भारतीय लोकांमुळे इतर जनतेला बसणारे कल्चरल शॉक अर्थात ओरांग इंडिया तमाशा.

Submitted by विक्रमसिंह on 2 July, 2018 - 02:13

प्रवास करताना किंवा परदेशी रहाताना किंवा भारतातच असताना आपल्या मुळे इतर जनतेला किती धक्के आणि त्रास आपण देत असतो याची कल्पनाच न केलेली बरी. इंडोनेशियात असताना आम्ही आपल्या अशा टिपिकल भारतीय पद्धतीला ओरांग इंडिया तमाशा (ओआयटी) म्हणजे भारतीय लोकांचा तमाशा म्हणायचो. ओआयटीची किती तरी उदाहरणे देता येतील

- कुठेही शिस्तीत रांग न लावता एकदम गर्दी करणे, जसा काही जन्माला येतानाच देवाने आपल्याला कायम रांगेत पुढे रहाण्याचा मान दिला आहे. दुकानामधे दुसर्‍या गिर्‍हाइकाशी दुकानदार बोलत असताना आपलेच घोडे पुढे दामटणे हे त्याचे दुसरे रूप.
- परदेशी विमानतळावर भारतात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार व इतर देशात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार यात शिस्तीच्या बाबतीत जमीन अस्मानाचा फरक दिसतो.
- सार्वजनिक अस्वछता आणि स्वछतेच्या आपल्या कल्पना.
- आपल्या मसाल्यांचा घमघमाट. कित्येक ठिकाणी म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना घरे भाड्यानी देताना अटी घातल्या जातात.
- मला ईंडोनेशियात लोक विचारायचे. तुमच्या बायका पोट उघड का टाकतात. (साडी घातलेल्या). बघण्याचा दृष्टीकोन वेगळा पण हाही त्यांच्या साठी शॉकच ना. (हा नुसता शॉक , पण ओआयटी नाही)

बर्‍याच वेळेला आपल्या गावीही नसते की आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होतोय.
तुम्ही पण असे शॉकलेले लोक पाहिले असतील. ओआयटी (त्रास देणारे शॉक) अनुभवले असतील.

टीप : मला आपल्याबद्दल टिका करायची नाही. आपले (भारतीयांचे) कित्येक गुण आवडल्याचे लोक आवर्जून सांगतात. त्याबद्दल वेगळा एक धागा काढायला हरकत नाही. पण बर्‍याच वेळेला आपल्याकडून अनाहूत पणे चुका होउ नयेत ही इच्छा. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

गर्वाने काय मिरवतात आणि कशात कोण चिडतात याची कल्पना आहे. सो असो.
>>> अरे गर्वाची गोष्ट आहे इमिग्रण्ट इंडियन असणं! >>> डोंबल माझं. Rofl इंडियन असलो तरी, अमेरिक्न असलो तरी का मार्शन असलो तरी कुठल्याही जन्माने मिळालेल्या गोष्टीचा गर्व कुणाला असला तर माझे पटणे कठिण आहे.

@सीमा ताई, नाही प्रामाणिकपणे बोलता असं २-३ वर्षांच्या वर गेलेलो नाहीये. पण ऑन कार्ड्स आहे, लेट्स होप फॉर द बेस्ट.

@ऑल, सगळ्यांचे मुद्दे वाचले, काही पटले काही खटकले पण शेवटी पटण्याकडे कल जास्त जातोय :). आता खटकलेले मुद्दे परत डिस्कस करणे म्हणजे रीडंडंट होऊन जाईल, and it leads to no where. so I think now its time for me to introspect and rest my case. Happy

वांडोबा,
फक्त नावातच वांड आहात हो तुम्ही,
वरचा प्रतिसाद आवडला Happy

फक्त करी चा वास येतो का? बरेचसे भारतीय लोक नित्यनियमाने समई-उदबत्ती, धूप-कापूर पण करत असतील त्यांचा वास येत नाही का? मसाल्याचे, घामाचा वास येणे हे मला स्वच्छतेशी संबंधित वाटते. रोज नीट आंघोळ केली आणि रोज धुतलेले कपडे घातले तर असा प्रॉब्लेम सुटेल. बाकी, करी/ मसाल्याचे वास एवढं big deal आहे हे मला आत्ता ह्या वरच्या चर्चेवरून कळलं. पाय चा रेसिझम मुद्द्यात काहीतरी तथ्य असणार.

Submitted by राजसी on 12 July, 2018 - 00:03

--- सहमत आहे.

भारतात प्रत्येक घरातल्या स्वयंपाकाची मसाले वापरण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यांचेही वास वेगवेगळे असतात. कोणाच्या घरी गेलं, किचनमध्ये गेलं तर एक वेगळा वास जाणवतो. तो त्यांच्या मसाल्यांच्या कॉम्बिनेशनचा असतो. शक्यतो हिंग वापरणार्‍यांच्या घरात तो मला तरी येतो. माझ्या घरी कधीच हिंग वापरत नव्हते, पण लग्न झाल्यापासून बायको वापरते. तेव्हा कधी मी दोन चार दिवस बाहेर राहून घरी आलो की पहिल्या दोन तीन सेकंदाला तो वास जाणवतो. असाच वेगळा मसाल्यांचा वास अनेकांच्या 'माजघरात' गेलो तरच येतो. पण त्यांच्या इतर ठिकाणच्या सहवासात कधीही आलेला नाही. (माझे नाक कुत्र्यासारखे आहे)

सिम्बा जी, आपले आभार, जनरली जालीय विश्वात आयडेंटिटी लपून असते मग आल्टरइगोज डोकं काढतात, सगळं काही एकतर कौतुक लुटणे किंवा आपलेच मुद्दे रेटण्याचा "सेल्फ पीआर एक्सरसाईज" होऊन जातो. ते तसे न होता वितंडवाद न होता संवाद व्हावा ह्यासाठी आमचा खारीचा वाटा, हा आता आंबे वगैरे टाईप कोणी अगदीच रिजिड भेटलं तर मात्र ठकासी ठक होतो बुआ फक्त मी. Happy

हेला तात्या भारतात मलाही येत नाही! एक काम करा.
उद्यापासून घराची दारं खिडक्या कायमची बंद करा. एझॉस्टही नको. एसी/ हिटर लावा. कपडे धुवा आणि वाळत टाका आणि जेवण करा. जॅकेट पण ठेवा तिकडेच. दार फक्त जाण्या येण्या करता उघडा. पण घराच्या आतली दारं, बेडरुमचं दार मात्र कायम उघडं ठेवा. असं सतत २ महिने करा आणि मग आपण बोलू. लाकडाच्या घरात राहून हे केलंत तर आणखी उत्तम.

राजसी, रोज आंघोळ केली कपडे धुतले तरी डिओ/ अँटी पर्स्पिरंट लावला नाही तर घामाचा वास येतोच!
जौद्या झालं.
जेम्स भाउ :थंब्स अपः Happy

मला स्वतःला घरातही हे कुकिंग चे वास स्वयंपाकघराच्या बाहेर गेलेले आवडत नाहीत.म्हणजे मस्त हिंग जिरे मोहरी घालून फ्लॉवर बटाटा भाजी केली आणि बेडरुम मध्ये झोपायला गेल्यावर रात्रभर तो फ्लॉवर बटाटा भोवती फिरायला लागला असं नको Happy
गॅस चिमणी खूप गुरगुरते.सध्याचा प्रभावी उपाय म्हणजे फोडणी, भाजी शिजणे, वाढणे हा पूर्ण वेळ गॅस जवळ ची खिडकी उघडी ठेवणे.
कधीकाळी (खूपच वर्षापूर्वी, दॉइश मार्क नुकताच जाऊन युरो जर्मनीत आल्यावर १ वर्षानी, पण आठवण काढलीच पाहिजे Happy ) जर्मनीत होते तेव्हा खिडकी उघडी ठेवायचे.खिडकी भरपूर मोठी (आणि गज वगैरे काही नसलेली काचेचं दार वाली) असल्याने वास निघून जायचेच.थंडी खूप वाजायची.
ऑक्टोबर फेस्ट च्या दरम्यान ग्लु वाईन आणि कोणत्यातरी फॅट मध्ये परतलेलं पोर्क का बीफ का काहीतरी याच्या स्टॉल्स मधून चालत ऑफिस ला जावं लागायचं ते वास प्रचंड डोक्यात जायचे.त्यात पोर्क बीफ पेक्षा त्या परतायला वापरलेलं फॅट उग्र म्हणून जास्त वास असेल.
उग्र असून आवडणारा वास एकच: पावभाजी Happy

वासाचा प्रश्न भारतात पण जाणवतो. मी अत्तर कंपनीत काम करते त्यामुळे नाक तेज असावेच लागते. पण आपण लिफ्ट मध्ये असलो की एक माणूस सातव्या मजल्यावर आत यायचा. त्याची बायको पोरे बाबांना बाय म्हणा यला लिफ्ट परेन्त यायची तो ऑफिस फॉर्मल मध्ये व ती डब्बा बनवून जस्ट हात पुसून आलेली. तर पोळ्या करून भाजल्यावर जो वास येतो पोळी भाजलेल्याचा कणकेचा व पोळ पाटाचा तो सर्व वास त्या माणसा बरोबर लिफ्ट मध्ये ग्राउंड फ्लोअर परेन्त यायचा. एक क्यूट कौटुंबीक क्षण म्हणून मला ऑफेंड व्हायचे नाही पण वास नाका वर असॉल्ट करून जात असेच.

खास भारतीय वास, घरात पूजा अर्चा निर्माल्य( ह्याचा पण एक वास असतो रॉटिंग फ्लावर्स, ) निराम्जन विझवल्या नंतरचा वास,
अगर बत्ती चे वास ( ह्यात टिकावा म्हणोन खूप स्ट्रॉन्ग केमिकल्स टाकलेली असतात) काही लोक डोक्या ला सुगंधी तेल लावतात त्याचा भयानक स्ट्रॉन्ग वास जिम ला जानारे व परत येणारे लोक्स. ह्यांचे बॉडीओडर, स्त्रियांनी लावलेले मंद सुवास व पुरुषांचे उग्र परफ्युमस.

संध्याकाळच्या वॉकला जाताना चार साडेचारला वीकेंडला जे बाप्ये तयार होउन कार मधून उत्साहाने बाहेर पडलेले असतात त्याम्च्या कलोनचे वास लिफ्ट मध्ये असतात. Wink

फिश नेमाने खा णारे, मटन चिकन रोज खाणा रे ते ही देशी मसाल्यांच्या रेसेपीज, वर्स्ट म्हणजे नेमाने गुटखा पान खाणा री व्यक्ती लिफ्ट मधून आली की वास येउन आदळतो. बॉडी केमिस्ट्री बदलते अश्यालोकांची व घामावा टे जे स्त्राव येतात त्यांचा ही वास येतो.

ह्यात जजमेम्टल काही नाही. वस्तुस्थिती लिहीली फक्त.

रजस्वला स्त्री, व इन्कॉटिनन्स चा त्रास असलेले वयस्कर स्त्री पुरुष ह्यांना पण एक सूक्ष्म पण वास येतो. फेर्मोन्स चा वास येतो.

हे नैसर्गिक वास आहेत.

अमा +++१११ हे सग्गळे वास मला नेहेमी येतात इव्हन काही चाव्या /नाणी याना मेटॅलिक वास येतात त्यामुळे खिशात मी क्वचितच नाणी ठेवते
नाण्याला हात लावला कि सारखे हात धूवावेसे वाटतात
आईशप्पथ !! मला वाटत होत मलाच आपल्या जेवणाच्या वासाचा त्रास होतो कि काय !
माझं हि नाक फारच तीक्ष्ण आहे .. आणि असा जेवणाचा वास मला आज्जीबातच आवडत नाही . खूपच त्रास होतो ..
भारतातल्या काहींना हे सांगून पटतच नाही ..इव्हन इथे हि काही भारतीयांना पटत नाही .. जरी त्यांच्या अंगाला खूप वास येत असेल तरी ..
कितीही खिडक्या उघड्या ठेवा पंखे लावा दारा लावा .. द मोमेन्ट तापलेल्या तेलात हिंग हळद टाकली कि वास येतोच कपड्याना/केसांना
याबाबतीत माझ्यापुरते केलेले उपाय :
किचन च्या खिडक्या का य म उघड्या ठेवते , जेवण बनवण्याच्या कपड्यांचा सेट च आहे वेगळा ,शिवाय केसांवर शेफ लोक घालतात ती टोपी किंवा शॉवर कॅप ते घातल्याशिवाय फोडणीचे जेवण करतच नाही Sad
जेवण करताना किचन चा दरवाजा घट्ट लावून घेणे हॉल बेडरूम यांचे हि दरवाजे बंद ! आणि सगळ्यात मुख्य जेवण झाले कि लग्गेच पुढच्या मिनिटाला आंघोळ
त्यातलेत्यात एक निरीक्षण असे कि तुपात जिरे एवढीच फोडणी असेल तर येणारा वास साधारण तासाभराने जातो Wink
अवांतराबद्दल सॉरी

आता विषयाला धरून लिहिते Wink
मागे कोणत्यातरी धाग्यावर मी लिहिल्याप्रमाणे मला कायम बोटं मोडायची सवय आहे ..
आणि त्याचा माझ्या काही कलिग्स ना त्रास होतो /आवडत नाही .. ट्रेन मध्ये जर जोरात मोडली गेली बोट तरी आजूबाजूचे विचित्र नजरेने / आश्चर्याने बघतात
याच कारण मला असं सांगण्यात आलं कि इथे (जर्मनी त ) जास्तकरून तरुण मुलगे बोटं मोडतात .. मुली शक्यतो तसं करत नाहीत म्हणे !! तू मुलगी असून कसं काय बोटं मोडतेस ?! Uhoh
त्यामुळे आता शक्य असेल तर आजूबाजूला कोणी नसेल तर मोडून घेते बोटं Lol

२००० साली जपानला पहिल्यांदा गेलो तेंव्हा भारतीय लोकांना घर सहज मिळायची नाहीत. करीचा वास येतो म्हणून. खरतर प्रत्येक जेवण पद्धतीचा आपापला अरोमा असतोच. देशी लोकांच्या घरून संध्याकाळी फोडणीचा वास येईल तर जपानी लोकांच्या घरून मासा भाजल्याचा. अजून एशिअन लोकांच्या घरून स्टीरफ्राय चा. लहान लाकडी घरे, थंडीमुळे बंद दरवाजे खिडक्या इत्यादी मुळे हाच वास घरातल्या वस्तूंना / कपड्यांना लागणे पण खूप कॉमन होते. पाश्चात्य देशात मिळणाऱ्या अरोमा कॅण्डलस सुद्धा आगीच्या भीतीनी सहज मिळत नसत. पुर्फ्युम वगैरे होतेच पण प्रत्येक कल्चर चे आपले आपले वास असतात. जपानी पार्टीतून नवरा घरी आला कि १० सिगारेट ओढून आलाय असा वाटायचा. (तो सिगारेट ओढत नाहि) पण जपानी लोकांची पार्टी सिगारेट शिवाय होत नाही. प्रत्येक देश / कल्चर ह्यात काही चांगल काही वाईट असेलच पण एकदम टोकाची भूमिका कोणीच घेऊ नये. ज्या संस्कृतीतले जे चांगल घेता येईल ते जरूर घ्यावे. सो वर कोणीतरी लिहिलंय त्याप्रमाणे आपण जेंव्हा दुसर्या देशात कोणत्याही कारणांनी जातो तेंव्हा शक्यतो त्या देशाची बेसिक माहिती करून घ्यावीच. जो नोकरीसाठी परदेशी जातो त्यालाच असिमिलेट व्हायला लागेल हे खरच पण जो देश परदेशी लोकांना बोलावतो आहे, त्याने पण दुसर्या संस्कृतीची माहिती आणि जाणीव ठेवणं गरजेचे आहे. बाकी रांग मोडणे, हुज्जत घालणे, अस्वछ वागणे, हे कुठेही आले / गेले तरी बिग नो नो.

जपानी लोकांना आणि जपान मध्ये अनेक वर्ष राहिल्याने मला बसलेले काही शॉक्स
कॉमन कॉर्रीडोर मध्ये सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून तेल लावून कुरळे केस विंचरणे, इटालियन रेस्तोंरामधल्या जपानी शेफ ला मुळची नॉनवेज डिश ऑल्मोस्ट रेसिपी बदलत वेज करायला सांगणे, सौथइंडिअन पध्दतीने अर्धी वरती गुंडाळणे अश्या बर्याच आहेत.

भारतात स्वयंपाकात वापरात येणार्या मसाल्याची दखल सिंगापुरच्या पंतप्रधानानी पण घेतली होती आणि २०११ सालच्या स्वातंत्रदिनाच्या भाषणात त्याचा उल्लेख केला होता. गुगल वर "Indian Curry Smell , Singapore" दिल्यास ह्याबद्दल माहिती मिळु शकेल. युके मधल्या एका व्रुत्तपत्रानी पण त्याबद्दल interesting लेख छापला होता

https://www.telegraph.co.uk/news/worldnews/asia/singapore/8704107/Singap...

करी स्मेल वरून लोक भलत्याच ट्रॅक वर गेले. बेसिकली, भारतात असाल तर ही गोष्ट सांगून खरंच कळणार नाही. तिथे दारे खिडक्या कायम उघडी असतात. इथे घर अक्षरशः सील्ड असते. (चु़कून कुठून हवा आत बाहेर जात असल्यास लोक तातडीने फिक्स करून घेतात ते!) फक्त आत येण्या जाण्या पुरते दार उघडणार आणि झटकन बंद होणार. अशा परिस्थितीत एसी ची हवा घराताच सतत सर्क्युलेट होते सगळ्या स्वयंपाकच्या फोडण्या मसाल्यांच्या वासासकट. त्यांचे काँबिनेशन होऊन एक उग्र वास लागतो कपड्यांना आणि केसांना सुद्धा. अगदी नाक बंद करून घ्यावेसे वाटते! हे सिम्युलेट करायला मसाल्याची भाजी आणि फोडणीचे वरण /आमटीच्या उअकळत्या पातेल्यांवर एकदा ऑफिस चा शर्ट आळीपाळेने वाफवून पहा ५-५ मिनिटे आणि मग वास घ्या किंवा आणखी बेस्ट तो घालून जा ऑफिस च्या एलेव्हेटर मधे Happy चिवडा, लोणची, मसाले इ. असलेल्या सूटकेस मधे कपडे १ दिवस ठेवले तरी कळेल.

>>अशा परिस्थितीत एसी ची हवा घराताच सतत सर्क्युलेट होते सगळ्या स्वयंपाकच्या फोडण्या मसाल्यांच्या वासासकट. <<

यावर उपाय म्हणुन बहुतेक देसी किचनमध्ये आवर्जुन अप/डाउनड्राफ्ट बसवुन घेतात. थोडं खर्चिक प्रकरण आहे पण पदार्थांचा वास, धुर, तेल्कट्/चिकटपणा इ. त्रास उद्भवत नाहि...

चिवडा, लोणची, मसाले इ. असलेल्या सूटकेस मधे कपडे १ दिवस ठेवले तरी कळेल>> अगदी अगदी .. आणि माझी खूप चिडचिड होते असं करायची वेळ आली तर .. Angry

इव्हन इथल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये (फक्त भारतीय नाही इटालियन जर्मन तुर्किश ग्रीसीश ) जेऊन बाहेर पडले (विशेषतः थंडीच्या दिवसात ) कि सुद्धा अंगाला कपड्याना केसांना वास येतो .. आपल्याच नाही.. इथल्या लोकांच्या कपड्याना सुद्धा
ज्या लोकांच्या घरात जॅकेट ठेवायची/टांगायची (स्टॅन्ड ) जागा किचन ला लागून असते त्यांच्या जॅकेट ला असला भयानक वास येतो .. Uhoh

राज, कुकिंग करताना एक्झॉस्ट फॅन फुल ऑन करणं असतंच पण तरीही खबरदारी घ्यावीच लागते.
हेला, ते केलं जातंच पण रोज तसं खाणं आपल्या पोटाला मानवत नाही. कपड्याला असे वास लागू नयेत म्हणून सतर्क असणं आपल्या हातात आहेच.

मग ते सिनेमात दाखवतात तसं रेस्तराँ मध्ये गेलं की वेटर ग्राहकाचा ओवरकोट्/जाकिट काढून बाहेरच टांगतो. ते त्यासाठीच असावं...

तिकडे गेल्यावर पदार्थही तिकडच्याच वातावरणास सूट होतील असे खाल्ले पायजे.

कैक वेळा सहमत, लोकल फूड, कल्चर ह्यांचा पूर्ण मान राखला पाहिजे, तसेही फोडण्या , हिंग, जिरे, वगैरे तिकडले स्थानिक मसाले नाहीत, किंवा त्या हवेला साजेसे नाहीत. कुठलीही खाद्यपरंपरा ही स्थानिक वातावरणानुसार ओव्हर द पिरियड ऑफ मेनी इयर्स, प्रसंगी हजारो वर्षे सतत उत्क्रांत होत असतात त्याचा आदर करणे गरजेचे आहे, भारतात सुटीला आल्यावर वाटेल तितक्या करीज, अळूची फदफदी, चिकन मसाला, तंदुरी वगैरे खाऊन घ्यावे (तसेही ते इकडे सुटेबल आहेतच). तिथे असताना तिथले स्थानिक फूड खावे, कुठल्या कुठल्या आहेत बरं असल्या खाद्यसंस्कृती, क्रियोल फूड झालं, टेक्समेक्स झालं, उत्तमोत्तम चीज वाईन्स कोल्ड कट्स हॅम, इत्यादी चांगले राहील खायला, हे झालं अमेरिकेचं. युरोप मध्ये तर अतिशय समृद्ध खाद्यपरंपरा आहेत जर्मन प्रेतझेल असो, बेल्जीयन वाफल असोत, खासा फुल इंग्लिश ब्रेकफास्ट असो, स्पॅनिश चुरोज वगैरे असो, भरपूर चविष्ट उत्तमोत्तम ऑप्शन सापडतात. Lol Lol

Pages