अघोरी (शतशब्दकथा)

Submitted by दासानु दास on 11 July, 2018 - 06:23

याच ठिकाणी त्या अघोरीने सैतानाच्या संतुष्टीसाठी निष्पाप जीवांचे बळी दिले होते, एके काळी प्राणदायी मंदिर समजली जाणारी ही जागा आज जीवघेण्या स्मशानात परावर्तित झाली होती.

ईतके बळी दिल्यानंतर तरी आपली इच्छा पूर्ण होणार, हवे असणारे पुण्यफळ प्राप्त होणार या वेड्या आशेने तो अघोरी पुन्हा एकदा आपल्या साधनेत मग्न झाला.

परंतू, हव्यासापोटी तो निसर्गाचे नियम विसरला होता, 'स्मशानात पुण्यफळ नाही तर केवळ भूत-प्रेतच उत्पन्न होतात, आणि ते कोणाचंच कोणत्याही प्रकारे भलं नाही करू शकत!'

कितीतरी महिने घोर तपस्या करून शेवटी तो दिवस उजाडला, ज्या दिवसाची तो ईतक्या वर्षांपासून वाट पहात होता...

......."मिसेस देशपांडे, अभिनंदन! अखेरीस तुम्हाला नातू झालाच, वंशाला दिवा मिळाला..."
_______________________________________________________________________________________
स्त्री भृणहत्या निषेधार्थ!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला समजलंय ते असं... स्मशान म्हणजे दवाखाना, अघोरी- डॉक्टर Light 1 घोर तपस्या- मुलगाच हवा म्हणून केलेले नको नको ते उपाय...

आँ?

सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद! Happy

मला समजलंय ते असं... स्मशान म्हणजे दवाखाना, अघोरी- डॉक्टर Light 1 घोर तपस्या- मुलगाच हवा म्हणून केलेले नको नको ते उपाय...>>> हे पण चालेल!

पण मी लिहिताना, जे आई आणि वडिल गर्भपात करतात ते अघोरी. सैतान म्हणजे इथे सासूला नातू हवाय, म्हणून ती. गर्भातच हत्या करतात, त्या गर्भाचं स्मशान बनवतात. आणि पुन्हा पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न म्हणजे साधना. ९ महिने तपस्या. आणि स्मशानात सोज्ज्वळ नाही, पण डेंजर निघणारा मुलगा, भूत. असा विचार केला होता.

मला व्यवस्थित लिहिता येत नाही म्हणून क्षमस्व!
पुढच्या वेळी भावना व्यवस्थित पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, आशिर्वाद द्या! Happy

Actually प्रत्येक पात्र समजल्यावर पुन्हा वाचली ...छान आहे...तुम्हाला लिहिता येत नाही म्हणू नका...छानच लिहिले आहे... फक्त एखादा keyword मध्येच टाकला असता की समजली असाती... पुलेशू

खूप सुंदर लिहिली आहे. अशा संज्ञा वापरल्यामुळे त्यातली भीषणता पोहोचली आणि जास्त अस्वस्थ करून गेली.

लिहत रहा

आम्ही वाचत राहू

कथा छान आहे