रानभाजी - पेव च्या पानांची भजी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 July, 2018 - 04:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पेवची कोवळी पाने
बेसन १ वाटी
पाव चमचा हिंग
१/२ चमचा हळद
१ चमचा लाल तिखट
थोडी धना-जिरा पावडर (नसली तरी चालते)
गरजेनुसार मीठ
तळण्यासाठी तेल.

१)पेवचे उगवलेले रोपटे.

२) पाने

३)

क्रमवार पाककृती: 

वरील तेल व पाने सोडून सगळे साहित्य एकत्र करावे व थोडे थोडे पाणी टाकून इडलीच्य पिठाप्रमाणे पीठ भिजवावे. त्यात धुतलेली पाने बुडवून घ्यावीत.

बुडवलेली पाने गरम तेलात सोडावीत.

पाने खालून थोडी शिजली वाटली म्हणजे रंग बदलला कि झाऱ्याने पालटावीत.

आता बुडबुडे कमी झाले पाने आत जाऊ लागली कि भजी काढावी. तयार आहे पेवची भजी

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी.
अधिक टिपा: 

पावसाळ्यात पेवची ओसाड जागी बरीच झाडे उगवलेली दिसतात.पेवचे कंद असतात. त्याला कालांतराने सुंदर पांढरी फुले येतात. पेवची रोपे कोवळी असताना त्याची भाजी व भाजी करतात.

महत्वाची सूचना - कोणतीही रानभाजी ओळख पटल्याशिवाय घेऊ नये.

हिच रेसिपी ब्लॉगवरही पाहू शकता. https://gavranmejvani.blogspot.com/

माहितीचा स्रोत: 
निसर्गाच्या गप्पा ग्रुप
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु मस्त रेसिपी आणि फोटो Happy तोंडाला पाणी सुटले.
कित्येक रानभाज्या आणि त्यांचे विविध खाद्यपदार्थ तुझ्यामुळे समजले.

बाय द वे सर्वात शेवटच्या फोटोच्या वरती भाजी व भाजी करतात असं झालंय ते भाजी व भजी असं हवय.
(काही फरक पडत नाही पण तरिही सांगतेय)

जागु मस्त रेसिपी आणि फोटो Happy तोंडाला पाणी सुटले.
कित्येक रानभाज्या आणि त्यांचे विविध खाद्यपदार्थ तुझ्यामुळे समजले+११११११११

अगं ही झाडं आमच्याइकडे खूप आहेत. पण याची भजी /भाजी वगैरे करतात हे मला माहितीच नाही. इथे कोणालाच करताना पण बघितली नाही कधी.
मस्त नवीन भाजी आणि रेसिपी कळली.
जागूताई कडची भजी देखील फोटोत माशांसारखी दिसतायत.>>+1

मस्त रेसीपी... आता जातेच टेकडीवर... तिथे कुर्डु आणि इतर भाज्या खूप येतात.. कुर्डुला आता फुले आली..