कवच (कथा)

Submitted by रोहिणी निला on 27 July, 2018 - 07:02

खरं तर ही कश्या प्रकारची कथा आहे (काही जणांच्या मते कथाच नाहीये आणि नसती लिहिली तरी चालले असते वगैरे वगैरे) हे मला नेमकं सांगणं अवघड आहे. ही विज्ञान कथा म्हणून लिहिलेली नाही आहे. गेल्या काही दिवसांतील एका बातमीवर विचार करत असता लिहीत गेले आणि काही तरी जन्माला आलं. त्यामुळे संदर्भ वगैरे बद्दल ज्या काही त्रुटी असतील त्या मोठ्या मनाने माफ करा.
…......….......................................................
२०२०

"सिग्नल पृथ्वीवरून येतोय. एक नवीनच सुपरफास्ट ऑब्जेक्ट लोकेट झालंय."

"लोकेशन"

"35° 39' 10.1952'' N and 139° 50' 22.1208'' E"

"मग शंकाच नको. तंत्रज्ञानात फारच पुढे गेले आहेत ते. त्यांची SCMAGLEV पॅसेंजर ट्रेन लाईन तर २०२७ ला लाँच व्हायची आहे. त्यांनी सात वर्षं आधीच डेव्हलप केली की काय?"

"नाही जनरल. त्याची चिंता नको. त्यांच्या सगळ्या डेव्हलपमेंटस वर आपलं बारीक लक्ष आहे"

"मग हा ऑब्जेक्ट आहे तरी काय?"

"आपल्या सिस्टिम मध्ये आत्ताच आलेल्या इमेजेस नुसार आकार तरी मानवी दिसतोय. एखादा नवीन सुपरहिरो उदयाला आलेला दिसतोय"

"लगेचच कॉन्टॅक्ट बनवा. पृथ्वीवरच्या त्या मिडिओकर आणि स्वार्थी लोकांनी त्याच्या मेंदूत काही नोंसेन्स भरवून त्याला फुकटचा समाजसेवक करून टाकायच्या आधी त्याचं आपल्या स्पेशल वेपन लीग मध्ये येण्यासाठी ब्रेनवॉश करा. कसं ते तर आपल्या इंटेलिजन्सला माहितीच आहे."

"माफ करा जनरल पण हे काम त्यांनी आधीच सुरु केलं आहे असं इथे दिसतंय. पण कॉन्टॅक्ट डीनाय होतोय."

"काय? पण या आधी असं झालं नाही. प्रॉब्लेम कुठे येतोय."

"त्याचं कवच अभेद्य आहे. त्यातून आपल्या कुठल्याच वेव्ह्ज त्याच्या पर्यंत पोहोचत नाहीयेत. त्याला कंट्रोल करण्यात त्यांना यश येत नाहीये.

"कुठल्या मटेरियल चं बनलंय ते?"

"मटेरियल known वाटतंय पण खूप हाय डेन्सीटी आहे बहुतेक. त्यांना नाही जमत आहे एंटर करायला"

"मग त्याचा वीक पॉईंट शोधा. त्याचं ओरिजिन त्याची फॅमिली एखादी विशेष व्यक्ती एनिथिंग"

"धिस इस अनयुजवल जनरल"

"काय झालं"

"त्याचा वीक पॉईंट च त्याची स्ट्रेंग्थ आहे इतपत माहिती मिळू शकली आहे"

"म्हणजे?"

"व्हेरी रेअर कॉम्बिनेशन... त्याच्या मूव्हमेंट्स त्याचा फोकस आणि त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या एनर्जी चं त्यांनी अनालिसिस केलंय. प्रखर राष्ट्रप्रेम हाच त्याचा वीक पॉईंट आहे त्याचा आणि तीच स्ट्रेंग्थ सुध्दा आहे"

"मग हे कवच भेदणं सोपं नाही.... जे लागेल ते करा पण प्रयत्न सुरू ठेवा"

"येस जनरल"
..........…….................................
Announcement on the earth

"India creates history in Tokyo Olympics. The new superhero in the Indian sports history is born. This was a perfect demonstration of technique, hard work and the highest level of patriotism that made her undefeatable. Here comes the golden girl Hima Das"

Group content visibility: 
Use group defaults