कर्म असं खरंच काही असतं?

Submitted by _धनश्री_ on 29 July, 2018 - 21:44

नमस्कार वाचकहो, मी सध्या मनाच्या खूप विचित्र अवस्थेतून जात आहे.. आणि जो माणूस यासाठी जबाबदार आहे त्याला आपण कर्माची फळं म्हणतो ती मिळावी अशी माझी मनापासून इच्छा आहे.. जसे करावे तसेच भरावे असं आपण नुसताच ऐकलं आहे.. पण मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की कर्मा factor, किंवा कर्माची फळं वगैरे असं काही असतं का?
मी खूप प्रामाणिक पणे विचारतेय कारण इथे खूप mature लोक आहेत हे खूप दिवस वाचत असल्याने माहीत झालंय... मला प्लीज खरं काय असतं ते सांगा..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये कर्मा बर्मा क्या होता है? यिंडिया मे एक स्टेट है, महाराष्ट्रा करके, उदर के लोगोकी भाशा है, मराटि करके, उसमे कर्मा को कर्म ऐसा बोल्ते ऐसा मैने सुना. बाकि आपकी मर्जी...
धन्यवाद.

कुणाचे कर्म कितीही वाईट/अतरंगी असले तरी तिला/त्याला त्याचे फळ (जे वाईट असणार हे गृहित आहे) मिळावे अशी इच्छा का? आणि अशा इच्छेचे फळ तुला मिळणार नाही अशी खात्री का? कितीपण कोण हलकट भेटलं तरी त्याला मोक्ष मिळू दे अशीच इच्छा ठेवावी. ते पण सुटले नि आपणपण!!

सीमंतिनींनी विचारलेला प्रश्न वेगळ्या शब्दांत -
अमक्याला त्याच्या कर्माचं फळ मिळू दे असं म्हणताना आपल्याला मिळतंय ते आपल्या कर्माचं फळ तर नाही ना? असा प्रश्न पडतो का?

बन्याजी आणि अभि_नवजी, सुधारणेसाठी धन्यवाद.. संपादित केले आहे.. पण जरा मनःस्थिती समजून घेतली असती तर बरे वाटले असते.. प्रतिसादांसाठी आभारी आहे.. परिस्थिती सुधारण्याची वाट बघेन. __/\__

मलाही हे प्रश्न सध्या सतत पडतायेत।।
बरेच जण म्हणतात ।। ह्या जन्मात केलेले कर्म आणि त्याची फळे ह्या जन्मीच भोगावे लागतात, चांगले किंवा वाईट दोन्हीपन।
पण मग आत्ता जे काही घडतंय ते पूर्वसंचितानुसार घडतंय ।।हे असं का म्हणतात?? म्हणजे पूर्वजन्मीचा काही सम्बन्ध असतो का??
मुळात ईश्वर देव पुण्यकर्म नशीब ह्या गोष्टी खर्या आहेत का?
माफ करा ह्या पोस्टला सुसंगत उत्तर नाहीय हे।।माझच घोड पुढं दामटलय.

या बाबतीत " कर्माचा सिद्धांत " या नावाचे मराठीत भाषांतर केलेले पुस्तक माझ्या वाचनात आलेले आहे. मुळ पुस्तक गुजराथी भाषेत " कर्मनो सिद्धांत " ह्या नावाने प्रसिद्ध करण्यात आले आहे. तुमच्या मनातील बर्‍याच प्रश्नांची उत्तरे सापडतील व शंका-समाधान होईल.

धनश्री जी ,

धनश्री जी ,
ही भावना आपल्या वयानुरूप असते. तरूणपणी असे तडफदार विचार येणे योग्यच आहे.
मलाही असेच एक वाक्य नेहमी त्रास देते ... कि .. "अखेर सत्याचाच विजय होतो"
मला अजूनही वाटते कि सत्याचा विजय आपली पूर्ण वाट लागल्यावर शेवटी होउन काय उपयोग आहे ?? तो आजच व्हायला हवा. म्हणजेच कोणावर होत असलेला अन्याय आजच थांबेल.... त्याची वाताहात होणार नाही....
असो.
पण माझा अजून एक विचार आहे.
आपण ज्या मार्गाने वाट चालतो त्या मार्गावरचे (त्यामुळेच समविचारी) प्रवासी - सवंगडी आपल्याला भेटतात. म्हणजे तुम्ही पंढरीच्या वारीला निघालात तर आजूबाजूला वारकरीच असणार आहेत तुमच्या.
त्यामुळे चांगले कर्म अनुसरण्या माणसाला चांगलेच लोक भेटतील. चुकून एखादा वाइट माणूस भेटला तर तो अपवाद समजून , त्याला टाळून आणि विसरून पुढे निघून जावे. आणि तुच्यावर त्याच्या क्रुत्यांचा काही परिणाम होत नाही हे त्याला दिसणे ही शिक्षा त्याला पुरेशी आहे. त्याला शिक्षा करण्याच्या किंवा तसे चिंतण्याच्या फंदात पडून आपले कर्म आणि मन अशुद्ध करण्यात अर्थ नाही.

म्हणजे मरू दे ☺️>> मरतील तेव्हा मरतील हो. कोण अमरपट्टा घेवून नाय आलं इथे. इच्छा त्यांच्या मोक्षाचीच ठेवावी. नायतर परत आपल्यालाच दोन जन्माच्या मध्ये कुठे स्वर्गात भेटायचे. इथे भेटले ते भेटले, आता वर नका भेटू म्हणावं.

देव त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देईन असे म्हणतात खरे...
पण प्रत्यक्षात असे करायला कोणतीही अज्ञातशक्ती रिकामटेकडी बसली नाहीये.
पण तरीही असे म्हणावे आणि पुढे जावे हाच सल्ला देईन.
कारण आपण एका वाईट परीस्थितीत अडकतो तेव्हा आपली पहिली प्रायोरीटी असते ती त्यातून बाहेर कसे पडावे.
त्यानंतर ती परीस्थिती पुन्हा ऊद्भवू नये याची काळजी घेणे.
त्या परिस्थितीला जो जबाबदार आहे त्याला धडा शिकवणे हे सर्वात शेवटी आणि ऑप्शनल आले. ऑप्शनल यासाठी की त्यात आपली मन:शांती ढळण्याची शक्यता जास्त असते.
अहो साधे ईथे मायबोलीवर तुम्ही कोणाशी भांडत बसलात तर लॉग आऊट करताना चीडचीड सोबत घेऊन जाता.
त्यामुळे जर आपल्या बदले की आग आणि तळतळाटावर नियंत्रण ठेवणे जमत असेल, तर वरचे देवाचे वाक्य बोलावे आणि त्याच्यावर हे काम ढकलून निश्चिंत राहावे.
मेरे सलमान शाहरूख आयेंगे असे राखी गुलझार कोकलून म्हणत असली तरी प्रत्यक्ष आयुष्यात ते कधी येत नाहीत ना कधी येणार !

कितीपण कोण हलकट भेटलं तरी त्याला मोक्ष मिळू दे अशीच इच्छा ठेवावी.
>>>> म्हणजे मरू दे ☺️--->>
हा हा हे बेस्ट आहे Lol

===
धागा काहीतरी धार्मिक/ फिलॉसॉफिकल वगैरे असेल म्हणून उघडला नव्हता.
पण हे तर 'कोणाशीतरी बोलायचे आहे किंवा मदत/माहिती हवी आहे' आहे.

त्यादृष्टीतून पाहिल्यास ऋन्मेऽऽषचा प्रतिसाद बेस्ट आहे . मीदेखील असेच काहीसे लिहणार होते.

बदला घ्यायचा किंवा शिक्षा द्यायचा विचार करताय का? नका करू. ते सगळे चित्रपटासाठी वगैरे ठीक असते खर्या आयुष्यात त्या बदलेकी आग मध्ये आपणसुद्धा किंवा आपणच होरपळून जाण्याची शक्यता असते.

परिस्थिती सुधारण्याची वाट बघेन. -> वाट नका बघत बसू. परिस्थिती बदलता येत नसेल तर त्यातून बाहेर पडा, दुसरे पर्याय शोधा, ज्याच्यामुळे त्रास होतोय त्याच्यापासून दूर रहा.

शुभेच्छा!

धनश्री, तुमच्या मनस्थितीला जबाबदार माणसाला त्याच्या कर्माची फळे भोगायला मिळावीत असे तुम्हाला वाटते म्हणजे तुमचा कर्मफलसिद्धांतावर विश्वास आहे.

विश्वास आहे तर हे लक्षात घ्या की त्याला जशी कर्मफळे मिळणार तशीच तुम्हालाही मिळणार/मिळताहेत. कदाचित तुमच्या आजच्या मनस्थितीमागे तुमची आधीची कर्मे आहेत जी तुम्हाला आज आठवत नाहीत/माहीत नाहीत.

मला जेव्हा असा दुसऱ्यामुळे त्रास होतो तेव्हा 'मी या व्यक्तीचे काहीतरी वाईट नक्कीच केले असणार, त्याचे फळ हे असे मिळाले. बरे झाले या जन्मी फळ मिळून माझी वाईट कर्माच्या ओझ्यातून मुक्तता झाली' असा विचार करून स्वतःचे सांत्वन करून घेते.

बाकी ज्याचे त्याचे कर्मफल ज्याला त्याला मिळतेच मिळते. आपण त्याचे वाईट चिंतुन आपले वाईट कर्माचे ओझे वाढवू नये.

आपण त्याचे वाईट चिंतुन आपले वाईट कर्माचे ओझे वाढवू नये.

___ परफेक्ट!

धनश्री. दुसर्‍याचं वाट्टोळं होऊ दे ही तुमची इच्छा तुमच्या खात्यात नवा कर्म लिहित आहे...ज्याने तुमचं कधीतरी वाट्टोळं होणार आहे. दुसर्‍याचं काय व्हायचं ते त्याच्या कर्मावर असते. तुमच्यासोबत जे होतंय ते तुमच्या कर्माची फळं आहेत असे समजा...

कर्माचा बॅलन्स कमी करत जाण्यासाठी सर्वात आधी नवीन कर्मे आत्म्यावर चढवणे बंद करणे अपेक्षित असते. निष्काम कर्मयोग म्हणजे कोणतीही कामना न करता आपले जीवन जगणे..... तुम्ही जी ही कामना करत आहात ती तुमच्यावरच उलटणार आहे.

जसे करावे तसे भरावे किंवाया जन्मीची फळे याच जन्मी मिळतात या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही.
माझा विश्वास फक्त नियतीवर आहे.जितके जितके नियती ठरवते त्यापलीकडे काहीही होऊ शकत नाही.मग त्याला काहीही नाव द्या, प्राक्तन, नशीब,देव इ.
बर्‍याचलोकांची धारणा ऐकलीय या जन्मात केलेल्या कर्माची फळे याच जन्मात भोगावी लागतात वगैरे.पण जन्माला येताना नियती काय ठरवतेतितके आणि तितकेच होत जात असते.बरीच लबाड,दुष्ट प्रवृतींची माणसे पाहिली आहेत.पण त्यांचे काहीही वाईट झालेले नाही.(होवो ही ईच्छाही नाही.) याउलट ज्यांनी सद्य जन्मात काहीही मुद्दामपणे वाईट केलेले नाही किंवा वाईट चिंतलेले नाही,त्यांना नानातर्‍हेची दु:खे भोगताना पाहिली आहेत.असं का तर त्यांची पूर्वजन्मीची फळे! म्हणजेच काय तर ज्या प्रश्नांची उत्तरे सहजपणे मिळत नाहीत त्याला उत्तर म्हणजे पूर्वजन्मीची फळे.त्यामुळे करावे तसे भरावे असल्या गोष्टीं मला तरी कधीच पटल्या नाहीत.

मी सध्या मनाच्या खूप विचित्र अवस्थेतून जात आहे.. आणि जो माणूस यासाठी जबाबदार आहे त्याला आपण कर्माची फळं म्हणतो ती मिळावी अशी माझी मनापासून इच्छा आहे..>>>>>>>> अशी इच्छा कधीच धरू नका.कारण या गोष्टीचा तुम्हालाच मानसिक त्रास होत जातो इतकेच.आपण संत नसलो तरीही ती गोष्ट ज्याच्या त्याच्या नशीबावर सोडून द्या.
तुम्ही सद्या मनाने अस्थिर आहात अशावेळी काही नामस्मरण करत जा,स्तोत्र म्हणत जा.देवावर विश्वास नसला तरी अशा गोष्टी डिस्ट्रॅक्शनसाठी उपयुक्त पडतात.
तुम्हाला शुभेच्छा!

>> मुळात ईश्वर देव पुण्यकर्म नशीब ह्या गोष्टी खर्या आहेत का?

ईश्वर, देव, दैव, पुण्यकर्म, नशीब, नियती इत्यादी कशावरही माझा विश्वास नाही.
सगळा शक्यतांचा (probability) खेळ आहे. पण या शक्यता इतक्या वेगवेगळ्या घटकांवर (factors), अवलंबुन असतात की त्या अचुकपणे मोजणे व्यावहारीक (practical) नाही. साधे नाणे उडवुन छापा की काटा करताना ते नाणे घरंगळत जाउन गटारात पडेल ही शक्यता आपण गृहीत धरलेली नसते. पण तरीही आपल्या कृतीद्वारे आपण शक्यता बदलु शकतो. मी चांगला अभ्यास केला तर मला चांगले गुण मिळायची शक्यता वाढते पण तरीही माझ्या नियंत्रणाबाहेरील घटकांमुळे कमी गुण मिळायची शक्यता शिल्लक रहातेच. जे घटक आपल्या नियंत्रणाबाहेर असतात त्यांच्याकडे संपुर्ण दुर्लक्ष करणे चांगले.

जर त्या माणसाने काही बेकायदेशीर केले असेल तर कायदेशीर मदत घ्या, नाहीतर त्याला मनोमन कचकुन शिव्या हासडा आणि तुमच्या भावनांचा निचरा करुन आपल्या नेहमीच्या कामधंद्याला लागा. तुमच्या राग, उद्वेग अशा भावनांना कुरवाळत रहाण्याने तुमचेच मानसिक स्वास्थ्य हरवेल आणि जो वेळ तुम्ही आनंदी राहु शकला असतात तो फुकट जाईल.

येथे लिहिलेले सगळंच पटतं।।।पण परत अस वाटत आपण कधीच कोणाशी ठरवून वाईट वागलेले नसताना कोणाचं वाईट केलेले नसताना पण आपणच का art of living , mediatation करून आपणच आपलं मन का मारायचं? त्याला त्याच्या इच्छा आहेत तरीही का त्याला शांत करायचं?
की बाकी सगळ्या शक्यतांचा विचार करता आपण कसल्याच अपेक्षा न ठेवता फक्त जन्माला आलो म्हणून जगायचं की मरण येत नाही म्हणून जगायचं।।??
असो।।पुन्हा धाग्याला सोडून विषयांतर होतंय।।

@ jayantshimpi, या बाबतीत " कर्माचा सिद्धांत " या नावाचे मराठीत भाषांतर केलेले पुस्तक माझ्या वाचनात आलेले आहे. मुळ पुस्तक गुजराथी भाषेत " कर्मनो सिद्धांत " ह्या नावाने प्रसिद्ध करण्यात आले आहे. तुमच्या मनातील बर्‍याच प्रश्नांची उत्तरे सापडतील व शंका-समाधान होईल. >>> + ११११. हे पुस्तक वाचलेली व्यक्ती मायबोलीवर भेटली याचा मला अत्यानंद झालाय.

श्री. हिराभाई ठक्कर यांनी लिहिलेले 'कर्माचा सिद्धांत' हे मराठी पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे.
https://www.amazon.in/Theory-Karma-Marathi-Heerabhai-Thakkar/dp/81923461...

अथवा इंग्रजीतून हे पुस्तक खालील लिंकवर वाचायला मोफत उपलब्ध आहे.
http://www.hirabhaithakkar.net/karma1.htm

सच6486, मन मारायचा प्रश्न येतंच नाही.

आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळत नाहीत, का? कारण आपली लायकी, प्रयत्न, हिम्मत, धीर, सहनशक्ती ह्या सगळ्यात आपण कुठेतरी कमी पडतो. पण हया त्रुटी आपण ओळखू शकत नाही/ओळखु इच्छित नाही. मग दुसऱ्याला दोषारोप देणे सुरू होते. मी कोणाचेही वाईट केले नाही हे आपण म्हणतो, ज्याच्या बाबतीत हे म्हणतो त्याने खरेतर म्हणायला हवे की तुम्ही खरेच माझे काहीही वाईट केले नाही. पण असे कुणीही म्हणत नाही कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपण आपल्या नजरेने स्वतःकडे व दुनियेकडे पाहतो, तसे पाहताना सुद्धा आपण चांगले व दुनिया वाईट हे चित्र पाहायची इच्छा मनात असते. त्यामुळे चित्र आपल्याला हवे तसे दिसते. या चित्राचा त्रास होतो. म्हणून मग मनःशांतीसाठी मेडिटेशन व आर्ट ऑफ लिविंगच्या मागे लागावे लागते. आपल्यातले दोष, आपले अपराध, आपल्यातले न्यूनत्व डोळे उघडून पाहिले व स्वीकारले की मन आपोआप शांत राहते. त्याला मारून मुटकून शांत करायची गरज पडत नाही.

मूळ धाग्यात लेखिकेने त्या इसमास काहीतरी शिक्षा व्हावी ही इच्छा प्रदर्शित केली आहे. हे कदाचित होईलही, पण ते झाल्यामुळे लेखिकेला आज होत असलेला त्रास कमी होणार की नाही याची खात्री देता येणार नाही Happy Happy

कर्माचा सिद्धान्त हे पुस्तक मी पण सुचवायला आले होते Happy Apparently, it helps a lot.

 लेखिकेने त्या इसमास काहीतरी शिक्षा व्हावी ही इच्छा प्रदर्शित केली आहे. हे कदाचित होईलही, पण ते झाल्यामुळे लेखिकेला आज होत असलेला त्रास कमी होणार की नाही याची खात्री देता येणार नाही  --- हे बरोबर आहे.
बाकी, आजवर कधीच तुम्हाला (लेखिका) असे प्रसंग दिसले नाहीत?!

@ राजसी, वा:! हे पुस्तक वाचलेली अजून एक वाचक सापडली.

@ धनश्री, हे पुस्तक वाचल्यावर मला इतर कोणाचेही भगवद्गीतेवरील निरूपण वाचायची आवश्यकता आणि इच्छा वाटली नाही. इतकं सोप्या आणि रोजच्या साध्या भाषेत गीतेचं सार सांगितलेलं आहे. श्री. हिराभाई ठक्कर यांची इतर पुस्तकंही जरुर वाचा.

https://www.amazon.in/Mrutyu-Che-Mahatmay-Hirabhai-Thakkar/dp/9383950285...

universe is round and it completes the circle. आयुष्य हे चांगल्या आणि वाईट आशा दोन्ही गोष्टींचे मिश्रण आहे म्हणून ते समतोल आहे. कर्म आणि त्याची फळं हे खरं आहे की खोटं माहिती नाही.
but there is something called as nature's justice. not all the revenges that one must take. nature takes care of an injustice on one's behalf.

आपले कर्म आणि त्याचे फळ म्हणजे तरी काय?
सतत आपण जो विचार आणि आचार करत असतो त्याचा आपल्यावर आणि आजू बाजूच्या वातावरणावर आणि परिस्थिती वर पडत असलेला घडत असलेला परिणाम.आणि ही जीवनाची साखळी आहे, श्वास आहे तोपर्यंत चालू राहणार, विचार, आचार, परिणाम, पुन्हा परत, हे सतत चक्र आहे. त्यातल्या त्यात आपण काय विचार करावा हेच फक्त आपल्या ताब्यात असतं, आणि तेही फार काही सोप्पं नाही.

As they say, it is all about the choices we make. every second of our life. Not at all easy, way easier said, than done.

अनेकांनी सुचवल्यानुसार, स्वतःची मनशांती कायम ठेवण्याचा संपूर्ण प्रयत्न करा आणि योग्य दिशेनी जात राहा परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न सतत करत रहा, तुम्हाला शुभेच्छा.

आणि अजून एक, फार पूर्वी ऐकलेले आणि स्वतः अनुभवलेले
"वक्त से पहले और किस्मत से ज्यादा कुछ नही मिलता"
(पण म्हणून आपण प्रयत्न बिलकुल कमी करायचे नाहीत.)

फळ म्हणजे खायचे फळ ह्या अर्थाने थोडेफार बघितले जाते... फळ म्हणजे आउटकम.. परिणाम.. प्रभाव.. जे आज करता त्याचा परिणाम नंतर होतो. आपल्या आजच्या अवस्थेला आपले मागच्या काही वर्षातले कर्मच कारणीभूत असतात. म्हणून आताही जे काही करतोय ते सजग राहून करावे असे सांगितले जाते. सजग राहून केल्यास परिणाम घडणे आपल्या नियंत्रणात येते.

कर्म वगैरे असेल.त्याचे फळ प्रत्येकाला मिळतही असेल.पण ते मिळेपर्यंत आपण स्वतः अशी इच्छा केली होती हेही विसरून जातो इतका वेळ मध्ये जातो.त्या अमक्याला शिक्षा होउदे/होउदे नको, आपल्या भल्यासाठी त्याचा उपयोग होत नाही.
☺️☺️आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून स्वतः टिट फॉर टॅट करण्या इतकी पॉवर असेल तर ठीक.ती नसेल तर त्याला कर्माचे फळ का मिळत नाही याचा विचार करून फक्त आपले 400 केस गळतात.
आपल्याशी माणूस वाईट वागला.ठीक आहे.त्याला शिक्षा व्हायला हवी.पण हे विचार करून करून तब्येतीची वाट आपल्या जास्त लागते.त्यापेक्षा मनातल्या मनात एकदा 'मेला कुत्रा लवकर मरुदे, मी आता माझं चांगलं होईल आणि दुसरा कुत्रा भेटणार नाही म्हणून सावध राहतो.' हे जास्त चांगलं वर्क करतं असं आढळून आलं आहे.

कर्म वगैरे असेल.त्याचे फळ प्रत्येकाला मिळतही असेल.पण ते मिळेपर्यंत आपण स्वतः अशी इच्छा केली होती हेही विसरून जातो इतका वेळ मध्ये जातो.त्या अमक्याला शिक्षा होउदे/होउदे नको, आपल्या भल्यासाठी त्याचा उपयोग होत नाही.
☺️☺️आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून स्वतः टिट फॉर टॅट करण्या इतकी पॉवर असेल तर ठीक.ती नसेल तर त्याला कर्माचे फळ का मिळत नाही याचा विचार करून फक्त आपले 400 केस गळतात.
आपल्याशी माणूस वाईट वागला.ठीक आहे.त्याला शिक्षा व्हायला हवी.पण हे विचार करून करून तब्येतीची वाट आपल्या जास्त लागते.त्यापेक्षा मनातल्या मनात एकदा 'मेला कुत्रा लवकर मरुदे, मी आता माझं चांगलं होईल आणि दुसरा कुत्रा भेटणार नाही म्हणून सावध राहतो.' हे जास्त चांगलं वर्क करतं असं आढळून आलं आहे.

धनश्री ,असे कर्म वगैरे काही नसते. तु धार्मिक असशील तर समजायला जड जाईल पण विचार कर. वाईट कामं करुन नंतर सगळी सुखं उपभोगून नव्वदीला आनंदाने खपलेली आणि आयुष्यात प्रामाणिक आणि सचोटीने वागलेली पण नंतर अन्नालाही मोहताज होऊन मरताना अंगाला मुंग्या लागलेली माणसे बघितली आहेत.
पाप करणार्याला शिक्षा मिळते असे मानणारे लोक त्या तथाकथित पापी माणसाला शिक्षा करण्यास असमर्थ असतात असा त्याचा अर्थ असतो.
तूला ज्या व्यक्तीने त्रास दिला वा देतो आहे त्याचा न्याय तूला करावा लागेल किंवा कुणाला तरी सांगून 'न्याय' करावा लागेल. देव /नियती त्याला बघून घेतील या भाबड्या आशेवर राहु नको.देव वगैरे अंधश्रद्धा आहेत. खूप मानसिक त्रास ,अंगाची आग होत असेल विचार करुन तर विचाराची दिशा बदल व विषय सोडून दे असे सूचवतो व थांबतो.

वाईट कामं करुन नंतर सगळी सुखं उपभोगून नव्वदीला आनंदाने खपलेली आणि आयुष्यात प्रामाणिक आणि सचोटीने वागलेली पण नंतर अन्नालाही मोहताज होऊन मरताना अंगाला मुंग्या लागलेली माणसे बघितली आहेत.

--- हा फेवरिट फेवरिट मुद्दा असतो कर्मविपाकविरोधी लोकांचा बरं का! Happy

नाही म्हणजे कसंय की कोणाही व्यक्तीने आयुष्यभरात नेमके काय काय केले ह्याचे सीसीटीव्ही फुटेजच ह्या विरोधकांच्या हातात असते.. गंमतयना?

घराबाहेर नोकरीधंद्यात व्यवहारात जाम प्रामाणिक आणि सचोटीने वागलेली व्यक्ती दिसत असली तरी ती खाजगीत कुणाशी कशी वाईटोत्तम वागत असेल ह्याची भनकपन बाहेर लाग्त नाहि... आणि व्हाइस-अ-वर्सा..

हे काही लोक जे प्रचंड दानधर्म देवधर्म करतात, पुण्याला लुटून सातार्‍याला दान करतात ते फार सचोटीने वागत नसले तरि कर्म बॅलन्स करत असतात. त्यामुळे आयुष्यभर गळे कापले लोकांचे तरी पापक्षालन करत असल्याने सुखात जगत आरामात मरतत...

आपण चितरगुप्त नाही, त्यामुळे प्रत्येकाच्या लाइफ अँड डिड्सचा आपल्याकडे रेकॉर्ड नसल्याने वि कान्ट डिसाइड हु वाज गुड अन हु वाज ब्याड....

सद्दाम हुसेन आणि गड्डाफीसुद्धा त्यांच्या देशातल्या बहुसंख्य जनतेसाठी मसिहा होते.... पण इतर जगातल्या लोकांसाठी क्रूरकर्मा... सेम गोज विद द वन यांड वनली नमो Wink

चालू जन्मात चांगली कृत्ये करा,वाईट केलीत तर त्याची फळे याजन्मी किंवा पुढल्या जन्मी भोगावी लागतील असा धमकीवजा इशारा आहे.एकाअर्थी ही संकल्पना चांगली आहे.फ्क्त ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत त्यावेळी पूर्वजन्मीचे भोग,नशीब म्हणायचे इतकेच.

कर्म असतंच.... आपण जे भोगत असतो ते आपल्या कर्माचे भोग असतात....बर्‍याचदा मला त्रास देणार्‍या व्यक्तीला मी मागच्या जन्मात त्रास दिला असेल असं म्हणून स्वत:ला शांत करते
पण तुम्ही जे काही वागता (चांगलं किंवा वाईट) ते तुम्हाला भिगावं लागतंच..

वरती कोणी तरी लिहिलंय की आयुष्यभर वाईट वागुन आनंदाने जगणारे आणि शांतपणे मरणारे पाहिलेत आणि आयुष्यभर चांगलं वागुन आयुष्यात प्रचंड त्रास होणारे पाहिलेत... पण गंमत माहीतीये का आपल्या वाटतं ते आनंदात आहेत, त्यांचे त्रास त्यांना माहीत.

स्वानुभवावरुन सांगतेय प्रत्येक जण स्वतःची लढाई लढत असतं आणि ते त्यांच्या कर्माचे (या जन्मीच्या किंवा मागच्या जन्मीच्या, स्वतःच्या किंवा पुर्वजांच्या) / नशिबाचे भोग असतात.

कोणी ना कोणी कोणाला ना कोणाला जाणते अजाणतेपणाने त्रास देतो आणि ते इतरांना भोगावं लागतं त्यातला प्रकार Happy

विचार हे पण कर्म आहे.
तिथेच सावध रहा.
प्रत्येकाला कर्माचे फळ मिळतेच. कधी कधी पुण्यकर्माने ते भोग कमी करता येतात.
पुण्य कर्म म्हणजे शुभ विचार.

हे काय पण, ज्या कुत्र्याने/कुत्रीने आपलं आयुष्यात बरंच नुकसान केलं त्याच्याबद्दल 10-15 मिनिटं वाईट विचार करणे पण पापफलदायी?
आय टेल यु, धिस चित्रगुप्त हॅज सो अनफेअर एचआर पॉलिसीज नो.आय ऍम गोइंग टू रेज पिटीशन ऑन चेंज.ऑर्ग

आय टेल यु, धिस चित्रगुप्त हॅज सो अनफेअर एचआर पॉलिसीज नो.आय ऍम गोइंग टू रेज पिटीशन ऑन चेंज.ऑर्ग >>>
जाता जाता तुमच्या पिटीशन वर माझी पण स्वाक्षरी घेताल का??

पाश्चिमात्यांनी वेगळ्या मार्गांनी सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण दिले. त्यात एक प्रकारची सुसंबद्ध अशी पद्धत आहे - निरीक्षण, सिद्धांत नि प्रयोग या मार्गांनी तो सिद्धांत बरोबर आहे की नाही हे ठरते. ते आपल्याला बरोबर वाटते. सहज विश्वास बसतो.
पण मानसिक व्यवहार, भविष्यात काय होईल हे कसे सांगावे, या बाबतीत जे शास्त्र आहे, त्यातहि सर्वच सिद्धांतांवर सगळ्यांचाच विश्वास असतो असे नाही. पण काही काही सिद्धांत बरेच लोक मान्य करतात

<<<ईश्वर, देव, दैव, पुण्यकर्म, नशीब, नियती इत्यादी कशावरही माझा विश्वास नाही.>>>
या सगळ्या गोष्टी भारतीय तत्वज्ञानातील सिद्धांत आहेत. त्याची सत्यता ठरवण्याचे पूर्वीच्या लोकांचे काय मार्ग होते ते आपल्याला माहित नाहीत. पण अनेकांनी त्यावर विश्वास ठेवला. हजारो वर्षे! आता काही जणांचा नसेल.
काहीजणांना त्याबद्दल जास्त माहिती करून घेण्याची इच्छा असते, त्या विषयाचा अभ्यास व्हावा असे वाटते म्हणून ते चर्चा करतात. कारण विश्वास आहे की नाही हे ठरवण्यापूर्वी निदान ते काय आहे ते तरी जाणून घ्यावे अशी योग्य कल्पना असते.

<<<मुळात ईश्वर देव पुण्यकर्म नशीब ह्या गोष्टी खर्या आहेत का?>>>
खर्‍या आहेत का म्हणजे? तुमचा विश्वास असला तर खर्‍या, नाहीतर नाही.
गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत खरा आहे हे वर्षानुवर्षे प्रयोग करून सिद्ध झाले. कारण गोष्टींचे मोजमाप करण्याची ठराविक पद्धत होती. एव्हढे मास नि एव्हढे अंतर म्हणजे एव्हढे गुरुत्वाकर्षण असे ठरवतात नि त्यानुसार बर्‍याच गोष्टी घडतात हे बघता येते.
पण कर्म कसे मोजायचे? त्याचे फळ काय असते? ते कसे मोजतात. वेळ किती लागतो? कुणालाच नक्की सांगता येत नाही. म्हणजे Quantitative काही नाही. Qualitatively विश्वास ठेवावा किंवा ठेवू नये.

अर्थात तत्पूर्वी थोडी माहिती मिळाली तर ठरवता येईल खरे की खोटे, विश्वास ठेवावा की नाही.

<<< ह्या जन्मात केलेले कर्म आणि त्याची फळे ह्या जन्मीच भोगावे लागतात, .........? म्हणजे पूर्वजन्मीचा काही सम्बन्ध असतो का??>>>
>>>
हो. पूर्वजन्मीचे कर्म नि या जन्मीचे कर्म यांची Algebraic बेरीज असते.
कर्म यावर विश्वास असेल तर

<<ज्या कुत्र्याने/कुत्रीने आपलं आयुष्यात बरंच नुकसान केलं त्याच्याबद्दल करणे पण पापफलदायी?>>
हो!
तुम्ही काय केले याला तुम्ही जबाबदार. कारण कुत्रीने जे वाईट कर्म केले त्याचे फळ त्या कुत्रीला देण्याचे काम तुमचे नाही!
तुमचे मन नि 10-15 मिनिटं वाईट विचार
की टिंग अशी घंटा वाजते, लग्गेच एक ग्रॅम पाप तुमच्या खात्यात! ऑट्टोम्याटिक!
चित्रगुप्त काय, जे तुमच्या खात्यात त्यावर तो फळ देणार! पॉलिसी परमेश्वराने ठरवली नि तो तर डिक्टेटर, चेन्ज. ओर्ग इज फेक न्यूज!!

<<<पण म्हणून आपण प्रयत्न बिलकुल कमी करायचे नाहीत.>>>
अगदी बरोबर. कर्मण्ये वाधिकारस्ते!

ते कर्माचं जाउंद्या, कर्मा ब्रॅण्डचा चहा चांगला आहे. गोळी किंवा डस्ट दोनी पण चांगलं आहे. आपला काय अनुभव? कर्माचा...... मी कर्मा छा चा इचारतोय !

अनु तुम्ही कुत्र्यांबद्दल वाईट बोलायच किंवा वाईट गोष्टींना/लोकांना कुत्र म्हणायच सोडलत तरी पुष्कळ पुण्य पदरात पडेल...दिवा घ्यालच Happy

Happy
वो नही होगा. आता कुत्रे नाही म्हणायचं तर कावळे किंवा घुबड किंवा गाढव म्हणावं लागेल. त्यातही या प्राण्यांचे अपमान होऊन अजून पाप Happy

कर्म 200% खरे आहे जसे काय होते ते समजण्यासाठी ठेव ही कर्म बंधाची हे डॉक्टर श्री सुनील काळे यांचे पुस्तक वाचा अनेक सत्य अनुभव आहेत आणि सुंदर मार्गदर्शन आहे

Pages