कविता मनातली

Submitted by वेडोबा on 25 July, 2018 - 12:21

कुणाच्या मनातली आहेस तू
वेडी कविता
भांबावलेल्या माझ्या मनाचे रूप आहेस की... नुसते शब्दांचे फुगे।
सुचत नाही तरीही रिकामं नाही
मनात चाललेत शेकडो विचार
रमत नाही कशातही मन
तळाशी पसरलीय अस्वस्थता।
कशाला हा जगाचा पसारा सगळा
का मरतात आणि मारतात स्वतःच्या स्वार्थासाठी लोक
मन मारून जगत रहायचं फक्त
काहीही न करता काहीच जाणीव न होता जगता आलं पाहिजे
मी असण्याची जाणीवही नकोय आता
बस्स झालं खोटं खोटं जगणं कृत्रिम हसणं
अंतराला काहीच स्पर्श होत नाही.. सुखाचा नाही दुःखाचा नाही..कुठून आलाय हा मुर्दाडपणा
सुख दुखतंय हेच खरं......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जग / आयुष्याबद्दल दृष्टिकोन चुकलेल्या व्यक्तीचे कथन वाटते आहे.
येतात अशा वेळा.
आणि जातातही लगेच.

सकारात्मक कवितेच्या प्रतीक्षेत Happy