दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत धोकादायक घाट आहे हा. हजारो फूट खोल दरी धडकी भरवते. या दिवसात तर धुक्याने भरलेली मृत्युदरीच जणू. अक्षरशः जीव मुठीत घेऊन ड्रायविंग करावे लागते. दुर्दैवी जीव बिचारे. Sad RIP

फक्त एकजण वाचला त्याची मुलाखत बघितली मगाशी. या परिस्थिततही मी दोर टाकले म्हणून हा एकतरी वाचला असे एक माणूस खोटे सांगत आहे, शौर्यपदक मिळावे म्हणून ही सगळी यातायात. जो वाचला त्याने सांगितले की मी एका झाडाला लटकलो आणि माझा मीच वर आलो, ज्याने मला हात दिला त्याचे नाव आणि नंबर मी घेतला आहे, दोर वगैरे कुणी टाकले नव्हते. हे सगळे बघून मी रडण्याच्या पलीकडे गेलो आहे. चाळीसजण जाणार होते त्यातले जे आयत्यावेळी काही कारणामुळे गेले नाहीत ते वाचले. ड्रायवरची काहीच चुक नव्हती, रस्त्याकडेला खड्डे खोदून ठेवले होते आणि त्या खड्ड्यातली माती बाहेर पडली होती. एका मातीच्या ढिगार्यावरून गाडीचे चाक गेले आणि गाडी स्लीप झाली. जो वाचला तो कसा वाचला हाही चमत्कारच वाटतो. अत्यंत वाईट अपघात. चार सख्ख्या चुलत भावांना नेताना बघून तर मी चॅनेल बदलले. सर्वांना सावरण्यासाठी देवाने शक्ती द्यावी.

टीव्ही ९ वर "जोक सांगितल्याने ड्रायवरचे लक्ष विचलित झाले व अपघात झाला" हि थियरी सतत सांगितली जात आहे. एबीपी माझा वर वाचलेल्या व्यक्तीने असे काहीही घडलेले नाही असे सांगितले आहे. रस्त्याकडेच्या मातीच्या ढिगावर चाक गेले व घसरून पुढे बस दरीत कोसळली असे सांगितले आहे.

>> जो वाचला तो कसा वाचला हाही चमत्कारच वाटतो.

सहमत.

>> चार सख्ख्या चुलत भावांना नेताना बघून...

... Sad Sad

बापरे Sad
खूप वाईट बातमी आहे.
मुळात पाऊस, धुकं, स्लिपरी रस्ते अश्या वातावरणात कितीही चांगला ड्रायव्हर असला तरी अपघात होऊ शकतात.
(आणि अश्या रिस्क मध्ये घाटात ड्राईव्ह करुन जाऊ नका म्हटलं तर पिकनिक मूड मध्ये असलेल्यांना कधीच पटत नाही.)
प्रचंड वाईट वाटतंय.

"आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत..." हे अगदी मनावर कोरलेलं वाक्य. पण............ Sad भावपूर्ण श्रद्धांजली! आंबेऩळी अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! Sad

भयंकर दुर्घटना. श्रद्धांजली हे शब्दही थिटे वाटताहेत, घरच्या मंडळींची अवस्था कल्पून अंगावर काटा येतो Sad Sad

मुळात पाऊस, धुकं, स्लिपरी रस्ते अश्या वातावरणात कितीही चांगला ड्रायव्हर असला तरी अपघात होऊ शकतात.">>>>

हो. आणि पिकनिक असली की गाडीत गाणी, नाच याना उत आलेला असतो. आरडाओरडा इतका असतो की त्याचा ड्राइव्हरला त्रास होऊ शकतो हे कोण लक्षात घेत नाही.

डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे आज संध्याकाळी निधन झाले.

मेजर कौस्तुभ राणे काश्मिरमध्ये शहीद, दहशतवाद्यांशी लढताना ठाण्याच्या 29 वर्षीय सुपुत्राला वीरमरण https://goo.gl/DZdNPR #Bandipora

करुणानिधीन्ना पुरणार कि भडाग्नी देणार..??
जयललितांच्या समाधी आवारात पुरलेले बरे.. काय भांडायचे दोघे... दोघन्नी एक्मेकन्चा सुड घेतला..!!

माजी सभापती आणि माजी खासदार, विद्वान, सोमनाथ चटर्जींचे दु:खद निधन. ज्यांनी त्यांचा डीप बॅरिटोन आवाज व वादविवाद (आअर्ग्युमेन्टस) ऐकले असतील ते कधीच विसरू शकणार नाहीत असे व्यक्तिमत्व.

अजीत वाडेकर Sad श्रद्धांजली !

मा. माजी पंतप्रधान अटलबिहारीजी वाजपेयी गेलेत ही दूरदर्शन वरील बातमी दूरदर्शन ने मागे घेतलीय. पण त्यांच्या प्रकृतीत अजून सुधारणा नाहीये. Sad

मा. माजी पंतप्रधान अटलबिहारीजी वाजपेयी यांचे ९३ व्या वर्षी दु:खद निधन. श्रद्धांजली.

श्रद्धांजली. एका सुसंस्कृत, निर्गर्वी, आदर्शवत, अजातशत्रु अशा महान नेत्याचा अस्त ! पुन्हा असे राजकारणी व्यक्तीमत्व होणे नाही. Sad

अजित वाडेकर आणि अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली. क्रिकेट आणि राजकारणात आदर्श बाळगण्याजोगं नेतृत्व हरपलं...

Pages