पहिल्रे न मी तुला

Submitted by सयुरी on 15 July, 2018 - 13:36

आज राणी जरा लवकरच उठली, कारण ही तसेच होते. आज तीच्या आवडत्या गायकाचा म्हणजेच ईशान कुमारच्या गाण्याचा कार्यक्रम पंधरा मिनिटे लवकर होता. आणि त्याचं गाणं ऐकल्याशिवाय राणीचा दिवस सुरु होणे कठीणच. राणी पेशाने शेफ होती, एकटीच राहायची. त्यामुळे कशाचीच फिकीर नसलेली राणी अगदी बिनधास्त होती. पण तीचा कमकुवतपणा ही होता आणि तो म्हणजे ईशान कुमार. तसे पाहिले तर फार दिवस झाले नसतील त्याचा आवाज ऐकून पण तरीही त्याच्या आवाजाने तीला वेड लावले होते. तीने त्याला कधी पाहिले नव्हते त्यामुळे तो काळा की गोरा हेही तीला माहीत नव्हते. आणि त्यामुळेच तीचे त्याच्यावर मनापासून प्रेम होते. बर्याचदा काम करत असताना तीने विचार केला होता, कसा बरं दिसत असेल हा ईशान कुमार? एवढा छान गातो पण फक्त रेडिओवर. ना कधी टिव्हीमध्ये पाहिले ना कधी सोशिएल मिडीयावर. आवाजावरून तरी तरुणच असावा, आणि हे सगळं मनात चालू असताना तिच्या चेहर्यावरचे भाव पाहून अनेकांना वाटायचं की नक्कीच हिचा कोणीतरी प्रियकर असावा.
नेहमीप्रमाणे आवरून राणी रेस्टॉरंटमध्ये पोहोचली आणि स्वतःच्या कामाला सुरुवात केली.ती एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये काम करत असल्याने तिकडे येणारे लोकही गडगंज श्रीमंत, त्यामुळे एखादा पदार्थ आवडला नसल्यास तो परत पाठवणे नवीन नव्हते.
राणी कामाला तर लागली होती,पण आज मात्र तीचे लक्ष कामात नव्हते. काहिशी अस्वस्थता जाणवत होती, आणि यामध्येच तिचा एक पदार्थ परत किचनमधे आला. तिने फारसे लक्ष न देता पुन्हा त्या गृहस्थांना हवा तसा पदार्थ बनवून पाठवला. पण पुन्हा तेच. तो पदार्थ पुन्हा आत पाठविण्यात आला. आता मात्र राणीचा धीर सुटला, कारण इतक्या दिवसात पहिल्यांदा असे काही घडले होते.पण हेड शेफने समजावल्यावर ती शांत झाली. आणि तेवढ्यात समजले कि त्या गृहस्थानी तो पदार्थ बनवणाऱ्या शेफ ला बाहेर बोलावलं आहे. राणीचं रागीट स्वभाव माहित असल्याने तिच्या सोबत काम करणाऱ्याना त्या गृहस्थांचीच काळजी वाटू लागली होती. पण तिला तसे वागून चालणार नव्हते. राणी बाहेर गेली. मान वर करून तिला त्या माणसाकडे बघायचे पण नव्हते. म्हणून ती शांतपणे डोक्यात राग घेऊन खाली मान घालून ऐकत होती.

"तुम्हाला दोन वेळा सांगितलं मागवलेल्या डीश मध्ये तेल कमी वापरा, आमच्या साहेबाना चालत नाही. " गृहस्थ.
"मला माफ करा मी पुन्हा तुमची डीश बनवून पाठवते, जशी तुम्हाला हवी तशी." राणी.
"धन्यवाद!" गृहस्थ.

राणी तिथून रागातच आत गेली आणि त्यांना हवी तशी डीश तिने बनवून पाठवली. या वेळी मात्र ती डीश काही परत आली नाही. एक सुस्कारा सोडून ती तिच्या पुढच्या कामाला लागली. थोड्याच वेळात हॉटेल चे मॅनेजर किचन मध्ये आले, आणि राणीला त्यांनी राग ताब्यात ठेवून कामाकडे लक्ष द्यायला सांगितले.

"राणी एवढी मोठी माणसाला आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्याकडे येतात तर आपण त्यांना हवी तशी चव देणं महत्त्वाचं आहे." मॅनेजर.
"हो सर! माझं चुकलंच, मी पुन्हा असं होऊ देणार नाही." राणी.
"हम्म! आणि गायक मंडळी म्हटलं कि पथ्य-पाणी तर असणारच." मॅनेजर.
"गायक? ते जे बोलत हॉटेल ते त्यांचे साहेब गायक आहेत का?" राणी.
"हो, ईशान कुमार काहीतरी नाव आहे त्यांचं. रेडिओ वर गातात असं ते गृहस्थ सांगत होते."

हे ऐकताच राणीला काय करावे तेच समजेना, इतके दिवस ज्याला पाहण्यासाठी आपण बेताब झालो होतो तोच माणूस आपल्या हातचं खाऊन गेला पण त्यांना पाहता आला नाही याचा दुःख, राग, आनंद, उत्साह असे बरेच मिश्रित भाव राणीच्या चेहऱ्यावर उमटत होते. मॅनेजर काय बोलत आहेत वैगेरे याचा कसलाही विचार न करता ती बाहेर धावत सुटली. बाहेर आल्यावर तिने त्या टेबलकडे पहिले तर तिकडे कोणीच नव्हतं, म्हणून तिने वेटर ला विचारले तर ते आत्ताच निघून गेले असं तिला समजलं. ते ऐकताच ती बेभान होऊन त्या रेस्टॉरंट च्या मोठ्या हॉल मधून धावत सुटली. तिने बाहेर येऊन पहिले तर नुकतेच ते गृहस्थ गाडीत बसून निघून गेले. राणी ते बघताच त्या गाडीमागे वेड्यासारखी पळू लागली. रस्त्यावरचे लोक तिच्या कडे पाहत आहेत याचेही तिला भान राहिले नव्हते. तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त होता तो ईशान कुमार. तिला वेगाने पळणाऱ्या गाड्यांची जराही पर्वा नव्हती, ती फक्त तिच्या 'त्याला' पाहण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करत होती. रस्त्यावर गाड्या वेगात होत्या आणि त्याच वेगात एका चार चाकीने राणीला जोरात धक्का दिला, तो धक्का एवढा प्रचंड होता कि राणी जागीच ठार झाली. ती तिथेच संपली होती आणि तिच्या सोबत तिची इच्छा. ती त्या उन्हात रक्तबंबाळ होऊन पडली होती. बेवारश्यासारखी. पण ज्याच्यासाठी तिने हे सगळे केले त्याला मात्र या गोष्टीची यत्किंचितही जाणीव नव्हती. पण त्या वेळी त्याच्या गाडीत चालू असलेला गाणं मात्र राणीचं आयुष्य सांगून गेलं.
"पहिले न मी तुला,
तू मला न पाहिले,
कधी कुठे मान वेडे हे गुंतलें...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच

काहीही.
इतकं भेटण्या-बघण्याची इच्छा होती तर कसंही भेटता आलं असतं.
रेडिओ स्टेशन, घरचा पत्ता वैगेरे मिळवुन.
मला आधी गायक आंधळा वैगेरे असेल. असं काहीतरी फिल्मी वाटत होतं. Happy
पण हा शेवट काही झेपला नाही.

विनिता.झक्कास
तुमच्या प्रामाणिक मतासाठी आभार...पुढ्च्या वेळी तुम्हाला 'वेडेपणा' बोलण्याची वेळ नक्कीच येणार नाही.

सस्मित
येथे लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न होता... तुम्ही दिलेल्या गोष्टींची दखल घेतली जाईल... प्रतिसादासाठी धन्यवाद

mr.pandit, poojabhogle, च्र्प्स, आनद, राजसी
धन्यवाद!