तुम बिन जाऊँ कहां.. (शतशब्दकथा)

Submitted by मनस्विता on 16 July, 2018 - 02:01

रोजच्यासारखी मुले शाळेला गेली होती. आता शलाकाने आदित्यच्या डब्याची तयारी सुरु केली. जणूकाही एक शर्यत संपली होती आणि क्षणाचीही उसंत न घेता दुसऱ्या शर्यतीसाठी धावायचे होते. करायची कामे आणि हातातील वेळ यांचं व्यस्तप्रमाण तिच्यावरचे दडपण वाढवत होते.

तेवढ्यात आदित्यच्या हातून फ्रिजमधून काढलेली अंडी खाली पडली. झालं शलाकाचा पारा चढला आणि ती त्याला फाडफाड बोलू लागली. खरंतर सकाळच्या कामात मदत करताना झालेला हा अपघात होता त्यामुळे आदित्यही वैतागला. बस झाली ही कटकट, जातोच ऑफिसला म्हणून तो वळला आणि ...

रेडिओवर गाणे लागले 'तुम बिन जाऊँ कहां..'

क्षणार्धात त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलून ओठांवर स्मितहास्य झळकले. अचानक वातावरणातला ताण निवळला अन् शलाकाचाही चेहरा खुलला!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता सकाळीच रेडिओ लाउन ठेवायचा विचार करावा लागेल. Happy
त्यात आणि योग्य वेळी योग्य गाणं वाजवायची जबाबदारी रेडिओचीच.
नैतर भांड्याला भांडं आणि त्यात रेडिओ
कसमे वादे प्यार वफा सब बाते है बातो क्या
कोई किसीका नही ये झुठे नाते है नातो क्या
वाजवायचा Happy

वाह

आता सकाळीच रेडिओ लाउन ठेवायचा विचार करावा लागेल. Happy
त्यात आणि योग्य वेळी योग्य गाणं वाजवायची जबाबदारी रेडिओचीच.
नैतर भांड्याला भांडं आणि त्यात रेडिओ
कसमे वादे प्यार वफा सब बाते है बातो क्या
कोई किसीका नही ये झुठे नाते है नातो क्या
वाजवायचा Happy >> हा हा... खरंय!

मस्तच...सगळ्या घरातून असेच झाले तर किती बरे

Submitted by उमानु on 16 July, 2018 - 12:04 >> हो ना! ही एक प्रकारची fairy tale आहे. कारण आपला इगो इतका मोठा असतो की आपण सहजासहजी राग विसरू शकत नाही.

फारच छान शतशब्दकथा!
सर्वांनी शतशब्दकथांमध्ये, शेवटच्या वाक्यात ट्विस्ट टाकलाय. पण ही त्याच पद्धतीत न लिहिल्यामुळे अजुनच आवडली! Happy

फारच छान शतशब्दकथा!
सर्वांनी शतशब्दकथांमध्ये, शेवटच्या वाक्यात ट्विस्ट टाकलाय. पण ही त्याच पद्धतीत न लिहिल्यामुळे अजुनच आवडली
>>> +११११