पश्चाताप (शतशब्दकथा)

Submitted by प्रवीणविण on 29 July, 2018 - 05:06

पश्चाताप

"कितवा महिना."
"चवथा."

"बाळाची वाढ चांगली आहे."
"मॅडम, आम्हाला हे मुल नकोय्,"
"का?"
"तीन मुलीनंतरही ही चौथी मुलगीच आहे."
"कशावरून? मुलगाही असू शकतो. माझ्याकडे गर्भजलपरिक्षा होत नाही."
"आम्ही तपासणी केलीय्."
"कुठे? पण हा कायद्याने गुन्हा आहे."
".............."
"मग तिथेच करायचा ना गर्भपात."
"त्यांच्याकडे सुविधा नाहीत."
"मी पण करत नाही."
"नाही म्हणू नका, मॅडम. मुलगी झाल्यावर सासु घरांत घेणार नाही. आमचा संसार मोडेल."
"माझ्या मित्राने तुमच्याकडेच केलं आहे. त्यानेच तुम्हाला भेटायला सांगितले आहे. तुमची असेल ती फी देऊ."
"ठीक आहे. तुम्ही म्हणताच आहात तर... "

"सगळं व्यवस्थित पार पडलं. पण तुम्ही चुक केली."
"म्हणजे?"
"तुम्ही केलेली गर्भजलपरिक्षा चुकली. मुलगा होता तो."

Group content visibility: 
Use group defaults