काय साधतं?

Submitted by हरिहर. on 13 July, 2018 - 03:12

कसला अहंकार असतो माणसांना नक्की? आणि त्यामुळे काय साधतं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अविका, आपला उल्लेख ईतरमध्ये आल्यास जो दुखावतो तोच तो अहंकार Happy

आपले नाव सर्वांच्या तोंडी, सर्वांच्या यादीत हवे ही अपेक्षा अहंकारातूनच येते.
या अहंकारावर ज्यांनी मात केली आहे ते ईथे लिहू शकतात

संपादन (4 hours left)
तुम्हाला कसला अहंकार आहे ते लिहा की आधी.
एकोळी धागा काढून लोकांना नावं घेउन प्रश्न विचारणे म्हणजे तुमच्या मते त्या व्यक्तींना अहंकार आहे, सो त्यांना अहंकार आहे हे तुम्हाला का वाटते ते तरी लिहा. आमची तरी करमणूक होईल. >>> + बरोब्र

अविका, आपला उल्लेख ईतरमध्ये आल्यास जो दुखावतो तोच तो अहंकार Happy

आपले नाव सर्वांच्या तोंडी, सर्वांच्या यादीत हवे ही अपेक्षा अहंकारातूनच येते.
या अहंकारावर ज्यांनी मात केली आहे ते ईथे लिहू शकतात >>> :हा हा:

अओ मी ईक्दे जास्त लितच न्हायि, म्ला अहंकार तर बिल्कुल नाही असल्यास मला माहित नाही की फ्र्क पडत न्हायि

पन येवड्या मोठ्या माबोवर फक्त कही नावे लिहुम बाकिच्यान्चा अप्मान केले ते नाही आवडली.

तिकडे तो प्रश्न त्यांनी एकट्या सिंबांना विचारलाय. त्यांच्यासाठी स्पेशल धागा काढला. पण सिंबांना एकतर जराही अहंकार नाही किंवा अहंकाराच्या निगेटिव्ह काहीतरी आहे, त्यामुळे त्यांना असं सिंगल आउट केलेलं आवडलं नाही आणि त्यांनी उत्तर दिलं नाही.
किंवा त्यांचा अहंकार इतका मोठा आहे, की असल्या लहान सहान गोष्टींनी तो सुखावत नाही; म्हणून उत्तर दिलं नाही.

मग दुसरे मासे शोधले.

शाली Light 1

सिंबांना माझ्याकडून दिव्याची गरज नाही.

माझा अहंकार सुखावायला दुसरं कोणी आलं नाही, तर मी आरशासमोर उभा राहून आरती ओवाळतो.

Lol हो ना तिकडे सिम्बाला का विचारलंय मुळात ते ही झेपलं नाही.
मी काही तरी मेजर मसालेदार गॉसिप मिस करतोय फिलिंग येतंय मला... Proud

हो, त्या धाग्यावर मलाच का विचारले ते मला सुद्धा झेपले नाही, पण कोणीतरी मला असे तात्विक प्रश्न विचारण्यायोग्य समजतंय पाहून माझा अहंकार सुखावला:)

मग या धाग्यावर "अहंकार" शब्दाची फोड, तो कुठून येतो, 1 2 सुभाषिते वगैरे घालून फ़ंडू रिप्लाय द्यायचे मनात होते, पण सालं काही आठवेच ना!!
मग काहीतरी लिहायचं आणि लोकांनी छान प्रतिसाद म्हंटले नाही म्हणून माझा अहंकार दुखऊन घ्यायचा, या पेक्षा म्हंटले काहीच नको लिहुया Lol

अहंकार माणसाच्या जगण्याच्या इच्छेचे मूळ आहे. श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची खूण आहे. अहंकारामुळे महान मानवोपयोगी कार्ये झाली आहेत तसेच महाभयंकर युद्धे सुद्धा झाली आहेत.

माझा अहंकार सुखावायला दुसरं कोणी आलं नाही, तर मी आरशासमोर उभा राहून आरती ओवाळतो. >>> भरत, तुम्ही अ‍ॅंथनी सारखे आरशासमोर उभे राहून "तुम अकेलाइच दस दस आदमी का अहंकार तोडनेको सकता है...." बोलत आहात असे डोळ्यासमोर आले Happy

फा, ब्लफमास्टर मधला नाना पाटेकर हॉटेल च्या रिसेप्शन वर आरती करत असतो तो सीन आठवला .. भिंतीवर देवाचा फोटो म्हणुन आरसा च असतो Proud

सदगुरु आदेश

भक्त असावा तर ... असा!(१७/७/२०१८)

एकदा सत्यभामाने श्रीकृष्णाला विचारले, आपण त्रेतायुगात श्रीराम अवतार घेतला होता, "आपली पत्नी सीता ही माझ्यापेक्षाही सुंदर होती का?" श्रीकृष्ण समजले की, "सत्यभामेला तिच्या रुपाचा गर्व झाला आहे."

इतक्यात वाहन गरुडही म्हणाले,"हे भगवन, माझ्यापेक्षाही वेगवान ह्या त्रिभुवनात कुणी आहे का?"

हे पाहून सुदर्शन थोडेच शांत राहणार. ते ही म्हणाले,"प्रभू, माझ्यापेक्षाही शक्तिवान कोणी असणार नाही ना?"

श्रीकृष्णाने हे जाणले की माझ्या तिन्ही भक्तांना अहंकार झाला आहे. म्हणून भक्ताकडूनच ह्यांची परिक्षा करवली पाहिजे. भगवान विष्णूंच्या सर्व अवतारात त्यांचा परमप्रिय चिरंजीव भक्त एकच ... महाबली हनुमान!

त्यांनी गरुडाला सांगितले की, "गरुडा, तु जाऊन हनुमानाला बोलावून आण. त्याला म्हणावं भगवान राम आणि सीता माता तुला भेटू इच्छीतात." गरुड गेल्यावर सुदर्शनाला सांगितले की, "द्वारावर उभे राहून पहारा कर. माझ्या परवानगीशिवाय आत कुणाला पाठवू नकोस".

भगवान स्वतः श्रीराम रुप धारण करून सत्यभामाला सीता रुपात तयार होण्यास सांगितले. आता सर्वजण हनुमानाची प्रतिक्षा करत बसले.

इकडे गरुड हनुमानाजवळ पोहोचला. मारुती रामनामात व्यग्र होता. गरुड म्हणाला, "हनुमान चला, रामरायाने आपणास बोलावले आहे. आपण माझ्या पाठीवर बसा. मी अति त्वरेने आपणास घेऊन चलतो." हनुमान म्हणाला,"तुम्ही व्हा पुढे, मी येतोच लगेच." गरुड मनात म्हटला, 'हा म्हातारा झालाय तर लवकर येईल का? ... असो', असा विचार करून गरुड पुढे निघाला.

महालात पोहोचताच तो पाहतो तर काय? ... हनुमान भगवंतासमोर हजर! गरुडाने शरमेने मान खाली घातली.

राम रुपी भगवान म्हणाले," हनुमंता! माझ्या परवानगीशिवाय तुला आत कुणी पाठवले? ... तुला द्वारावर कुणी अडवले नाही?" ह्यावर हनुमानाने तोंड उघडले असता चक्र त्यातून बाहेर पडले. हनुमान उत्तरला,"प्रभू, द्वारावर ह्या चक्राने मला अडवले तर मी त्याला मुखात ग्रहण केले. मला ह्या अपराधाची क्षमा करावी."

सुदर्शनही शरमला. त्याच्याही गर्वाचे हरण झाले होते. भगवान मनातल्या मनात हसत होते.

इतक्यात हनुमान रामाला वंदन करून म्हणाला की,"हे राम! सीता माई कुठे आहेत? त्यांच्याऐवजी कोण दासीला आपल्या बाजुला विराजमान होण्याचा मान मिळाला आहे?" ह्यावर सत्यभामाने मानच खाली घातली. तिलाही आपल्या रुपाचा गर्व मोडल्यासारखे झाले.

तिघांना कळून चुकले की ही भगवंताचीच लीला होती. त्यांनी साश्रू भगवंताच्या चरणाशी नमन केले. अशा रीतीने भगवंतानी आपल्या प्रिय भक्तांना त्यांच्या अहंकारापासून परमप्रिय भक्ताकडूनच मुक्त करवले.

तात्पर्य : आपल्याकडे जे आहे ते कुणाकडेच नाही ह्याचा अहंकार कधीच करू नये. जशी परिस्थिती आता आहे, ती बदलणार हे निश्चित. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका. ज्याचे ठायी अहंकार नसतो, तो भगवंताला सदैव प्रिय असतो.

राम/हनुमान/कृष्ण कथा सांगायला आणि अनुसरायला हे काय त्रेता/द्वापार युग आहे का? Uhoh
मनाचे श्लोक तरी अनुसरून दाखवा पाहू ह्या जमान्यात.

तात्पर्य : आपल्याकडे जे आहे ते कुणाकडेच नाही ह्याचा अहंकार कधीच करू नये. >> का? मग आपण वेगळे आणि सुपिरिअर आहोत हे कसे ठसवायचे आजच्या तारखेला?

जशी परिस्थिती आता आहे, ती बदलणार हे निश्चित. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका. >> मी तर म्हणेन आत्ताच करून घ्या ऊद्याचे ऊद्या बघू.
ज्याचे ठायी अहंकार नसतो, तो भगवंताला सदैव प्रिय असतो. >> मग नास्तिकांनी केला तर चालतो का ?

राम/हनुमान/कृष्ण कथा सांगायला आणि अनुसरायला हे काय त्रेता/द्वापार युग आहे का? >>>> अरेच्च्या असे आहे होय? मग आमचा संपादीत करण्याचा टाईम बी चूकला की राव. जाऊ द्या ल्हान पोरा सोरांची कथा समजून वाचा.

अहंकारातून नक्की काय साधतं! ही मला न उमगलेली गोष्ट आहे. म्हणूनच येथे विचारावं वाटले. बऱ्याच जणांना माहित असलेल्या प्रसंगाचा येथे उल्लेख करतो.
एकदा बालगंधर्व घराच्या पहिल्या मजल्यावर काहीतरी गात होते. काहीतरी डाक द्यायला पोस्टमन आला. जिन्यातून वर जाताना त्याला बालगंधर्वांचे भजन ऐकायला आले. "आपल्या सारख्या गरिबाला कधी यांचे गाणे ऐकायला मिळणार?" हा विचार करून तो जिन्यातच ऐकत बसला. फेऱ्या मारत मारत गात असताना गंधर्वांना हा तंद्री लागलेला पोस्टमन जिन्यात बसलेला दिसला. त्यांनी आश्चर्याने विचारले "देवा, येथे बसून काय करता आहात?" पोस्टमन घाबरला आणि त्याने स्पष्टीकरण देत माफी मागितली. यावर गंधर्वांनी त्याला हाताला धरून वर नेले "देवा, माफी कशासाठी मागताय?" म्हणत सतरंजी टाकली. त्यावर त्याला बसवून ते त्याच्यासमोर तास दिड तास मनसोक्त गायले. हा प्रसंग ऐकला आणि माझ्या डोळ्यात पाणीच आले.

प्रसंग दुसरा. गंधर्वांच्या पासंगालाही न पुरणाऱ्या पण बऱ्यापैकी नाव असलेल्या एका गायकाला मित्राने सांगितले "अमुक अमुक गाणे प्रत्यक्ष तुमच्याकडून ऐकायची फार इच्छा आहे." आणि गायक महाशयांनी उत्तर दिले "बाळ, सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाहीत आयुष्यात." हे ऐकून मित्राच्या डोळ्यात पाणी आले. अर्थात मी मैफिल अर्धवट सोडून उठून आलो हा भाग वेगळा.

वरील दोन्ही प्रसंगात दोन्ही व्यक्तींनी काय साधले?

क्षणभर अध्यात्म किंवा मोठ्या माणसांच्या गोष्टी बाजूला ठेऊ. अहंकाराने नक्की काय साधते हे मला माहित नाही पण निरहंकाराने काय साधते ते माझ्या कुवतीप्रमाणे:
एक तर तुम्हाला ज्या अनावश्यक गोष्टींचा त्रास होतो, तो होत नाही.
आयुष्यातल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी, प्रसंग, माणसे यांच्याबरोबर तुम्ही अगदी लहान लहान गोष्टींचा आनंद घेऊ शकता.
अहंकारी माणसाचा अहंकार हा दुसऱ्याच्या अहंकारामुळेच सुखावतो. त्यामुळे अशा व्यक्ती एक तर तुमच्याकडे फिरकत नाही किंवा फिरकलेच तर स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून.
आणि अजून बरेच...
नंतर लिहीनच.

शाली,
हाच प्रतिसाद वरती लेखात टाका की!

आधी तुकाराम आता बालगंधर्व ... का तुम्ही सुबोध भावे आणि जिजो च्या मागे पडलात हो.. ऊचकी लागून हैराण झाले असतील ते एव्हाना. Lol

माफ करा, पण मला कळले नाही वरच्या दोन्ही प्रसंगात अहंकार हा ईश्यू कुठे आला आहे?
बालगंधर्वांचा मूड चांगला असेल त्यावेळी, म्हणून पोस्टमन भाऊंना अलभ्य लाभ झाला. पोस्टमन भाऊंनी दुसरे दिवशी पासून रोज बालगंधर्वांची डोर बेल वाजवून 'आज मला हे गाणं प्रत्यक्ष ऐकायची ईच्छा आहे' असे म्हंटले असते तर बालगंधर्वांचा प्रतिसाद काय आला असता?

माझ्या सारखा संगीतराक्षस पोस्ट्मन असता आणि ऊन्हाच्या दोन घटका जिन्यावर डुलकी काढल्याची शिक्षा म्हणून बळजबरी सुबोध भावेचे गाणे ऐकावे लागले असते तर मीही त्याला अहंकारी म्हंटले असते.

प्रसंग दुसरा. गंधर्वांच्या पासंगालाही न पुरणाऱ्या पण बऱ्यापैकी नाव असलेल्या एका गायकाला मित्राने सांगितले "अमुक अमुक गाणे प्रत्यक्ष तुमच्याकडून ऐकायची फार इच्छा आहे." आणि गायक महाशयांनी उत्तर दिले "बाळ, सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाहीत आयुष्यात." हे ऐकून मित्राच्या डोळ्यात पाणी आले. अर्थात मी मैफिल अर्धवट सोडून उठून आलो हा भाग वेगळा. >> गायक महाशयांना ते गाणे आता तितके चांगले गाणे जमत नसेल म्हणून ते खेदाने म्हणाले असतील 'मी तुमची ईच्छा नाही पूर्ण करू शकत'.
मी सनी देओलला तो 'ढाई किलो का हाथ' वाला डाय्लॉग म्हणून दाखव म्हणालो आणि तो 'जमणार नाही' म्हणाला तर मी 'तू बच्चन नाहीस तरी अहंकार दाखवतोस' असे म्हणणार ?

एक तर तुम्हाला ज्या अनावश्यक गोष्टींचा त्रास होतो, तो होत नाही.
आयुष्यातल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी, प्रसंग, माणसे यांच्याबरोबर तुम्ही अगदी लहान लहान गोष्टींचा आनंद घेऊ शकता.
अहंकारी माणसाचा अहंकार हा दुसऱ्याच्या अहंकारामुळेच सुखावतो. त्यामुळे अशा व्यक्ती एक तर तुमच्याकडे फिरकत नाही किंवा फिरकलेच तर स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून. >> हे ज्याचे त्यालाच ठरवू द्या ना .. ऊद्या त्या गायक महाशयांना त्यांचे गाणे ऐकणारा एकही श्रोता मिळाला नाही तर करतीलही ते तुमच्या मित्राची अपेक्षा पूर्ण..

मी आधी म्हणालो तसे.. त्यांच्या वागण्याचे तुम्हाला दु:ख झाले? ठीक आहे ती तुमची खाजगी भावना आहे. तुम्ही निरहंकारी (तुमच्याकडून ऊसना घेतो हा शब्द) वागता आणि तश्या वागण्याचे समर्थन करता ऊत्तम.... पण म्हणून 'त्यांना अहंकार' आहे हे लेबल लावण्याची गरज नाही आणि असे लेबल लाऊन तुम्ही 'मी निरहंकारी' असे म्हणवून कसे घेऊ शकता ?

मला तर त्या गायकापेक्षा मैफिल अर्धवट सोडून जाणारा मित्रच जास्त अहंकारी वाटतो. नकार मिळाल्याने अहंकार दुखावला गेला आणि खाईन तर तुपाशी बाण्याने दुसरी गाणी ऐकायची संधी देखील घालवून बसला.

हायझेनबर्ग, सवडीने सविस्तर ऊत्तर देतो. मोबाईवरून अडचणीचे होतय.

व्यत्यय, तुम्हाला मी अहंकारी वाटलो असेल कारण वर जे लिहिलय ते प्रतिसादात लिहिलय, त्यामुळे मर्यादा येतात लिहायला. खरं तर कार्यक्रम ठरल्या दिवसापासुन त्याने ते ठरवले होते आणि त्या व्यक्तींचा हा खुप मोठा चाहता. स्टडी मध्ये चार फुटांचे पेंटीग लावलेले आणि असे बरचं काही. त्या नकाराने त्याची काय पडझड झाली ते काय सांगू? ते पहावले नाही म्हणून मैफिल सोडली.

Pages