तुमच्याकडे कोणती फालतू सुपरपॉवर आहे??

Submitted by कटप्पा on 27 July, 2018 - 15:26

आहे का तुमच्याकडे एखादी सुपेरपॉवर जी फक्त तुम्हाला माहीत आहे? अशी फालतू पॉवर की जी तुम्हाला सुपरहिरो चा दर्जा देऊ शकत नाही पण वेगळी आहे ?

आता माझे बघा - मी कधी हवे तेंव्हा झोपू शकतो. अगदी ढोल ताशे वाजत असतील तरी मी ठरवले झोपायचे समजा तर मी पाच मिनिटात झोपू शकतो. दुपारी जेवून, संध्याकाळी 7 पर्यंत झोपून परत 1 तास डिनर करून परत झोपू शकतो. आहे ना फालतू पॉवर?

माझा रूममेट - त्याच्याकडे एक युनिक पॉवर आहे. त्याला झुरळांचा वास येतो. रूम मध्ये झुरळ असेल त्याला वास येतो आणि तो सांगतो पण कोणत्या बाजूने येतोय.

आणखी एक गोष्ट तो करतो- एकाच दिवसात तो 2 पाउंड वजन कमी किंवा जास्त करून दाखवतो ( टॉयलेट ला न जाता)

तुमच्याकडे कोणती फालतू सुपरपॉवर आहे?????

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बायका दूध तापायला ठेवतात आणि (मल्टीटास्किंगमुळे) इकडे तिकडे बिझी होतात. दूध उतू जायचा आवाज येऊन धावत पळत येईपर्यंत अर्धं तरी जातं. मी लहान असताना आईने दूध तापायला ठेवलं आणि ती तिथे नसेल तर उतू जायच्या क्षणाला तिथे आपोआप पोहोचत असे. पाणी प्यायला असेल किंवा अन्य काही निमित्ताने. हे नेहमीच व्हायचे. लग्नानंतर बायकोला पण माझा हा अनुभव आला आहे. फक्त हेच दोन अनुभव नाही.
इतरही ठिकाणी बायकांना माझा हा अनुभव आला आहे. याला फालतू सुपरपावर म्हणता येईल का ?
( मला दूध तापायला ठेवलेलं आहे याची माहिती नसताना असे घडते )

आता मी उजव्या हाताने जेवतोय, आणि डाव्या हाताने समोरच्या लॅपटॉपवर टाईप करतोय - सुपरपॉवर?

बिलकुल नाही, हे मलाही जमतंं!!!

(फक्त laptop ऐवजी desktop असतो समोर!)

बिलकुल नाही, हे मलाही जमतंं!!!
>>>
बरं मग उजव्या हाताने दांडा पकडून आमची मुंबई लोकलला लटकलो आहे, डाव्या हाताचा अंगठा मोबाईलवर झरझर टाईप करतोय. मी माबोवर एक धागाही काढलाय अश्या स्थितीत. सुपरपॉवर ?

हे बहुतेक सर्वांच्या बाबतीत होते. याचे काय मेकानिजम आहे शोधायला पाहिजे
Submitted by टवणे सर on 30 July, 2018 - 20:06
>>>

बहुतेक हे सर्वांशी नाही होत. माझ्याशी तरी नाही. याउलट मी वाचलेलेच पुन्हा वाचतो आणि मग वाचल्यासारखे जाणवते आणि पुढे पुढे जातो, कित्येकदा कितीतरी पाने वाचलेली असतात. काहीवेळाने वाटते अरे हे वाचले नव्हते, ईथून सुरुवात करूया, आणि थोड्यावेळाने पुन्हा वाचलेले ओळखीचे वाटते.. वेस्ट ऑफ टाईम Happy

मी दिवसभर कोणाशीही न बोलता राहू शकतो.जेव्हा मिसेसचा पाठिंबा असेल तेव्हा असा कितीही दिवस राहू शकतो...,,,!!!

<मी एखादे पुस्तक किंवा कादंबरी एका दमात वाचू शकते तहान भुक झोप विसरून>
हॅरी पॉटर मालेतली शेवटची ३ पुस्तकं किंवा तुंबाडचे खोत? (पटकन आठवलेली नावं.)
पॉटरचं पारायण करतानासुद्धा पुस्तक संपेपर्यंत रात्रीचे २-३ वाजवलेत. पण तहान भूक नाही विसरता आली Happy

तुंबाडचे खोत>> हो हे पुस्तक मीही भयानक झपाटल्यासारखं वाचलं होतं.
>>>
सेम पिंच. खंड2 असा झपाटल्या सारखा वाचला होता.

मी माझ्या दोन्ही नाकपुड्या आणि कान पाळया हलवू शकतो. दोन्ही भुवया एकावेळी एक अशा उडवू शकतो आणि हे सर्व एकाच वेळी ही करू शकतो.

बरं मग उजव्या हाताने दांडा पकडून आमची मुंबई लोकलला लटकलो आहे, डाव्या हाताचा अंगठा मोबाईलवर झरझर टाईप करतोय. मी माबोवर एक धागाही काढलाय अश्या स्थितीत. सुपरपॉवर ?

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 July, 2018 - 21:35>>>

जादा शहाणपणा

Pages