काय साधतं?

Submitted by हरिहर. on 13 July, 2018 - 03:12

कसला अहंकार असतो माणसांना नक्की? आणि त्यामुळे काय साधतं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सौंदर्य, शक्ती, विद्वत्ता, संपत्ती!
यात काय साधते म्हणजे दुसरा माझ्यापेक्षा किती कमी आहे ही स्वतःला सुखावणारी जाणीव!

अर्थातच! हाच तर अहंकार ना! स्वतःची ही जाणीव कुरवाळत बसायचं, त्याला खत पाणी घालायचं म्हणजे अहंकार..

मी_आर्या पण त्यातून काय साधतं? छान वाटतं का? आणि जर वाटत असेल तर आपल्याला सुखावानाऱ्या गोष्टी चुकीच्या आहेत याचं वाईट वाटत नाही का? बोच लागत नाही का मनाला?

आणि जर वाटत असेल तर आपल्याला सुखावानाऱ्या गोष्टी चुकीच्या आहेत>>>>>

चुकीच्या आहेत हा तुमचा दृष्टिकोन आहे. जे करताहेत त्यांच्या नजरेत ते बरोबर आहेत. त्यांची नजर बदलेल तेव्हा ते बदलतील.

गोष्टी चुकीच्या आहेत याचं वाईट वाटत नाही का? बोच लागत नाही का मनाला? >> तेव्हा मनाला बोच लागेल तेव्हा तो पश्चाताप असेल.

सौंदर्य, शक्ती, विद्वत्ता, संपत्ती!
यात काय साधते म्हणजे दुसरा माझ्यापेक्षा किती कमी आहे ही स्वतःला सुखावणारी जाणीव!>>>> अरे यात कर्तुत्व पण आहे. मीच कर्ता आणी करविता. माझ्यामुळे केवळ माझ्यामुळेच हे साध्य झाले.

मी मी भोपळ्याची बी.

शाली, आमी बी उत्तरे देणार. वरती तुम्ही भास्कररावांना पण आवताण दिलया. आता भोआकफ. भास्करराव उत्तरे छान देतात, पन मंदी मंदी स्वतःचे कवतीक बी करत्यात.

रश्मी, अहो आमंत्रण नाही दिले, पटकण जी नावे सुचली ती टाकली. मला ज्यांचे विचार आवडतात ईथे त्यांची यादी खुप मोठी आहे. आणि वरील प्रश्नाला ऊत्तर देनाऱ्यांचे स्वागतच आहे.

वोक्के ! धन्यवाद!
अंहकार, आळस आणी पूर्वग्रहदुषीतपणा हे बाई व माणसाचे ३ मुख्य शत्रु असे निदान मी तरी मानते. अनूभवाने आलेले हे शहाणपण आहे. सुदैवाने गुरु भेटले, त्यांनी मार्ग दाखवला. दिव्य अध्यात्मीक अनूभव आले, आणी त्यातुन मी पणा थोडा गळत गेला. थोडा असे मी म्हणलेय, कारण मी पणा म्हणजेच अहंकार हा सहजासहजी नष्ट होत नाही.

आपले विचार, आपली बाजूच बरोबर आहे असे प्रत्येकाला वाटते. पण नाण्याची दुसरी बाजू पण समजावुन घ्यावी. असे म्हणतात की कधी कधी आपला शत्रु देखील आपल्याला चांगला सल्ला देऊन जातो. पण अहंकाराने ग्रस्त माणसे प्रत्येकाला संशयी नजरेनेच बघतात. अहंकारी व्यक्ती कायम दुसर्‍याला कमी लेखते. आपले ज्ञान हे दुसर्‍यापेक्षा वरचढ आहे असे त्यांना वाटत असते. पण कधी कधी आपल्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती/ मुले सुद्धा आपल्याला चांगले व्यवहार ज्ञान देऊन जातात.

परत लिहीन.

अंहकार, आळस आणी पूर्वग्रहदुषीतपणा हे बाई व माणसाचे ३ मुख्य शत्रु असे निदान मी तरी मानते.>>>>+१११११११११११११११११
_____/\____________

तुम्ही एवढे नाव घेऊन बोलावलेत तर लिहायला हवे.... पण तुम्ही नावाची यादी लिहितांना च्रप्स, भभा आयडीजना सेम पेडिग्रीत घालून माझा अहंकार दुखावला आहे..... Proud

लेखातल्या एका लायनीवरून तुमची लेखामागची भावना, हेतू स्पष्ट होत नाहीये... कसे आणि काय लिहिणार ?.. तरी त्याबद्दल काही अंदाज बांधून लिहायचा प्रयत्न करतो.

Attitude ला मराठीत नेमका प्रतिशब्दं सापडला नाही पण आपल्या Attitude साठी कधीही कुणालाही स्पष्टीकरण देऊ नये मग भलेही लोकांनी त्याला अहंकारी, शिष्ट, गर्विष्ठ वगैरे लेबलं लावली तरी. सगळ्यांना समजून घेऊन सांभाळून घेण्याची ऊठाठेव (खासकरून सोशल मिडिया सारख्या आभासी जगात) कोणी का करावी? so if you care then be true to yourself, to who you are. तुमच्या स्वतःसाठी, केवळ ईतरांना चांगले वाटावे म्हणून नाही.

तुमचे मूळ अ‍ॅझम्पशन चुकीचे आहे.. 'हो मला स्वतःला अहंकार आहे' असे कधीच कुणाला वाटत नाही... ईतर लोक म्हणतात हा अहंकारी आहे... तर म्हणोत बापडे त्यांच्यासाठी मी माझा अ‍ॅटिट्यूड का बदलू. मला कोणीतरी (कोणीही) सांगितलेली एखादी गोष्टं/माहिती पटली आणि माझ्यात बदल करावासा वाटला तर करेनही पण तेही माझ्यासाठीच, ईतर म्हणतात म्हणून नाही.
('गर्व से कहो वगैरे......' सांगणे संधीसाधूपणा असतो. )

एखादी कथा/कविता बाळबोध वाटली तर सरळ लिहा 'बाळबोध' आहे.. तिला आपला 'अहंकारचा अभाव' कुरवाळत 'छाने' म्हणण्यात काय हशील? ऊत्तेजन, प्रोत्साहन देणे वगैरे लहान मुलांशी वागतांना योग्य, मोठ्यांशी वागतांना जे खरोखर वाटले ते सांंगावे.
हे सांगतांना शब्दांची निवड कशी करावी हे ज्याच्या त्याच्या संभाषण कौशल्यावर, वकुबावर, कसा प्रभाव पाडायचा आहे आणि आवडी निवडीवर, त्यावेळच्या मूडवर अवलंबून आहे.

अजूनही माझं म्हणणं पोचत नसेल तर हे बघा
https://www.youtube.com/watch?v=XQvcZWCacKE

आत्मविश्वास , अभिमान आणि अहंकार यात अगदी छोटासा फरक आहे.... फक्त 'च' चा. हा फरक फार पूर्वी इथेच चर्चिला गेला होता.

माझ्या भाषेचा, डिग्रीचा, पैशाचा, सौंदर्याचा , घराचा, मुलाचा,कुटुंबाचा असतो तो अभिमान. यात दुसऱ्याला कमी लेखण्याची भावना कमी अधिक प्रमाणात असते.
समजा एखादी गोष्ट मला करता येते तो झाला आत्मविश्वास. यात दुसऱ्याला तुच्छतेची भावना नसते.
आणि ती गोष्ट मला'च' चांगली करता येते , आणखी कोणाला नाही, हा झाला अहंकार!
यात मी सर्वांपेक्षा किती वरचढ, माझ्याशिवाय हे कोणी करूच शकत नाही, ही भावना असते.

हा अहंकार जास्त झाला की येतो तो माज!

एक म्हणजे अहंकार हा असा दागिना आहे जो दुर्बलांना शोभत नाही. त्या योग्यतेचे नसूनही मिरवायचा प्रयत्न कराल तर हास्यास्पद व्हाल.
आणि जर तुम्ही तो अहंकार मिरवायच्या योग्यतेचे असाल तर कित्येक लोकांच्या तुम्ही नावडीचे व्हाल, कित्येक तुमच्यावर जळतील, कित्येक तुम्हाला शिव्या घालतील.
थोडक्यात कोणत्याही स्थितीत अहंकाराला लोकाश्रय नसतो.

आपल्याकडे एक छान म्हण आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार. आणि ते खरेही आहे. जोपर्यंत तुमच्यात अहंकार आहे तोपर्यंत तुम्ही उथळच राहता.
माझ्यातही कित्येक गोष्टींचा अहंकार होता. आजही काही बाबतीत आहेच. पण हळूहळू एकेक दागिना उतरवायचा प्रयत्न चालू आहे. सोशलसाईटबाबत तरी ते जमले आहे. ईथे येताना मी अहंकारलेस अवस्थेतच येतो. त्यामुळे कोणी किती वैयक्तिक वा घालून पाडून बोलले तरी कश्याला ठेच पोहोचत नाही. प्रत्यक्ष आयुष्यातही प्रयत्नपूर्व असे वागायचा प्रयत्न करतोय. हळूहळू प्रवास त्या दिशेने चालू आहे. तिथे पोहोचेपर्यंत अगदी शेवटच्या घटका मोजतोय अशी वेळ येऊ द्यायची नाहीये. कारण तसेही त्यावेळी भल्याभल्यांना अहंकारातील फोलपणा कळतोच.

आणखी एक म्हणजे अश्या कित्येक गोष्टी आहेत ज्यांचा अभिमान बाळगणेही मला आवडत नाही. अहंकाराचेच गोंडस नाव वाटते. जातीव्यवस्था यातूनच जन्माला आली आहे.

अहंकार आणि अभिमाननयांच्याच गटात आणखी एक शब्द वापरला जातो, तो म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. बरेचदा आपण सेल्फ रिस्पेक्ट जपायच्या नावाखाली आपला अहंकारच जपत असतो. सेल्फ रिस्पेक्टचे निकष ठरवायचे अधिकार सर्वस्वी आपल्या हातात असतात. ते निकष शिथिल करत सेल्फ रिस्पेक्टला जेवढे अहंकारापासून दूर नेता येईल तितके न्यायचे.

दुसरा माझ्यापेक्षा कमी आहे ही जाणीव सुखावते?
>>>येस. कारण लहानपणापासूनच आपल्या मनावर बिंबवले जाते, विंनिंग matters. पहिला नंबर आला पाहिजे शाळेत, निदान पहिल्या पाचात तरी, नाहीतर काय फायदा अभ्यास करून. जो पहिला येतो त्याला जाणीव सुखावते की मी सर्वोत्तम आहे. याला बाकीचे पण जबाबदार की ते हेवा करतात. रँकिंग गायब होत असेल आणि फक्त पास ही एकच ग्रेड मिळत असेल तर मात्र हे होणार नाही.
आता आयुष्याकडे वळूया -
बाकीच्यांनी हेवा करणे सोडले तर त्या व्यक्तीचा अहंकार पण गायब होईल. डोन्ट केर अटीटुड पाहिजे. चल आहे तू कोट्याधीश, मी तुला जसा बाकीच्यांना ट्रीट करतो तसेच करणार.

अयुष्यात बाकीच्यांनी हेवा करणे सोडले तर त्या व्यक्तीचा अहंकार पण गायब होईल.
>>>>>>>
दुसर्‍या एखाद्या व्यक्तीचा अहंकार गायब करायला आपण आपला हेवा करायचा स्वभाव का बदलावा? Happy
तसेही जे हुमायुन नेचर नुसार घडते त्यात उगाच ओढून ताणून बदल घडवायला जाऊ नये. दमाने घ्यावे.

हेवा करणे ही सवय कशी?
तुम्ही स्पेसिफिकली त्या पहिला नंबर दुसरा नंबर बद्दल बोलत आहात. पण ते जरी बदलले तरी मानवी मन हेवा करायचा मार्ग शोधूनच काढते.

मद मोह मत्सर लोभ = मानवाच्या सहज वृत्ती (धाग्याच विषय)
आणि त्यातील असमतोलपणा = काम + क्रोध
म्हणून तर हे षड्रिपु मानले जातात.
जेथे जेथे मानवी मन आहे तेथे हे सर्व कमी अधिक प्रमाणात त्याला ग्रासत राहणार हां वैश्विक नियम आहे. आणि जेथे ह्यांचा प्रादुर्भाव कमीकमी होत शून्यवत बनतो तीच असते साधू अवस्था, जी आताच्या कलियुग काळात प्राप्त करणे महाकाठिण असले तरी अशक्य नक्कीच नाही. त्यासाठी कसला संन्यास घ्यायची आवश्यकता नसून संसार करत करत ह्याचा अभ्यास सुरु ठेवणे हे श्रेयस्कर ठरते आणि आपल्या सुखाचे कारणही. पण हे सर्वसामान्यत: जमत नाही किंवा जमण्यासाठी प्रयास केले जात नाही म्हणूनच दुःख निर्माण होते.

एखाद्या गोष्टीचा अहंकार असेल, तर त्याच गोष्टीची बोच कशी वाटणार? (संदर्भ: दुसऱ्याच्या कमीपणाबद्दल असलेला अहंकार) माझ्या मते अहंकार ईर्ष्या असल्याने येतो.
उदाहरण द्यायचे झाल्यास: गणपत खूप गरीब होता, गोपीनाथ त्याचा श्रीमंत मित्र. गोपीच्या दप्तराकडे पाहून गंप्याला वाटे, माझ्याकडे पण असं दप्तर हवं. (ही झाली इच्छा).. बराच तगादा लावून गंप्याला दप्तर भेटत नव्हतं, मग हळू हळू त्याला गोपीनाथचं दप्तर फाडावसं वाटू लागलं (इच्छा पूर्ण न झाल्याने निर्माण झालेली ईर्ष्या). पुढं जाऊन गंप्याला लॉटरी लागली, गरिबीचे दिवस पालटले आता गणपा गोपी पेक्षा मोठा झाला गावात, आणि कधीकाळी आपल्याच बरोबर असलेल्या इतर लोकांबद्दल त्याच्या मनात तुच्छता निर्माण झाली (अहंकार).

मी धागा आत्ता वाचला. आधी काही मजकूर होता आणि आता काढून टाकला आहे का? सध्या असलेल्या एकाच ओळीवरून काहीही संदर्भ लागत नाहीय त्यामुळे काही बोलू शकत नाही. पण तुम्हाला पटकन सुचणाऱ्या नावांमध्ये माझादेखील समावेश आहे हे पाहून माझा अहंकार सुखावला Lol धन्यवाद.

अरेच्चा तो धागापण वाचला नव्हता!
धन्यवाद भरत Happy

जाऊद्यात ओ शाली. नका मनावर घेऊ. बिझिनेस ट्रिक आहे ती त्यांची. काहीजण गोड बोलून दक्षिणा उकळतात तर काहीजण भीती दाखवून...

मानसानी निरलज तरी किती असावे.

यान्नी स्प्श्त लिहिलेय की - च्रप्स, भभा, ॲमी, वांडोबा, आरारा, आमा, हाब आणि ईतर, यांच्याकडुन ऊत्तर अपेक्षित.

म्ग का लिहिताय यांच्या व्यति रिक्त कोनि इक्दे,

ईतर, यांच्याकडुन ऊत्तर अपेक्षित >>. अत्ता फक्त ते ईत् र कुनी दाख्वु नका, शेव्ती अप्मान तो अप्मान : हाहा :

तुम्हाला कसला अहंकार आहे ते लिहा की आधी.
एकोळी धागा काढून लोकांना नावं घेउन प्रश्न विचारणे म्हणजे तुमच्या मते त्या व्यक्तींना अहंकार आहे, सो त्यांना अहंकार आहे हे तुम्हाला का वाटते ते तरी लिहा. आमची तरी करमणूक होईल.

Pages