तेल गेले , तूप गेले आणि हाती धुपाटणे आले !

Submitted by रेशीम गाठी on 12 July, 2018 - 09:48

२००१ सालातील गोष्ट. माझा नवरोबा आणि त्याचे २ मित्र कॉलेजमध्ये असताना कॉलेज जवळच्याच एका इमारतीत भाड्याने घर घेऊन राहायचे. घरात स्वयंपाक घर पद्धतशीरपणे थाटलेले आणि जेवण बनवायला आणि बाकी कामांना एक मावशीबाई यायच्या.

असेच एका सकाळी नाश्ता करत असताना दरवाजा वाजला. दार उघडले तर दारात एक साधू महाराज उभे. काही तरी भिक्षा द्या. १० रुपये हातावर ठेवले तर म्हणू लागले , १० रुपयात काय मिळते. मुले म्हणाली आम्ही विद्यार्थी आहोत , आम्हाला इतकेच द्यायला परवडते. मग म्हणाले कि काही खायला द्या असेल तर. पोहे बनलेले होते. एका मित्राने पेपरच्या कोनात पोहे आणून दिले, तर म्हणाले "साधूला अशी वागणूक .. पेपर मध्ये पोहे ?"
मग मित्राने स्टीलची ताटली आणून त्यात ते खायला दिले. मग म्हणाले कि ते लाल काय आहे तुमच्या ताटलीत? मित्र म्हणाला सॉस. तर म्हणाले हम भी खायेंगे. बर तो हि दिला. मित्र म्हणाला बाबा बसा त्या चटईवर. तर महाराजांचा आरडा ओरडा चालू… घोर अपमान, तुम्ही सर्व वर बसला आहात आणि साधू ला खाली बसवता. मी वयाने आणि मानाने मोठा आहे वगैरे वगैरे.

आता मात्र सगळ्यांची सटकली. एक तर भिक्षा मागायला आलेले , पैसे , खाणे सर्व देऊनही वर त्रागा!!

एक उंच धिप्पाड मित्र उठला , त्याने ते पोह्याची ताटली घेतली , १० रुपये हि काढून घेतले , साधूला बखोटीला धरून इमारतीच्या गेटबाहेर पर्यंत सोडले आणि सांगितले कि तुम्ही मानाने मोठे असाल पण आम्ही मनाने मोठे असल्याने तुम्हाला कुठलीही दुखापत न करता इथेपर्यंत सोडण्यास आलो आहोत. कृपया परत दिसू नका , नाही तर मनाचा मोठेपणा विसरून जाऊ.
तेल गेले , तूप गेले आणि साधूच्या हाती धुपाटणे आले !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तर महाराजांचा आरडा ओरडा चालू… घोर अपमान, तुम्ही सर्व वर बसला आहात आणि साधू ला खाली बसवता. मी वयाने आणि मानाने मोठा आहे वगैरे वगैरे. >>
मागच्या वेळी कुंभमेळ्यात ही वागणूक लाईव्ह पाहायला मिळाली अख्ख्या दुनियेला. साधूंचा मेळा म्हणजे उठवळ आणि फुकट्या लोकांचा तमाशा झालाय सध्या.

<<< कुंभमेळ्यात ही वागणूक लाईव्ह पाहायला मिळाली अख्ख्या दुनियेला >>>
काही लिंक वगैरे द्या जरा, म्हणजे आमचा पण थोडा टाइमपास होईल.

छान Lol

मी याच्या उलट किस्सा सुद्धा ऐकलाय,
नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांसाठी कडक नियम असतात,
जमिनीवर बसायचे इत्यादी,
परिक्रमेत गावातले लोक याना बसायला मुद्दामहून खाट, खुर्ची वगैरे ऑफर करतात, आणि हे बसले तर नियम कसे मोडलेत म्हणून टवाळी करतात.

सर्व प्रतिक्रियांसाठी मनापासून धन्यवाद.

मी याच्या उलट किस्सा सुद्धा ऐकलाय>> खरंय, दुसर्यांना त्रास देण्यात काय आनंद.

कदाचित तो अहंकार नसेलही. त्यांची धंद्याची ट्रिक असेल. लोकांना धाकात घेऊन जास्त उकळायचे..

< एक उंच धिप्पाड मित्र उठला , त्याने ते पोह्याची ताटली घेतली , १० रुपये हि काढून घेतले , साधूला बखोटीला धरून इमारतीच्या गेटबाहेर पर्यंत सोडले आणि सांगितले कि तुम्ही मानाने मोठे असाल पण आम्ही मनाने मोठे असल्याने तुम्हाला कुठलीही दुखापत न करता इथेपर्यंत सोडण्यास आलो आहोत. कृपया परत दिसू नका , नाही तर मनाचा मोठेपणा विसरून जाऊ. >>>
मानलं ब्वॉ मित्राला _/\_

उत्तम केले मित्राने.
>>>><<< कुंभमेळ्यात ही वागणूक लाईव्ह पाहायला मिळाली अख्ख्या दुनियेला >>>
काही लिंक वगैरे द्या जरा, म्हणजे आमचा पण थोडा टाइमपास होईल. >>>
उपाशी बोका, तुम्ही भारतात आहात की भारता बाहेर? बाहेर असाल तर अशा लिंका बघुन तुम्ही या व्हिडिओ मधल्या भारतीय साधूंना नावं ठेवण्यापुर्वी डिस्क्लेमर, अमेरिकेतील बेघरांची समस्या, चर्चची वागणूक, हिंदूएतर धर्मांमधील सुधारणा असा जागतीक डेटा जमवून मग काही कमेंट करा हो. Wink

घोर अपमान, तुम्ही सर्व वर बसला आहात आणि साधू ला खाली बसवता... वगैरे हे बघायचे आहे टाइमपास म्हणून. (हवा येऊ द्या, कार्यक्रम बघतो ना तसे). भारतीय साधूंना नावं ठेवायची आहेत, हा तुमचा भ्रम आहे.

२००१ सालातील गोष्ट. माझा नवरोबा आणि त्याचे २ मित्र कॉलेजमध्ये असताना कॉलेज जवळच्याच एका इमारतीत भाड्याने घर घेऊन राहायचे. घरात स्वयंपाक घर पद्धतशीरपणे थाटलेले आणि जेवण बनवायला आणि बाकी कामांना एक मावशीबाई यायच्या.
<<

सध्या मराठी आंतरजालावर लिहिल्या जाणार्‍या बर्‍याचश्या लेखात स्वत:च्या नवर्‍याचा उल्लेख "नवरोबा" वगैरे करायची नविनच फॅशन सध्या आलेली दिसतेय.

--
बैलोबा चायनीजकर !

उपाशी बोका,

विलभ नक्की कशाबद्दल बोलताहेत माहित नाही.
पण मी काही वर्षांपूर्वी एका क्लोज्ड फेसबुक ग्रुपमधे कुंभमेळ्यातील नागासाधूंचा फोटो बघितला होता. जटा, अंगाला फासलेली राख, हातात तलवारी आणि नग्न....
त्यामुळे beware what you are asking for Wink

बैलोबा चायनीजकर ! >> Happy हि नवीन फॅशन वगैरे नाही. हा फार जुना शब्द आहे आणि कथा कादंबऱ्या मध्ये तर सर्रास वापरला जातो.
आंतरजालावर आणि त्यात हि मराठी भाषेत (आंग्ल भाषेत लिहिताना त्याचा वापर करता येत नाही) लिहिण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढल्याने तो जास्त जाणवू लागला असावा.

Lol.

सकाळी 7 च्या सुमारास कॉलेजला जात असताना-नाशिकला कुंभमेळा होता आणि आमच्या नवी मुंबईत तेव्हा बरेच साधू हत्ती घेऊन फिरत होते
त्याला एक मला म्हणाला बेटा हाथी देखो
मी म्हटलं छान आहे काय नाव याचं ?
गणेश !!!
मग म्हणे पैसे दो -
मी म्हटले कायका पैसा ?
हाथी देखान तुमने ? उसका पैसे दो..10 रुपया

: )

<<उपाशी बोका, तुम्ही भारतात आहात की भारता बाहेर? बाहेर असाल तर अशा लिंका बघुन तुम्ही या व्हिडिओ मधल्या भारतीय साधूंना नावं ठेवण्यापुर्वी डिस्क्लेमर, अमेरिकेतील बेघरांची समस्या, चर्चची वागणूक, हिंदूएतर धर्मांमधील सुधारणा असा जागतीक डेटा जमवून मग काही कमेंट करा हो.>>
कदाचित इथे भारताला नावे ठेवायची नसून लोकांच्या वागणुकीबद्दल कुतुहल असेल. कुणाचा कशात टाईम पास तर कुणाचा कशात!
जर कुणि अमेरिकेतल्या वाईट गोष्टींबद्दल लिहा म्हणाले तर मला माझे आयुष्य पुरणार नाही. मग भारतच बरा म्हणावे लागेल.

<<< जर कुणि अमेरिकेतल्या वाईट गोष्टींबद्दल लिहा म्हणाले तर मला माझे आयुष्य पुरणार नाही. >>>
बरं, मी म्हणतो की अमेरिकेतल्या वाईट गोष्टींबद्दल लिहा. आमच्या माहितीत आणि ज्ञानात भर पडेल जरा.