थाई पाक कला १: ओळख

Submitted by अश्विनीमामी on 29 July, 2018 - 01:51

सवादिका( हॅलो) ,

एप्रिल २०१७ मध्ये अचानकच थायलँडची ट्रिप झाली. फ्लेवर कंपनीच्या टीम बरोबर गेल्यामुळे त्यांनी १५०-२०० नवे फ्लेवर एन्काउंटर्स ऑरगनाइज केले होते. बँकॉ क मध्ये लँड करून बस मध्ये बसून सर्व जण तडक पटायाला गेलो. तिथे बीच टाउन, नाइट लाइफ या बरोबरच उत्तम आंतरराष्ट्रिय हॉटेले आहेत. त्या पैकी रॉयल क्लिफ हॉटेल गॄपच्या एकाच परिसरात चार मोठ्या हॉटेल प्रॉपर्टीज आहेत. आम्ही राहिलो होतो तिथे अथांग समुद्राचे निळेभोर मन मोहवून टाकणारे व्यूज असलेले इंडिअन रेस्टोरेंट आहे. महाराणि का काहीतरी नाव आहे. अ‍ॅनिवर्सरीला वगैरे प्लॅन करून जायला छान आहे. जबरदस्त भारतीय जेवण मिळते. ही सर्व चार हॉटेले आतून जोडलेली आहेत.

ऑरगनायझरस नी खूपच अ‍ॅक्टिव्हीटीज प्लॅन केल्या होत्या. व त्या सर्व करून तरूण टीम रात्री भटकायला जात होते. पहिल्या रात्री पटायाच्या तीन मेन स्ट्रीट्स पैकी पहिल्या स्ट्रीट्च्या मागच्या बाजूस एका ठिकाणी ओरिजिनल थाई जेवण जेवायचा बेत होता. अल कझार शो बघून सर्व मंडळी बसने तिथे पोहोचली. शाकाहारी व मांसाहारी टेबले होती. गृप पडले जेवण मध्ये सर्व्ह झाले. फ्रेश घटक पदार्थ, नैसर्गिक गोडवा, चवी प्रिझरवेटिव्ह चा वापर आजिबात नाही. वेगळे सॉसेस मुळे जेवणा त एकदम बहार आली. चिकन विथ कॅशु नट मला एस्पेशिअली आवडले. इतके की मी पुढे कंबोडियात पण आयलंड कॅफे मध्ये जाउन तेच मागवले होते. बरोबरीने आमलेटे, फिश डिशेस, जास्मिन राइस व गोड म्हणून गार व गोड कलिंगडे पायनॅपल. मग तरुणाईला मोकळे सोडून मी रूम वर परतले. आजिबात जड न वाटणा रे पण समाधान देणारे असे जेवण म्हणून मनात ह्या
जेवणाची नोंद झाली.

मग बीच व्हिजीट, ठरलेल्या कामाच्या मीटिंग इत्यादि नंतर कुकींग वर्क शॉप होते. तिथून थाई स्वयंपाकाची एक नवी ओळख सुरू झाली. हॉ टेलचे स्वतःचे ना पा कुकिंग स्कूल आहे. तिथल्या
मोठ्या शेफ बाई, हाताखाली दोन ज्युनीअर शेफ्स आणि इतर सर्विस स्टाफ हजर होता. प्रत्येकाला एक किट देण्यात आले, कागदी टोपी, अ‍ॅप्रन, नोट्स पेन्सील्स कागद इत्यादि. बाईंनी क्लास घ्यायला सुरुवात केली.

भारतीय स्वयंपाक पद्धती पेक्षा थाई स्वयंपाक वेगळा आहे. फार मसाले, जड ग्रेवी ह्यात वापरली जात नाही. थाई लोक्स पण बारीक, चपळ तुडतुडीत असतात. थाई स्वयंपाक म्हणजे एक कलाप्रकारच आहे. त्यातल्या खुब्या आत्मसात करायला आधीचे सर्व अनलर्न करून सामोरे जावे.
भाज्या, मीट फिश फळे मसाले नीट कापायला शिकण्याची तपश्चर्या करून, आणि भांड्यात काय घडते आहे त्यावर संपूर्ण लक्ष देउन ह्या पाककृती शिकाव्या. प्रोफेशनल थाई बल्लवाचार्य व आचार्या भाज्या फळे कापायला चिंचेच्या झाडाच्या खोडाचा मोठा तुकडा वापरतात. त्याने पण अल्टिमेट पदार्थाला एक वेगळाच फ्लेवर येतो असे त्यांचे म्हणणे आहे.

मटन चिकन फिश चे बारके पातळ व एक सारखे तुकडे करावेत. भाज्या एका कोनात कापाव्यात फिश स्टीम करायचा असेल तर त्यावर कटस घेउन एक पॅटर्न बनवतात म्हणजे हर्ब्स स्पाइसेस चाम्गल्या प्रकारे इन्फ्यूज होतात. हर्ब्स स्पाइसेस हे थाई जेवणाच्या चवीचे एक रहस्य आहे. धणे बारक्या पॅन मध्ये अगदी थोडे तेल घेउन मंद गॅसवर भाजावे. भाजल्याचा मंद वास आला पाहिजे.
जळणे करपणे कुरकुरीत करणे हे थाई स्वयंपाकात अलाउड नाही.पेशन्सचे काम आहे. प्रत्येक मसाल्याच्या पदार्थाचा स्वाद व नैसर्गिक फ्लेवर त्याला हळूवार पणे ट्रीट करून रिलीज करायचा हे थाई चवीचे मर्म आहे. ह्या साठी खल बत्त्याचा वापरही केला जातो. मिक्सर पेक्षा खल बत्त्यात कुटून मसाले व इतर काँडिमेंट्सची फ्लेवर प्रोफाईल परफेक्टली रिलीज होते.

थाई पाक कृती जनरली भाता बरोबर सर्व केल्या जातात. लाल मिरची, ओली व सुकी, ढोबली ह्या सर्व प्रकारची वापरली जाते. तिचा शार्पनेस नारळाच्या दुधाच्या गोडव्याने टेंपर होतो. भाताचा एक टोप आणि बरोबर किमान तीन भाज्या / डिशेस सर्व्ह केल्या जातात.

मांसाहारी प्रकारात खालील घटक पदार्थ वापरले जातात.

फिश सॉस( नाम प्ला) : हा एक क्लीअर ब्राउन लिक्वीड सॉस आहे. मासे किंवा कोलंबी मिठाबरोबर प्रक्रिया करून हा सॉस बनवतात. जेवणात टेबला वर कायम फिश सॉस असतो.
मिरच्या बारीक कापून व कदाचित लिम्बाचा रस अ‍ॅड करून मग हा सॉस वाटीत ठेवलेला असतो.
पदार्थाची चव तुमच्या प्रेफरन्स नुसार अ‍ॅडजस्ट करायला हा सॉस वापरता येतो.

श्रिम्प पेस्ट ( का पी ): कोलंबी मिठात शिजवून प्रक्रीया करून घेतात. ते उन्हात वाळवतात. मग
वाटून त्याची पेस्ट बनवतात. ही जरा खारटच असते.

पोर्क बेली ( मू साम चान) : हे बेकन कट पोर्क आहे. ह्यात मटन, फॅट व स्किन हे लेयर अस्तात. ह्या व्यतिरिक्त शिजवून किंवा तळून घेतलेली पिग स्किन पण थाई पदार्थात वापरतात पोटाकडची स्किन जास्त नाजूक असते ती जास्त आवडीने खाल्ली जाते.

ह्या शिवाय चिकन व फिश नेहमी सारखे वापरले जाते.

मसाल्याचे पदार्थ व नेहमी वापरले जाणारे अन्न पदार्थः

बेसील, चिंचेच्या शेंगा, गलांगल आले, आपल्याकडे असते तसे आले, हिरवे मिरे, पांढरे मिरे, वेलदोडा, चक्री फूल, लेमन ग्रास, हालापिनो पेपर्स, वाटून घेतलेली मिरची, सुकी मिरची,
थाई चिली पेपर्स, धणे, फ्रेश तसेच सुकले ली काफीर लाईमची पाने, कोथिबीर, मशरूम,
जास्मिन राइस, हिरवे कांदे, स्प्रिंग अनिअन, कांदा पात, लसूण, चाइव्ह्ज, ब्राउन कांदे, पाम शुगर, मुंगबीन नूडल्स, शॅलट्स, व तेल तसेच थाई रेड करी सॉस व ग्रीन करी सॉस. हे सर्व स्टॉक अप करून घ्या.

माझा स्वयंपाक जनरली पुणेरी ब्राम्हणी मराठी, साउथ इंडिअन व्हेजी, हैद्राबादी, व थोडे बहुत काँटिनेंटल असा असतो. त्यामुळे वैयक्तिकली माझ्यासाठी हे एक टोटली नवी दिशा होती.

म्याडमचे लेक्चर व डेमो संपल्यावर आमच्या टीमचे चार गृप केले व आम्ही पण ते पदार्थ बनवले. मी चार रेसीपी बनवायला शिकले. व मला एक सर्टिफिकेट आणि एप्रन मिळाले. आता मी ऑफिशिअली थाई रेस्टॉरंट उघडू शकते. नक्की यायचं हं जेवायला. कापुन का ( धन्यवाद)

माबोवर मी टाकलेल्या सर्व पाककृतींचे श्रेय सीनीअर शेफ नापा स्कूल ऑफ कलीनरी आर्ट पटाया ह्यांचे आहे. हे वर्क शॉप केव्हा फ्लेवर ह्या कंपनी तर्फे आयोजित केले होते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आता मी ऑफिशिअली थाई रेस्टॉरंट उघडू शकते>> ग्रेट ! आम्हाला बोलावलेलं आहेच तुम्ही Wink आता फक्त रेस्टॉरंट उघडायचं बाकी आहे .. Lol
मस्त लेख आणि अनुभव !