेत, >> परफेक्ट बोललास.

हॉल मध्ये एकदम शांतता पसरली....?
............................ का? कोणी तुमच्या कानाखाली वाजवली की काय... बावळटासारखी उत्तरे दिली म्हणून?+११११

आ रा रा न्च्या पोस्ट्स वाचून त्यान्चा आयडी वाचल्यासारखे वाटल्र.
किती विखार!
ब्राह्मणाना शिव्या घालता, इतिहासातली उ दाहरण घेऊन. वर्तमानातली उदाहरण घ्या ना.
कर्म्विपाक - पुढचा ज न्म वगैरे सोडून द्या. सतत चा विखार बाळगून तुमच्त्माआत फक्त तेच शिल्लक रहणार/ राहिलय असे वाटले.
डिस्गस्टिन्ग!

आअरारा - तुम्ही ज्या गोष्टी च्या विरोधात इतक हिरिरीन, खालच्या पातळीला जाऊन बोलता आहात, ते तुम्ही स्वतःब द्दलच बोलता आहात हे लक्षात येतय का?
तुम्ही मुलाना डिस्क्रिमिनेशन ला सा मोर जाव लागेल म्हणून सान्गताना, एका आख्ख्या वर्गाला एकाच तराजूत तोलुन अतिशय घाण लिहून स्वत:च डिस्क्रिमि नेट करताय. मुलाला हे ही सान्गा. ते लोक सेम तुमच्यासारखे आहेत म्हणून.

कुठल्या जातीत जन्म घ्यायचा हे जसे तुम्ही ठरवले नाहीत, तसेच मी ही नाही, इथ ल्या कोणत्याच आयडीने नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी कुणाशीही डिस्क्रिमीनेशनने वागलेली नाही. लहान मु ले आपल्यावर अवलम्बून असतात, तेव्हा त्याना न कळत हवे तसे वागवणारे लोक अस तात, तिथे ही कधी मालकी हक्काने वागत नाही.

नानबा. जर तुम्ही डिस्क्रिमिनेट करत नसाल, तर आरारांनी लिहिलेलं अंगाला लावून घ्यायचं कारण नाही.
आजही मेधा खोलेंसरख्या व्यक्ती आहेत, आरक्षणामुळेच आम्ही देश सोडून गेलो किंवा आमच्या शिक्षकांनीच आम्हांला तसं सुचवलं, असं म्हणणारे लोक आहेत.
आरक्षण घेणारे = लायकी नसताना जागा अडवणारे अशा अर्थाचं वचन आत्त्तच वाचलंय.
हे तुम्ही नाकारणार आहात का?
तुम्ही करत नाही, म्हणून कुणाला भेदभाव सहन करावाच लागत नाही, असा तुमचा समज्/दावा आहे का?
जातिद्वेष आजकाल सगळ्यांनाच सहन करावा लागतोय, तो उघड होण्याचं प्रमाण वाढलंय, हाच काय तो फरक पडलाय.

>>तो उघड होण्याचं प्रमाण वाढलंय

आँ?? दलितांना आत्ताच नाही तर अनादी कालापासुन उघडा नागडा जातिद्वेष सहन करावा लागतोय

आंतरजालावर एका चर्चेच्या धाग्यावर संसदीय भाषेत केलेल्या कमेंटला जातिद्वेष सहन करावा लागणं म्हणत असाल तर कठीण आहे.

व्यत्यय, ते प्रत्यक्ष जगाबद्दल आहे.
आधी काहींनाच अनुभव येत असे, आता सगळ्यांना येतो असं म्हणायचंय.

मला एका गोष्टीची खुप गम्मत वाटते,
सो कॉल्ड एस सी, एसटी, ओबिसी आणि ईतर आरक्षण मागणार्या लोकांना त्यांच्या जातीमुळे मिळणारे सर्व फायदे हवे असतात, सर्व प्रकारची आरक्षणे हवी असतात पण जर का कुणी चुकुन त्यांना त्यांची जात विचारली तर ते भडकतात, तो त्यांना त्यांचा अपमान वाटतो.

या बद्दल मला कुणाला दुखवायचे नाहीये, पण जो विरोधाभास दिसतो तोच फक्त वर मांडलाय.

एक गोष्ट मात्र खरी आहे, कितीतरी हुशार मुलांच्या संधी खाल्या जातात या आरक्षणामुळे.

फेरफटका ह्यांनी मायबोलीवर दिलेल्या प्रतिसादाशी सहमत
=========

२०१८ मध्ये 'मोठ्या माणसांना' जात कशी सांगाल / शिकवाल हा धागा काढण्याआधीच धागाकर्त्याने घाईघाईने लहान मुलांवरचा हा धागा प्रकाशित करून टाकला

बेसिक नॉलेज फार आवश्यक असते

एकांगी दृष्टिकोन ठेवणारे तीस पस्तीस वर्षे त्या अंमलात जगू शकतात

ज्यांनी सहन केले त्यांना बहकवले जाते आणि ज्यांनी राज्यच केले ते सत्तेसाठी हपापलेले असतात

ज्यांनी बेकार वागणूक दिली ते मेले तरी किंवा अल्पसंख्याक तरी आहेत, पण जे काहीच मानत नाहीत त्यांच्यावर कुऱ्हाड कशी कोसळेल ह्यासाठी इथल्यांसारखे काही लोक प्रयत्नरत आहेत

मायबोलीवरील ' राजकारण - भारतात' हा समूह संतुलित राहिलेला नसून एकांगी झाला आहे

शिवाय, इथे 'भिक्कारचोट' सारखे शब्द अनाकलनीय कारणांनी स्वीकारार्हही झालेले दिसत आहेत

मी आपला कोणाच्याही गळ्यात गळा घालून कोणालाही मदत करत राहतो

नंतर इथे आल्यावर कळते

बहुधा आपण चुकलोच

Pages