अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार?

Submitted by कटप्पा on 7 July, 2018 - 00:24

Long वीकएंड साठी फ्लोरिडा आलो आहे. मी 2 अशा गोष्टी ट्राय केल्या ज्या परत कधीच नाही करणार.

१. ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते.

२. सिगारेट -पहिल्यांदा सुट्टा ओढला- 4 तास गुंगीत होतो. कानावर खडा आता. नेव्हर अगेन !!!

तुमच्या पण असे अनुभव असतील जे एकदा ट्राय केले पण परत कधीच नाही करणार?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बगा की वो एकदा खाऊन आमचं कोल्हापुरी म्हणत एका पाहुण्यानं खायला घातलेला कोल्हापुरी मटणाचा रेंदा अक्षरशः घासाला घोट पाणी ह्या हिशेबाने गिळला होता. इतकं फूळूक पाणी नॉनव्हेज जगात कुठं बनवत नसतील. आमच्या सातार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ह्याहून जास्त चविष्ट, ठसकेबाज अन जबरदस्त नॉनव्हेज कायम बनवतात पण हे असलं ठणाणा बोंबलत स्वतःच्याच तिखट खाण्याची झैरात नाही बुआ होत आज्याबात.

प्रत्यक्ष कोल्हापुरी माणसांकडून ऐकलं आहे की कोल्हापुरी खाणं हे 'मसालेदार' असतं, 'तिखटजाळ' नाही. थोडक्यात खर्‍या कोल्हापुरी रेसिपीत जी गोष्ट कांदा, आलं, लसूण, कोथींबीर्,तिखट,खोबरं, गोडा मसाला, धने, जीरे मिसळून (आमच्या कोल्हापुरी सासर च्या भाषेत केएलएम उर्फ कांदा लसूण मसाला) केली जाते आणि चमचमीत मसालेदार होते ती 'कोल्हापुरी' हॉटेल्स कडून त्या के एल एम ऐवजी पूर्ण चिली पावडर आणि भरपूर तेल वापरुन होते.त्यामुळे कोल्हापुरी म्हणजे लाल लाल तिखट आणि तेलाचा मारा केलेली काहीतरी भाजी किंवा मांस ही पब्लिसिटी जरा अन्यायकारक आहे.

कोल्हापुरी मटण, अहाहा, अगदी तोपासु.

तुम्ही नक्की काय खाल्ले माहित नाही पण आमच्या कोल्हापुरातील मटण, चिकनचा कोणताही प्रकार खुप खुप खुप आवडतो.
अन झणझणीत तर असायलाच हवे, नाहीतर काय मज्जा .

हा एक असु शकते , आपण सर्वांची एक पर्टीक्युलर अशी टेस्ट डेव्हेलोप झालेली असते, त्यामुळे बरेचदा काही काही खाद्यप्रकार जे ईतरांना खुप आवडतात ते आपल्याला आवडत नाहीत अन जे आपल्याला आवडते ते त्यांना आवडत नाही.

कोल्हापुरात अजुन एक , म्हणजे कच्चा कांदा असतोच बरेचदा नुसता खायला, अन मासांहरी जेवणात तर नक्कीच. पण मी कधीच खात नाही, त्याचा उग्र वास आवडत नाही म्हणुन

प्रत्यक्ष कोल्हापुरी माणसांकडून ऐकलं आहे की कोल्हापुरी खाणं हे 'मसालेदार' असतं, 'तिखटजाळ' नाही. थोडक्यात खर्‍या कोल्हापुरी रेसिपीत जी गोष्ट कांदा, आलं, लसूण, कोथींबीर्,तिखट,खोबरं, गोडा मसाला, धने, जीरे मिसळून (आमच्या कोल्हापुरी सासर च्या भाषेत केएलएम उर्फ कांदा लसूण मसाला) केली जाते >>>> + ११११

अनु अगदी अगदी, आमच्या घरी मम्मी तिखट बनविते त्यात मिरची कुटल्यावर लगेच त्यात, तिळ , खोबरे, भाजलेला कांदा, लसुण, मिठ अन थोडा गरम मसाला असतो, त्यामुळे मसाला वाटुन वेगळा न घालता सुद्धा खुप छान चव येते.
अन हे असे बनविलेले तिखट ३-४ महिने आरामात टिकते.

मी मागच्या वर्षीपर्यंत घरी बनवायचे मदर इन लॉ रेसिपीने. यावर्षी वेळ नाही मिळत त्यामुळे अंबारी.
पण घरच्या बनवलेल्याला ताजा असल्याने जास्त चांगला फ्लेवर येतो.

हो ते आपापल्या चवी लॉजिक तर व्हॅलीड आहेच, उरला झणझणीतपणाचा प्रश्न तर 'झणझणीत' खाणारे काही जगात एकटे कोल्हापुरी लोक नसतात (अलबत, जितकं खातात त्याची पुरेपूर झैरात तेच करताना दिसतात) बाकीची लोक शिस्तीत तिखट खातात, पण हे असलं व्हायचं नाय बाबा आपल्याच्यानं, "तुम्ही नक्की काय खाल्ले" म्हणलं का विषयच संपला मग! कोल्हापुरातलंही चूक एकनॉलेज करायला नकोसं असेल तर विषयच संपला.

ओह, तुम्ही खाल्लं ते खरोखर चवीला वाईट असेल. त्याबद्दल शंका घेत नाहीये.
मी इन जनरल कोल्हापुरी खाणं म्हणून हॉटेलवाले जे देतात त्याचं बोलत होते. फक्त 'तिखट' चवीचं खाणं नेहमी चांगलं नाहीच.
बाकी कोल्हापुरी खाणं फक्त तांबडा पांढरा वगैरे वगैरे मुळे जास्त प्रसिद्ध आहे, नागपुरी माणसाला विचारलं तर तो कोल्हापुरी खाणं येड्यात काढून सावजी वगैरे ची स्तुती करेल.
आम्ही माहेरचे कोणतेच पुरी नसल्याने प्रांताभिमान नाही आणि कोल्हापुरी, चायनीज, इटालियन, पुणेरी असं काहीही कमी तेलात बनलेलं, चवीला चांगलं असेल ते सगळं आवडतं.

अर्रर्रर्रर्रर्र, अनु ताई, पर्सनल नका घेऊ बुआ, तुम्हाला म्हणून नव्हतो बोललो, जनरल वृत्तीवर बोललो होतो, बाकी ते वऱ्हाडी/नागपुरी जेवण म्हणलं का नुसतं तेल पाहूनच पाचावर धारण बसते. Lol

>> कोल्हापुरी खाणं हे 'मसालेदार' असतं, 'तिखटजाळ' नाही.
>> त्यामुळे कोल्हापुरी म्हणजे लाल लाल तिखट आणि तेलाचा मारा केलेली काहीतरी भाजी किंवा मांस ही पब्लिसिटी जरा अन्यायकारक आहे.

+१११ अगदी परवाच कोल्हापुरात मटन खावून आलो. केवळ अप्रतिम. याला मटन म्हणतात. मसाला हा भाग आहेच. शिवाय कोणत्या प्रकारच्या रानावर/खाद्यावर शेळ्या/मेंढ्या पोसले जातात त्यावर सुद्धा चव अवलंबून असते असे अनेकांकडून ऐकून आहे. त्यामुळे प्रत्येक प्रांतात चव वेगळी असते म्हणतात. पण एक मात्र नक्की कि पुण्यात "कोल्हापूरी मटन" नावाखाली जी हॉटेल्स चालवली जातात तिथे सुद्धा कोल्हापूरात मटणाला जी चव असते ती मिळत नाही. या धाग्याच्या संदर्भात बोलायचे तर "कोल्हापुरी मटन" साठी प्रसिद्ध अससेल्या पुण्यातल्या एका हॉटेलात एकदाच गेलो होतो आणि "पुरेपूर" फसवणूक होऊन बाहेर पडलो. पुन्हा नाही.

मला मशरूम आवडतात, पण आता खोडरबर आठवणार प्रत्येक वेळी Lol
(गोंधळलेली अनुदिनी वाचल्यानंतर ओट्स पाहिले की भिजवलेला पुठ्ठा आठवतो, तसंच Wink पण ओट्स मला मुळात आवडतच नाहीत )

ओटांना मिक्सर मध्ये बारीक करुन इडली/आप्पे डोसे पीठ्/रवा केक बॅटर मध्ये लपवून ढकलावे, पटकन पोटात जातात Happy

ओटांना मिक्सर मध्ये बारीक करुन इडली/आप्पे डोसे पीठ्/रवा केक बॅटर मध्ये लपवून ढकलावे, पटकन पोटात जातात >>+१११
अप्पे इडली नाही करून पहिली ,पण डोसे अक्षरशः ५ मिनटात होतात एकदम easy .. माझ्यासारख्या जेवण करायचा आळस असणाऱ्यांसाठी एकदम परफेक्ट
@वावे खाऊन बघ .. नक्की आवडेल मधल्यावेळच खाणं म्हणून नो आटापिटा

एक विमान बनवू आणि त्यात ओट आणि मशरुम भरुन एकत्रच उडवून टाकू >> दोन वेगळी विमानं Wink मला मशरूम खूप आवडतात Lol
अंजली, कधी चुकून ओट्स आणलेच तर नक्की करून बघीन डोसे Wink
बाकी ओट्स चे डोसे म्हणजे ईस्ट मीट्स वेस्ट

सफोला ओट्स आणि व्हाईट मशरुम्स हा माझा आवडता मेनु , हा मेनु पण ५ मिनिटात होतो. व्हाईट मशरुम्स तर फळासारखे न शिजवता पण खाता येतात.

चला मीच गाडी रुळावर आणतो.

शिक्षण संपल्यावर रिझल्ट लागायला तीन महिने होते. त्यावेळी मी आणी माझ्या मित्रानी बिहारच्या जंगलात फिरायला जायचा प्लॅन केला. त्यात एका स्टेशनवर ट्रेन मध्यरात्री जाणार होती. . आमच्या कडे जास्त पैसे नसल्याने आम्ही रात्र वेटींग रुम मध्ये काढायचे ठरवले. उतरल्यावर कळले की स्टेशन खुप छोटे आहे. वेटींग रुम मध्ये कोणीच न्हवते पण बाजुलाच तिकिट घर होते आणि त्यात रात्री दोन तीन गाड्या थांबत असल्याने ते चालु होते म्हणुन जरा हायसे वाटले. . अचानक रात्री ५-६ टॉर्च लाईट चा प्रकाश दिसायला लागला. तिकिट देण्यार्या माणसाने घाबरुन तिकिटघर बंद करुन जवळच असलेल्या घरी पळाला. ५-१० मिनिटे आम्ही खुप घाबरलेले होतो. मित्र बिहारचाच असुन पण घाबरला होता. नंतर कळले की ते पण आमच्या सारखे प्रवासी होते. त्यानी आम्हाला ट्रेन मधुन पुढच्या स्टेशन ला जाउन तिथे दुसरी ट्रेन पकडुन परत त्याच स्टेशन वर येण्याचा सल्ला दिला जेणेकरुन आम्ही रात्र ट्रेन मध्ये काढु. त्यानंतर परत कधी बिहारच्या जंगलात फिरायला जायचा प्लॅन नाही केला.

वैशाली मध्ये काहीही खायला मिळावं ही आशा...

पुन्हा चूकूनही त्या वाटेला गेलो नाहीय. जाणार नाही.
आणि हो, यात बदल होणे नाही.

शारजा शेक नावाचा एक फळांचा चिखल केलेला पदार्थ केरळात खाल्ला होता, तो संपवणे ही एक मोठी कामगिरी होती आणि जीवावर उदार होऊन ती केली होती.

तसेच केळ्यांची गोडसर भजी देखील

आपण विरघळून मऊ झालेले खोडरबर खातो आहोत ही जाणीव नेणीवेतून जातच नाही
<<
Lol
हे वाचून मारी बिस्कीट खाताना पुठ्ठा चहात बुडवून खाल्ल्यासारखा लागतो, ही कन्सेप्ट आठवली.

Pages