तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय कोणता होता??

Submitted by कटप्पा on 18 July, 2018 - 23:08

आज गप्पा चालल्या होत्या, आयुष्यातला सर्वोत्तम निर्णय कोणता होता( best decision in your life).
माझे मन भूतकाळात गेले - इंजिनिरिंग 2010 मध्ये पास झाल्यानंतर मला एका मोठ्या आयटी कंपनीत जॉब लागला होता. बंगलोर ला पोस्टिंग, 25 हजार पगार - माझ्यासारख्या गावाकडे 10वी पर्यंत शिक्षण झालेल्या मध्यम वर्गीय मुलासाठी स्वप्न सत्यात उतरल्या सारखे होते.
2011 पर्यंत स्वप्नांना तडा गेला असे वाटू लागले, काम ते नव्हते जे मला अपेक्षित होते. गाणी ऐकत दिवस दिवस कोडींग वगैरे माझ्या अपेक्षा होत्या पण मी इथे एक्सेल शिटा भरत होतो.डेटा मॅपिंग करत होतो.
कॅन्टीन मध्ये जायचो लोक म्हणायचे, लकी आहेस हा प्रोजेक्ट मिळाला, या प्रोजेक्ट मधून 2 वर्षात onsite मिळते म्हणजे मिळतेच.
काही मित्र आधीच मास्टर्स करायला तिथे गेले होते, फोटो टाकत होते, पार्ट टाईम जॉब करून पैसे कमवत होते. अमेरिकेत जायला मिळेल, डॉलर्स मिळतील आणि मी अशा प्रोजेक्ट मध्ये होतो.
2011 च्या ऑक्टोबर मध्ये मॅनेजर म्हणाला पुढच्या वर्षी साठी तुझा व्हिसा प्रोसेस आपण सुरू करणार आहोत.

आणि दोन आठवड्यात मी पेपर टाकले ( राजीनामा दिला).

का?? कारण US ला जायचे म्हणजे हे काम बंगलोर मध्ये 1 ते 2 वर्षे करा आणि नंतर onsite जाऊन पुढची 2 ते 4 वर्षे हेच काम. म्हणजे 6 वर्षे मी फक्त एक्सेल मध्ये, आणि मग अडकून रहा आणि असे रोल करत रहा.

तर मी onsite नको म्हणालो, US ला नको म्हणालो आणि मी एक स्टार्ट अप जॉईन केली. जिथे मला रोज नवीन चॅलेंजिंग काम होते,इंटरेस्टिंग होते आणि मला आवडणारे होते.

तर अशा प्रकारे मी 1 लाख + एम्प्लॉयी वाली कंपनी सोडून टोटल 15 जण असणाऱ्या स्टार्ट अप ला आलो. 30% पगार कट घेतला( कमी पगारावर आलो). सगळे म्हणाले मी चुकीचा निर्णय घेतला आहे. पण तोच निर्णय मला 2016 मध्ये अमेरिकेत घेऊन गेला आणि ते देखील मला आवडणाऱ्या कामात , जवळजवळ तिप्पट पगार जो मला जुन्या onsite position मध्ये ऑफर झाला होता आणि अशा कंपनीत जिथे माझा resume जुन्या स्किल्स वर कधीच सिलेक्ट नसता झाला.

आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय - पैशाच्या मागे न धावता, आवडत्या क्षेत्रात जाणे.

तुमच्या आयुष्यातील( करियर, लाईफ कशातीलही) सर्वोत्तम निर्णय कोणता होता???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंजीनियरिंग ला असताना हे काही मला आवडत नाहीय अन् हे मी ४ वर्ष हे शिकून यात करीयर करेल असे वाटत नाही हे कलाले व नंतर ठामपणे इंजीनियरिंग सोडण्याचा निर्णय घेतला. कारण फक्त हेच की जे मी प्रयत्न करुनही एंजॉय करू शकत नाही ते जन्मभर करणार नाही. १ वर्ष वाया गेलं लोकांनी नावं ठेवली. पण मी ठाम होते नंतर BSC केलं आणि आज एका राष्ट्रीयीक्रृत बैंकेत काम करते, तेव्हा घाबरून आहे ते continue केलं असतं तर कदाचित आयुष्यभर पश्चाताप केला असता.

पण मी ठाम होते नंतर BSC केलं आणि आज एका राष्ट्रीयीक्रृत बैंकेत काम करते. >> बी.एस.सी. आणि इंजिनिअरिंग मला एकाच माळेचे मणी वाटतात, कुठेही जा,
एकसारखेच डोक्यात जाणार . पण तुम्ही शेवटी मनासारखा commerce ला जायचा निर्णय घेतला, तिथं सुद्धा निर्णय घेताना बरेच किंतु-परंतू मनात आले असतील, त्याबद्दल ऐकायला आवडेल.

छान वाटल सगळ्यांचे अनुभव वाचताना, अन नकळत मन विचार करु लागले की माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय कोणता??
पण कुठलेही एक ठराविक असे ऊत्तर मिळाले नाही. आयुष्यात काही निर्णय योग्य होते, काही नाही. पण एक नक्की की कधीच कसली खंत नाही वाटली. कारण बरेवाईट काहिही अनुभव आले तरी तो सर्वस्वी माझा निर्णय होता अन त्याची जबाबदारी मीच घ्यायला हवी अशी मनाची तयारी दरवेळी आधी केलेली असते. हा, तरी काही वेळेला त्रास होतो निर्णय चुकला की पण त्याला पर्याय नसतो. अन म्हणुनच मी हल्ली फक्त मनाने नाही तर डोक्याने सुद्धा निर्णय घेणे सुरु केलेय Happy

आयुष्यातील काही वाईट अनुभवांनतर एक निर्णय घेतला होता, बरीच वर्षे त्यावर ठाम ही होते, पण एका हळव्या क्षणी तो बदलला अन परत एकदा स्थीर आयुष्य डळमळीत झाले, पण तरी त्याचीही खंत नाही कारण वाईट विसरुन त्यातील फक्त चांगल्या अश्या आठवणी सोबत ठेवायच्या असे ठरविलेय. अन पुन्हा एकदा जुन्या निर्णयाची अमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. बघु कदाचित हाच माझ्या आयुष्यातील सर्वोतम निर्णय ठरु शकतो.

पोस्ट रिटायरमेंट्,मला कंपनीने एक्स्टेन्स्शन देवून ३ वर्षे उच्च पदावर रिटेनरशिप देण्याचा निर्णय मी डावलला आणि तो सर्वोत्तम ठरला. ३ किवाडे उघडली. प्रोफेसर म्हणून टीचिंग्,अनुवादक्,कन्सल्टन्सी... वेळ माझ्या नियंत्रणात, कॉलेज फक्त ७ महिने असते... त्या मुळे जगभर भटकंती, वाचन वगैरे परस्यु करू शकलो, आता अनुवादावर भर .... रोज वाढत जाते काम अन कॉलेज पण प्लस आता सेमिनार् ला बोलायला बोलावतात.... वय ६७ .... पण आता तब्येत ठणठणीत.... मीरिटेनर् शिप घेतली असती तर एव्हाना ... त्या संधी गेल्या अस्ता... आर्थिक स्थैर्य उत्तम मिळाले

@विलभ, मला तांत्रिक शिक्षणात रस नव्हता पण सायन्स मनापासून आवडत होते आणि १ वर्ष गेल्यावर मग BSC च केलं. हो बैंकींग मध्ये जाताना बेसिक commerce च ही नौलेज नव्हतं. सगलं शिकत गेले. सुरूवातीला बराच त्रास झाला पण लोक चांगले होते अन् मुख्य म्हणजे मी करतेय ते मला आवडत गेलं

अनेकांचे अनुभव वाचताना छान वाटत गेले. अमा यांचा अनुभव तर खासच. सेक्रेड गेम्स मुळे हा धागा फॉलो करायचा राहून गेला होता. उत्तम चालू आहे धागा,
(ते आरारा यांनी माझ्या पोस्टनंतर असा विचित्र प्रतिसाद का दिला आहे ? मी त्यांना ओळखत नाही. अ‍ॅडमिन पहा बरं )

रेव्यू मस्त खूपच स्फूर्तिदायक आहे. पोस्ट रिटायरमेंट काय करायचे हा माझ्याही डोक्यात प्लॅन चालू आहे. तुम्ही लिहिलेले नेहमी फॉलो करते.

हाउ टू प्लॅन युअर सिक्स्टीज असा एक धागा लिहा. आम्हाला मार्गदर्शक ठरेल.

Pages