Submitted by सुप्रिया जाधव. on 18 July, 2018 - 15:02
अंतर
किती झाकशील मला ?
माझा अपुरा पदर
डोक्यावरून ओढता
ओका-बोका पाठीवर
सांग कुठवर असा
मला देशील आधार ?
माझ्या पायातला काटा
तुला करेल बेजार
मान जाईल खालती
रोखू नकोस नजर
तुझ्या मागे कशी धावू ?
तुला ठेंगणे अंबर
उरफाटे हे गणित
तुला कधी कळणार ?
तुझ्या जवळ आणते
तुझे राखले अंतर
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुझ्या जवळ आणते
तुझ्या जवळ आणते
तुझे राखले अंतर ... क्या बात है !!!
व्वा ! सुरेख..
व्वा ! सुरेख..
धन्यवाद आनंद आणि भुईकमळ
धन्यवाद आनंद आणि भुईकमळ