विठ्ठल दर्शन

Submitted by Asu on 22 July, 2018 - 00:37

विठ्ठल दर्शन

रूप तुझे सुंदर, पाही निरंतर |
रिकामे मंदिर, अंतर्यामी ||

कटीवर तव हात, नाही तू बोलत |
गरीबाची हालत, पाहोनिया ||

काय तुज मागू, नाही तुजपाशी |
राही मी उपाशी, पंढरीशी ||

काय तुज देऊ, नाही मजपाशी |
भक्तीभाव पायी, ठेवियला ||

दगडाच्या देवा, नाही तुझा हेवा |
खाशी तू मेवा, विटेवरी ||

पंढरीशी आलो, तुझ्या दर्शनाला |
नाही तू दिसला, पंढरीला ||

वारकरी गोंधळ, रिकामे देऊळ |
सर्वत्र धावपळ, शोधण्याला ||

घेऊन एकतारी, बैसला भिकारी |
तिथे तुझी स्वारी, विठ्ठला ||

धन्य धन्य झालो, केला सहवास |
सोडी उपवास घास, भरोनिया ||

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. विठ्ठलाशी लटके भांडणही छान.

फक्त भिकारी खटकला ...... कारण

नसे राऊळी वा नसे मंदिरी
जिथे राबती हात तेथे हरि