पहिलं प्रेम

Submitted by महादेव सुतार on 21 July, 2018 - 05:38

काय  सांगू  मी  माझ्या  प्रेमाबद्दल
काय  अर्थ  लावू मी  तिच्या  वागन्याबद्दल
प्रेम  झाल्यावर  खूप  छान  वाटलं
मनात  स्वप्नाचं  काहूर दाटलं
पण  तिच्या  नकारानेच  आभाळ  फाटल्यागत वाटलं
का  उगाच  प्रेमात  पडलो  असं  वाटायला  लागलं
दुःख  डोळ्यात  साठायला लागलं
डोळ्यातून  अश्रू  वाहायला  लागलं
इतकं  प्रेम  कोणावर  का होते  
मिळालं  नाय  तर  रडू  येते
पहिल्या  प्रेमाचं  गणित  कळालं नाही
आणि  कळणार  कसं
पहिलंच प्रेम  झालं  पण तेच  मिळालं  नाही
अजूनही  ओढ तिची  आहे  या  मनाला
तिच्या  आठवणी ने  त्रास  होतो  खूप  जीवाला
अजूनही  आवडते  ती  माझ्या  हृदयाला
तिच्या  आठवणी  शब्दात  मांडतो
माझा  डोळ्यातून  अश्रू  प्रत्येक  शब्द  लिहताना  सांडतो
अजूनही  तिच्यावर  प्रेम  करतो
पण  कितीही  खरं  प्रेम  करूनही  एकतर्फी प्रेमवेडा ठरतो...

MDS

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे हे पण.. Happy
पहिलं प्रेम मिळणं दुर्मिळच असतं म्हणा ! Proud