काही अनाकलनीय अनुभव चांगले /वाईट

Submitted by प्रिया येवले on 24 July, 2018 - 07:42

नमस्कार हा माझा लेखनाचा पहिला प्रयत्न आहे चूक भूल माफी असावी.
थोडं बालिश वाटेल पण म्हणतात ना देव लहान मुलांचं लवकर ऐकतो .असेच घडले होते माझ्यासोबत हा काळ ९० चा तर त्या वेळेस आम्हाला खाऊसाठी १ किंवा २ रुपये वडील द्यायचे .हो ! त्याकाळात ते खूप होते . तर आम्ही विक्रोळी पूर्व भागात राहायचो. आमची शाळा टागोर नगर ला होती . माझी लहान २ भावंडे शाळेत गेली होती . तर आई आम्हाला शाळेत ने आन करायची . मी हाईस्कूल ला असल्याने माझी शाळा सकाळी असायची तर , त्या दोघांची दुपारी . एके दिवशी दुपारी आईला काही काम होते . अन मला कलासला सुट्टी असल्यामुळे मला आईने त्या दोघांना आणायला पाठवले . माझयाकडे सकाळी पप्पानी दिलेले २ रुपये होते. येता येतां आम्ही तिघे आईस्क्रिम खाऊ असे मनात ठरवून मी जाम खुश होते . शाळेत पोचल्यावर शाळा सुटायला १० मिनिटे अवकाश होता म्हणून बाहेरच्या एका कट्ट्यावर मी वाट पाहत बसले .
२ रुपये जे स्कर्ट च्या खिशात होते ते बाहेर काढले . आणि इतक्यात घात झाला . ते हातातून निसटले आणि जवळच्याच गटारात घरंघळत जाऊन पडले . आईगं ! असा जीव चरफडला माझा! मनात अतीव दुःख झाले आजची आईस्क्रीम पार्टी हुकली.
मनात आले देवा काय पाप केलं कि तू माझे पैसे काढून घेतले . जर तू खरंच असशील तर मला माझे पैसे परत मिळवून दे ! आणि डोळे अक्षरशः भरून आले . तेवढ्यात शाळा सुटली . भावंडे आली , त्यांना काही कळू न देता गुपचूप मनात देवाला आळवत आम्ही घरी निघालो नजर संपूर्ण रस्ताभर खालीच भावंडे आपापसात बोलत चालत होते . हळूहळू ज्या दुकानातून आईस्क्रीम घेणार होते , ते जवळ येत होते तसे तसे अति वाईट वाटून मान अजून खाली घातली . आणि मनात म्हणले याचा अर्थ देव नाही .
अहो आश्चर्यम मला जमिनीवर अनपेक्षित २ रुपये दिसले झटकन उचलले . आनंद पोटात नि गगनात मावलाच नाही . आणि आईस्क्रीम ची तृप्ती आजही ओठावर हसू आणते . अर्थात हा सर्व योगायोग होता हे आज समजतंय पण तेव्हाची भाबडी समजूत कि देव आहे . आणि तो मला खूप साथ देतो . बस्स याच समजुतीवर मोठी झाले .
१० विची परीक्षा झाली आणि रिजल्ट लागले आणि ऍडमिशन ची घाई चालू झाली . आमच्या घरात मुंबईला कॉलेज ला जाणारी मी पहिलीच आणि त्याकाळी ऑनलाईन ऍडमिशन असे काही नव्हते लिस्ट लागायची पेपर वर छापून ते बाहेरच्या भिंतीवर लावायचे तिथे आपलं नाव शोधून फी भरून ऍडमिशन पक्का करून यायचं . मी आमच्या जवळपासचे तीन चार कॉलेज चे नाव टाकून लिस्ट लागण्याची वाट पाहत होते पहिली लिस्ट लागली माझं नाव कोणत्याच लिस्ट ला नाही लागलं आता दुसऱ्या लिस्ट ची वाट न बघता अतिशहाणपणाने मी माझ्या मैत्रिणी ज्या कॉलेज ला आहेत तिथे डोनेशन भरून ऍडमिशन घेण्यासाठी सज्ज झाले बरं हे प्रकरण महाग जाईल माहित असून मैत्रिणी तर आहेत न सोबत , म्हणून वडिलांनी सुद्धा जुळवा जुळव केली .पण माझ्याआधी २ जणींना घेऊन कॉलेज ने हाउसफुल्ल चा बोर्ड् लावला आता बोंबला ! यात दुसऱ्या लिस्ट ची तारिख टळून गेली .. ते म्हणतात न तेल हि गेलं तूप हि गेलं हाती धुपाटण राहील असेच झालं . पण एक दिवस एका दुसऱ्या मैत्रिणीचे वडील दिसले रस्त्यात चौकशी अंती समजलं तिला २ऱ्या लिस्ट मध्ये एक चांगलं कॉलेज मिळाले आणि तिने ऍडमिशन घेतले हि जेव्हा कि माझे टक्के तिच्यापेक्षा जास्त होत . ते काका म्हणाले आजची लास्ट लिस्ट आहे एकदा जाऊन बघ ती म्हणत होती तुझी नाव आले होते . मी तशीच आईकडे गेले जी घराजवळ एका घरगुती कंपनी मध्ये कामाला होती , तिला तिथून घेऊन आम्ही थेट कॉलेज मध्ये पोचलो . बाहेरच नोटीस होती प्रिन्सिपॉल नाहीत ४ दिवस रजेवर . पुन्हा बोंबला ! सगळंच संपलं ... मी निराश झाले आईला काय झाले माहित नाही पण ती म्हणाली आत जाऊ चल. मी नको नको करत होते आम्ही प्रिन्सिपॉल च्या ऑफिस समोर गेलो तिथे हि गर्दी आणि ऑफिस ला टाळा शेवटी निराश होऊन परत खाली आलो पण आईच म्हणणं थांब बघू कोणाशी तरी बोलून पण मी खेचतच तिला परत अनु लागले इतक्यात तिथे एका बाकड्यावर कोपऱ्यात एक बाई शांत बसली होती.तिने मला इशारा केला इकडे ये आम्ही जवळ गेलो , ती हळूच माझ्या आईला बोलली प्रिन्सिपॉल ऑफिस चा मागच्या केबिन मध्ये आहेत जा लवकर आताच बाहेर पडले . हे ऐकून आई सुसाट वर आणि मी तिच्या मागे , मागच्या केबिन ला देखील टाळाच होता . बाहेर एक शिपाई होता . आम्ही तिथे पोचायला आणि त्याने तो टाळा खोलून त्यातून प्रिन्सिपॉल बाहेर यायला एकच वेळ लगेच आई त्या नॉनमराठी माणसाबरोबर मराठीत बोलली हीच नाव दुसऱ्या लिस्ट मध्ये आले होते पण आम्हाला काही कल्पना नव्हती ऍडमिशन हवाय .. मग काय उभ्या उभ्या त्यांनी सही केली आणि शिपायाला स्टॅम्प मारायला आणि खाली कॉउंटर वर फी भरायचे सांगून माझं ऍडमिशन पक्के केलं. शिवाय यात फी अपेक्षेपेक्षा ३ पट कमी लागली खूप आनंद झाला . पण आई त्या बाईला शोधत राहिली जी परत भेटली नाही आईच म्हणणं देवानेच केली मदत .. आता हे तो देवच जाणे .
पैसे वाचले या आनंदात आणि आईवडिलांचा लग्नाचा वाढदिवस म्हणून आम्ही त्या रात्री हॉटेलमध्ये जेवलो आणि मस्त पैकी घरी येऊन झोपलो. सर्व आनंदात आरामात झोपी गेली मला मात्र झोप येतनव्हती . तशी ती आजही येत नाही . पण डोळे झाकून पडलॆ होते आम्ही सर्व जमिनीवर सरळ रेषेत झोपायचो हॉल मध्ये फक्त धाकटा भाऊ तेवढा सोफ्यावर झोपायचा अजूनही झोपतो. तर सुमारे १ च्या दरम्यान मला डोळ्यावर चमक जाणवली बॅटरी च्या उजेडासारखी म्हणून डोळे उघडले आणि पाहते तर काय समोर एक माणसाचं सावट दिसत होत अंधारात एवढं जाणवलं कि तो फक्त अंतर्वस्त्रावर होता . मी आधी विचारात पडले कोण आहे तो आपल्या घरात कोण पाहुणे आले का माझी झोप लागली तेव्हा नंतर जाणवलं आपण पुरे जागे आहोत आणि कोणी नाही आले . 'पपा तर नाही ? पण त्यांची ढेरी आईच्या आडून स्पष्ट दिसतेय मग भाऊ का ? पण त्याचा हात सोफ्यावरून लटकतोय. मग हा तिसरा पुरुष घरात कोण ? थोडं थांबले जाणवलं हा बॅटरी ने शोधाशोध करतोय नंतर त्याने बॅटरी आमच्या तोंडावर मारली मी शिताफीने डोळे बंद केले पण प्रश्न हा होता आता काय करू ओरडू ? जर त्याच्या हातात काही हत्यार असले आणि भलतेच घडले तर कारण तो बहिणीच्या पायाशी उभा होता . शेवटी नाईलाजाने मी बळ एकवटून जोरात ओरडले , पप्पा कोणतरी आहे आपल्या घरात ,कोणतरी आहे ! यात पप्पा आई दचकून उठले . आणि त्या चोराने तिथून असलेल्या जिन्यातुन वर पोबारा केला . वर किचन आणि रूम पार करून थेट टेरेस वरून तो गायब इथे घरात वाटले मी झोपेत बरळतेय तर आधी लाईट लावली .
पण जेव्हा टेरेसच्या दरवाजाच्या जोरात लाथेने उडवण्याचा आवाज झाला तेव्हा आई पप्पांची बोबडी वळली . आणि ते धावत एकामागोमाग एक वर गेले आम्ही तिघे खालीच भयभीत . जेव्हा वर जाऊन दरवाजा अर्धा मधून मोडलेला पहिला तेव्हा आईला आणि पप्पाना कापरं भरलं ते कितीजण होते कोण होते काही माहित नाही आमची कोणतीही वस्तु गेली नाही एक टेरेसचा दरवाजा अर्धवट सोडून .. पण त्यानंतर सकाळपर्यंत आम्ही जागेच ... विशेष असे कि आमच्या सोसायटीला वॉचमन होता आणि त्याने कोणाला आत बाहेर पहिले नाही .. पण माझ्यामुळे मोठं आरिष्ट टाळलं गेलं जे पप्पांच्या भाषेत आपल्या घुबडामुळे वाचलो हा हा हा ....!
आलेत का असे काही अनुभव तुम्हाला पोस्टा मग!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.. आहेत असे भरपूर अनुभव पण लेखनमर्यादा.. असो.
पुलेशु ! Happy

नवीन Submitted by आनंद. on 25 July, 2018 - 18:39

मग लिवा की
आम्ही वाचू की

आमच्या आयुष्यात असं थरारक कधीच का झालं नाही? Uhoh
देवामुळे कधी पैसे हरवले नाहीत की देवामुळे पैसे मिळाले नाहीत.

<<< अर्थात हा सर्व योगायोग होता हे आज समजतंय. >>>
गुड. यालाच नशीब म्हणतात, देव नाही.

उपाशी बोका , देवावर माझा ही विश्वास नाही पण एखाद्याचा विश्वास असेल तर त्यात खुसपट का काढा... त्यांच्या बाबतीत चांगल्या घटना घडल्यात हे पुरेसे नाही का??

देव- दानव याबाबत काहीच म्हणायचे नाही.पण एकाने, नातलगाला विचारले होते "अरे तू देव मानतोस.ती सुष्ट शक्ती आहे असं मानतोस तर दुष्ट शक्तीही असेलच ना.ती कशी नाकारतोस" .त्याच्या बोलण्यात पाँईट आहे .

छान लिहिलंय..
त्यांच्या बाबतीत चांगल्या घटना घडल्यात हे पुरेसे नाही का?? >>> अनिश्का. +१
गुड. यालाच नशीब म्हणतात, देव नाही. >>>> तुम्ही देवावर नाही विश्वास ठेवत पण नशीबावर ठेवतच आहात. खरोखरचे नास्तिक असाल तर नशीबाच्या कुबड्या तरी कशाला हव्यात. कशावरच विश्वास ठेवू नका.

<<< तुम्ही देवावर नाही विश्वास ठेवत पण नशीबावर ठेवतच आहात. खरोखरचे नास्तिक असाल तर नशीबाच्या कुबड्या तरी कशाला हव्यात. कशावरच विश्वास ठेवू नका. >>>
देव आणि नशीब या भिन्न गोष्टी आहेत. नशीब म्हणजे त्यात योगायोग (probability - likelihood that an event will occur ) चा संबंध असतोच. देव म्हटला की त्यात श्रद्धेचा संबंध असतो, योगायोगाचा नाही.