अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार?

Submitted by कटप्पा on 7 July, 2018 - 00:24

Long वीकएंड साठी फ्लोरिडा आलो आहे. मी 2 अशा गोष्टी ट्राय केल्या ज्या परत कधीच नाही करणार.

१. ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते.

२. सिगारेट -पहिल्यांदा सुट्टा ओढला- 4 तास गुंगीत होतो. कानावर खडा आता. नेव्हर अगेन !!!

तुमच्या पण असे अनुभव असतील जे एकदा ट्राय केले पण परत कधीच नाही करणार?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजकालच्या "राजाला रोज दिवाळी" लाईफस्टाईल मध्ये तुम्हा मिलेनियल्सनि सुधारासाला नाके मुरडलीत तर मला आश्चर्य नाही वाटत. >> मला मिलेनियल्स मधे धरलंत याबद्दल तुम्हाला एक अख्खी फाइव्ह स्टार Happy

सोमरस म्हणजे दारू. सुधारस म्हणजे साखरेचा पाक + लिंबू . क्वचित वेलची/ केशर

सुधारसात, जायफळ, वेलची, अननस, पपई, आंबा, काजू, बदाम, पिस्ते, चारोळी, खसखस, संतरी, डाळिंबाचे दाणे, नाश्पती, पेरू, चिकू, द्राक्ष, सफरचंद काहीही घालून चांगला लागेल...

पियुष म्हणजे ते श्रीखंडाचं भांडं विसळलेलं पाणीच ना? >> अरेरे , काय डोकं आहे , भांडी विसळलेलं पाणी पण पक्वान्न म्हणून खाऊ घालतात. Lol

.. आणि फालुदा हे अत्यंत ओव्हर हाईप पदार्थ आहेत असं वैम.
>>>>

@ फालुदा,
याआधी कुठेतरी पुण्याला खाल्ला असल्यास एकदा दक्षिण मुंबईत
खाऊन
बघा तो देखील ईस्लामधर्मीय.
मत बदलाल Happy
मी तर त्यासाठी धर्म् बदलायलाही तयार आहे Happy

लहानपणी चौथीत असताना एकदा शाळेतून पळून आलो. आणि घरी सागितले की शाळा सोडली.
का सोडली, कशी सोडली वगैरे काहीच कारण नाही. बस्स सोडली.
काय करणार, निरागस मुलाचे खोटे होते ना..
अर्थात घरच्यांनी ते खोटे पकडले आणि मजबूत चोप दिला.
तेव्हाच ठरवले की यापुढे घरच्यांशी कधी असे खोटे बोलायचे नाही
जे पकडले जाईल.
आजतागायत पाळलेय हे !

>>कृपया त्या सुधारसाची पाककृती कोणी टाकेल का?
नवीन Submitted by विक्षिप्त_मुलगा on 10>>

जर गुलाबजामचा पाक उरला असेल तर तो गरम करुन त्यात लिंबू पिळूनही करता येतो.

नका रे, नका रे...काळजाला घरं पडतायत रे...
सुधारस पोळी - आहाहाहा..शनिवारची सकाळची शाळा संपल्यावर घरी आल्या आल्या सुधारस पोळी काय लागायची. आता गोड नको म्हणून होत नाही पण लग्नाच्या आदल्या दिवशी कढीभात आणि सुधारस पुरी खाणं हे लग्नाच्या दिवशीच्या जेवणाहून भारी वाटायचं.

पियुष- जनसेवामधील मालकांचा, नोकरांचा आणि यच्चयावत स्टेक होल्डर्सचा अपमान सहन करण्याची शक्ती होती पियुषाच्या एकाच घोटात.

लांब पल्ल्याच्या गाडीत दारात बसून पाय पायरीवर टेकवून नेहमीच लोक बसलेले बघितल्यामुळे किती मजा येत असेल असे वाटल्याने एकदा तसे बसून घेतले होते. थोड्या वेळाने गाडी जोरदार पळायला लागल्यावर मागून दार पाठीवर यायला लागल आणि धक्का लागायला लागला. पुरे झाली दारात बसायची हौस म्हणून उठायला लागले, तर आपण वेगामुळे गाडीबाहेर फेकलो जाणार नाही किंवा पाय पायरीवरून निसटणार नाही किंवा उभं राहिलो तर वाऱ्यामुळे तोल / झोक जाणार नाही अशी कशाचीच खात्री वाटेना. पूर्ण दार आणि पॅसेज रिकामा होता कोणाला मदतीला बोलवावं तर. स्टेशन जवळ येतंय असं वाटलं म्हणून क्षणभर हायस वाटलं तर अचानक पायरीवर पाय ठेवून दारात बसलेल्या तरुणाचे प्लॅटफॉर्मला घासून पाय कापले गेले अशी बातमी आठवली. कसं तरी आपण पाठीमागच्या पाठीमागे सरपटत पुरेसे आत गेलो तर उठता येईल अशी कल्पना आली. सतत हलणाऱ्या आणि पाठीला फटके मारणाऱ्या दाराचा आधार घेणे हा काही ऑप्शन नव्हता. दुसऱ्या हाताला पण काही धरायला नव्हते. बाहेरच्या बाजूला असलेल्या पिवळ्या रॉडला धरलेला हात सोडून मागे जायला खूपच willpower लागली पण घसरत उठले एकदाची. परत कधी never ever!

हो,मला पण अश्या गाड्यात पायरीवर बसायचं खूप आकर्षण होतं.पण एकंदर अनुभव आणि घाटात मोठं वळण घेतल्यावर दोन जण बाहेर फेकले गेलेले माझ्या आत्याने पाहिले होते.
आता लोकल्/बस च्या दारात लटकून प्रवास करायची पण इच्छा उरली नाही.माझं आयुष्य असं किरकोळीत संपण्याइतकं स्वस्त नाही.आयडीयली कोणाचंच असू नये.

पियुष म्हणजे ते श्रीखंडाचं भांडं विसळलेलं पाणीच ना? >> अरेरे , काय डोकं आहे , भांडी विसळलेलं पाणी पण पक्वान्न म्हणून खाऊ घालतात. >>> हो ना, विचार करुनच कसेसे व्हायला लागलेय मला , कधी प्यायले नाहीये यापुर्वी अन आता हे वाचल्यावर तर बिग नो.

लोकल्/बस च्या दारात लटकून प्रवास करायची पण इच्छा उरली नाही >>> हे आमचे रोजचेच आहे . दोन स्टेशन आधी उठुन बाहेर जावुन उभे रहायचे. यामागे दोन ऊद्देश, एक म्हणजे समोरची खुप वेळ उभी असते तिला बसायला मिळावे अन दुसरा ऊतरताना बरे पडते.

हा हे धोकादायक आहे यात दुमत नाही. मी स्वत : च दोन-तिनदा वाचलीये. माझा बिपी अचानक लो होतो अन काही कळायच्या आधी मे चक्कर येऊन पडते. यामुळे माझ्या मैत्रिणी शक्यतो मला अगदी बाहेर ऊभी राहु देत नाहित पण तरी कधी कधी पर्याय नसतो.

सुधारस म्हणजे काय नेमकं?
>>> दारू
Submitted by च्रप्स on 10 July, 2018 - 23:42

तुम्हाला लेमोनेड म्हणायचे आहे का?

पियूष हे श्रीखंड पातेले विसळलेले पाणी हे जोक म्हणून आहे.
प्रत्यक्षात रेसिपी वेगळी आहे, काही जणांना खूप आवडते पण(असे ऐकले आहे.)

मी.
बोराच्या अठोळीची भुकटी? >>> नाही हो. वाळवलेल्या बोरांची पावडर असते. बियांची नाही. बोरकुट आवडत नसेल ती गोष्ट निराळी, पण बोराच्या आठोळीची भुकटी नका म्हणू.

लोकलच्या दरवाजात लटकणं नेहमीचंच होतं. दर स्टेशनला खाली उतरुन तिथल्या लोकांना आत चढायला देउन आम्ही पुन्हा दरवाज्यात लटकत रहायचो. एकदा मानखुर्दला असंच खाली उतरलो पण पुन्हा चढायला मिळेना तेव्हा खिडकीवर बाहेरच्या बाजुने उभा राहीलो पाणी जायच्या पन्हळीत बोटं अडकवुन. वाशीला जाताना खाडीवरच्या पुलावर भन्नाट वारा होता (नेहमीच असतो पण त्या दिवशी जास्तच जाणवला) काही लोखंडी खांब झण्ण.. आवाज करत अगदी जवळुन गेले, एकदोन झाडाच्या फांद्या अंगावर आपटल्या, मी पुर्ण शक्ती लावुन घोरपडीसारखा गाडीला चिकटुन रहिलो होतो. शेवटी कधीतरी वाशी स्टेशन आलं आणि मी उतरलो. बोटं सुन्न झाली होती. डब्यातलं कोणी बाहेर येउन ओरडायच्या आधी सबवे मधे पळालो. बरोबरच्या मित्रांनी शिव्या घातल्याच त्या मुकाट ऐकुन घेतल्या.
आयुष्यात पुन्हा कधी लोकल ट्रेन मध्ये खिडकीवर बाहेरच्या बाजुने उभा राहुन प्रवास केला नाही. आता तर वयानुसार दरवाज्यामध्ये उभं रहायला पण नको वाटतं

व्यत्यय ईंच का पिंच Happy
आयुष्यात एकदाच ट्रेनच्या टपावर बसून प्रवास केला आहे. तो देखील योगायोगाने वाशीच्या खाडीवरच. वाशी ते कुर्ला असा. तो सुद्धा भर पावसात. जो प्रवास 20 मिनिटांचा असतो तो पावणेदोन तास चालू होता. त्यात धमाल म्हणजे ट्रेन वाशीच्या पूलावरच साधारण अर्धा पाऊण तासभर होती. सुसाट वारा आणि पाऊस. फुल्ल छैय्या छैय्या नाचावेसे वाटत होते. पण कंट्रोल केले. कारण वारा असा की जरा ढिल दिल्यास जलसमाधी मिळेन. नाईलाजाने कधीतरी दुर्बुद्धी सुचून असा अनुभव पदरी पडतो. मुद्दामून किंवा कसाही आयुष्यात पुन्हा कधीच नाही हे धाडस करणार. तेव्हा जीवाची किंमत कमी वाटायची. आज ईतर काही जीव माझ्यावर अवलंबून असल्याने जास्त आहे..

मार्श-मेल्लोझ Sad लोकांना फार आवडतो हा प्रकार, पण मी पहिल्यान्दा खाल्ला आणि जो काय मला त्रास झाला आहे त्या प्रकारा चा की नंतर कानाला खडा लावला मी !!!

{{{ वाळवलेल्या बोरांची पावडर असते. बियांची नाही.
<<
बियासकट. म्हणून आवडत नाही. वाळलेली बोरं सुंदर लागतात.
नवीन Submitted by आ.रा.रा. on 11 July, 2018 - 17:51 }}}

नुसत्याच बिया नाही किडेदेखील रगडलेले असतात. हाय प्रोटिन कंटेंट.

images (5).jpeg

माझं आवडतं बोरकूट. मिळतंय की अजूनही. लहानपणी आम्ही नागपूरला आजोळी गेलो की चांगलं दळणाचा डब्बा भरेल एव्हढं बोरकुट आणायचो. आणि तळहातावर चमचा चमचाभर घेऊन जिभेने चाटत चाटत घरभर फिरायचो.

बियासकट. म्हणून आवडत नाही. >>> म्हणूनच मला आवडतं. बोरकुट खाताना त्यातील बियांची पावडर मस्तपैकी कुडूम कुडूम लागते. :जिभल्या चाटणारी बाहुली:

Pages