तुम्ही पाहिलेल्या अंधश्रद्धा???

Submitted by कटप्पा on 4 July, 2018 - 12:50

रूम मेट चे आई बाबा इथे अमेरिकेत घरी आले आहेत, आणि रोज बरोबर 6 वाजले संध्याकाळी की लाईट्स चालू करतात. इथे 9 पर्यंत सूर्यप्रकाश असतो, तरी हा प्रकार चालू आहे.
मी कारण विचारले तर म्हणे की लक्ष्मी येते 6 ला दिवे लावले की. वादात पडायची इच्छा नसतेच, त्यामुळे काही बोललो नाही.

मग हळूहळू नीट विचार केला आणि जाणवले की असल्या काही अंधश्रद्धा आपण कळत न कळत मानत असतो.
उदाहरणार्थ - काही लोक रोज दाबून मटण, चिकन खातात पण शनिवार आला की अंडे पण शिवत नाहीत.

आणखी एक- माझा मित्र कार सुरू करताना रिव्हर्स गियर टाकत नाही जरी 1 इंचावर भिंत असेल तरी आधी फॉरवर्ड गियर टाकणार, 1 mm पुढे नेणार गाडी आणि मगच रिव्हर्स.

इतकेच काय मी सुद्धा देवाला लाच देतो, हे काम होऊ दे, इतके पैसे दान देईन, ही सुद्धा अंधश्रद्धाच.

तुम्हाला आठवतायत का अशा अंधश्रद्धा ज्या इतक्या कॉमन आहेत की आपण नकळत follow करत असतो?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते मांजर आडवे गेले तर कोणी लिहिले नाही का..
घुबडही अपशकुनी मानतात.. बहुधा पहाटे दिसू नये म्हणतात..
आमच्या पिंट्याने घरात पाळलेला महिनाभर..

परत ते पहाटेची स्वप्ने खरी होतात..
स्वप्नात आजी दिसली की चांगली बातमी कळते..
पण तेच रडताना दिसली की वाईट घटना घडते..

बंद घड्याळालाही अपशकुनी समजले जाते.
मी वर्षभरापेक्षा जास्त काळ हातात बंद घड्याळ घालत आहे.
ते सुद्धा पावणेबारा वाजलेले

रुन्मेष ने नाव बदललं का???? नाही पिंट्या आला न कमेंट मध्ये म्हणून वाटलं.... करेक्ट मी ईफ आय एम wrong

शुभप्रसंगी काळे कपडे घालू नयेत. अशुभ असतात. Uhoh
कितीतरी सुंदर काळ्या साड्या आणि ड्रेसेस बाद झालेत यामुळे. Sad
पण मग संक्रांतीला कसे चालतात???

शुभप्रसंगी काळे कपडे घालू नयेत. अशुभ असतात.कितीतरी सुंदर ड्रेसेस बाद झालेत यामुळे. >>> +111111
बरेचसे चांगले ड्रेसेस काळ्या रंगाचे आहेत.... एकदा आईशी भांडून हट्टाने पूजेला घातलेला काय होत ते बघायला... पण काहीच वाईट झाल नाही... Happy

नक्की कारण काय आहे पण काळे कपडे न घालण्यामागच....

जसं मी विचारलेलं आजीला आणि मम्मी ला की मधल्या बोटात अंगठी का घालायची नसते... तर म्हणे चांगलं नसतं ते नाही घालावी
कदाचित कोणी अंगठी दाखव असे म्हणाले आणि मधले बोट दाखवले तर वेगळाच अर्थ निघायचा...हे कारण असेल म्हणून मधल्या बोटात अंगठी घालू नये,

Lolzzzz

घुबड दिसू नये म्हणतात, पण आलंच घराच्या आसपास तर त्याला घाण घाण शिव्या द्याव्यात म्हणजे ते निघून जातं.
एकदा आमच्या घराच्या चौथ्या मजल्यावर एक घुबडाचं पिल्लू येऊन बसलं, काहि केल्या जाईना. आणि आम्हाला कुणालाच घाण घाण शिव्या येत नव्ह्त्या (येत असत्या तरिही त्या आई बाबांसमोर उच्चारण्याचं सोडाच, पण येतायत हे मान्य करायला तरी मन धजावलं असतं का? :फिदी:)
मग शेजारच्या एका मुलाला बोलावून आणून त्याला शिव्या द्यायला लावल्या तरी ते घुबडाचं पिल्लू ढिम्म Lol
नंतर आपोआप कंटाळून उडून गेलं

मग शेजारच्या एका मुलाला बोलावून आणून त्याला शिव्या द्यायला लावल्या तरी ते घुबडाचं पिल्लू ढिम्म Lol

हे बाकी कहर होतं !!!!

ऋन्मेष, भभा ह्यांना सोशल मीडिया/त्यातही मराठी आंतरजालावर लवकरच नीट वावरता येईल अशी अंधश्रद्धा पाळणारे खूप लोक (पक्षी आयडी) इथं पाहिलेत. Lol Lol

मग शेजारच्या एका मुलाला बोलावून आणून त्याला शिव्या द्यायला लावल्या तरी ते घुबडाचं पिल्लू ढिम्म>> त्याला काय कळ णार तुमच्या शिव्या आणि अंधश्रद्धा. बर्‍याच अंधश्रद्धा प्राण्या पक्षी जगता बद्दल अति कमी किम्वा चुकीची माहिती ह्यातून उद्भवलेल्या आहेत. त्या पिल्लाला कोरडी जागा व थोडे बर्ड फीड दिले असले तरी बास आहे. पण इथे बॉटनी झूलॉजी बेसिक्स समजून घ्यायचा प्रयत्नच कोण करेल. तुमच्या बद्दल म्हणत नाही दक्षिणा बाई. जनरली म्हण त आहे. उगीच ती रागीट लाल स्मायली टाकू नका कृपया धन्यवाद.

दिवाळीच्या दिवसात घुबडे पकडून त्याम्ची हत्याच करतात बळीच्या नावाखाली कारण ते लक्ष्मीचे वाहन आहे म्हणून. अश्याने संपत्ती कशी वाढू शकेल. खरे तर खूप देखणा पक्षी आहे त्याम्च्या संवर्धनाचे काम करणार्‍या संस्था आहेत महारा ष्ट्रात.

अमा मी अतिशय लहान होते तेव्हाची गोष्ट आहे ही ३०-३२ वर्षापुर्वीची. तेव्हा इतका अवेअरनेस नव्हता हो.

बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट.. सोलापुरात आमच्या मामाच्या घरापासून तिसऱ्या गल्लीत एक नारळाचं झाड होतं जे त्या घराच्या बाल्कनीतुन दिसायचं.. मधल्या दोन्ही गल्लीत लहान बैठी घरे होती. मामांना कामाहुन आल्यावर त्या बाल्कनीत बसायची सवय... मी पहिल्यांदाच सोलापूरला गेलेलो, तर त्या नारळावर नेहमी एक घुबड येऊन बसायचं. मला आठवतं त्यानुसार दिवसभर ते दिसायचं नाही तिथं पण संध्याकाळी मामा येण्याच्या आसपास नक्की असायचं. मामा जेवण होईस्तोवर तिथंच बसायचे, जेवण झाल्यावर पुन्हा बाल्कनीत.. घुबड अगदी मामा जोवर तिथं असायचे तोवर त्या नारळावरच बसून, आणि सतत त्याचं तोंड इकडेच.. मी मामीला विचारलं तेव्हा त्या म्हटल्या की आधी कधी लक्षात नाही आलेलं त्या घुबडाबद्दल. नेमक्या त्याच काळात मामाला brain tumor डिटेक्ट झाला.. ज्या दिवशी मामा वारले त्या दिवसापर्यंत ते घुबड तिथेच असायचं. म्हणजे जवळपास दीड ते दोन वर्षं! मामाची ट्रीटमेंट सुरू असताना दुसऱ्याच गावच्या कुणीतरी साधूने सांगितलं, त्यांची वाट पाहतंय एक घुबड. अगदी दिशा वगैरे सांगितलं होतं त्यानं!

२. नातेवाईकांच्या गावी एक म्हाराज आला, स्वतःला गजानन महाराजांचा अवतार घोषित केलेलं त्यानं, सगळेच लोक जात होते, मी पण गेलो उत्सुकतेपोटी, तोवर मी असला आयटम पाहिला नव्हता. लोक रांग लावून दर्शन घेत होते एका घरात, मी पण लागलो रांगेत. बुवांचा म्हणे मौन व्रत होतं, लोक येत पायापाशी गादीला हात लावत, बाजूच्या ताटात पैसे टाकत पुढे निघत. माझा नंबर येण्याच्या आधीपासून म्हणजे बुवा दृष्टिपथात आल्यापासून मी टक लावून पाहतोय हे बुवांच्या लक्षात आलं, माझ्या मनात एकच विचार बुवा लुबाडतोय मजबूत! मजा चाललीय बुवाची.!
मी बुवासमोर पोचलो, पाया वगैरे पडायचा प्रश्नच नव्हता, मित्राला विचारावं तसं एक हात उंचावून म्हटलो, "कसं काय, बरं चाललंय ना?"
आणि बुवांनी मौनव्रत सोडलं,
"हो, मजेत आहे"
"करा मजा"
"अजून दोन वर्षं थांबावं लागेल" इति बुवा
मी "कशासाठी?"
बुवा- "दोन वर्षं"
"बरं"
बुवांनी मग नाव गाव विचारलं मला,
आणि पुन्हा बाबा मौन व्रत धरून बसले!

दरम्यान भक्त मंडळींपैकी 40 टक्के लोक संतापात, ३० टक्के भक्तिभावाने २० टक्के लोक हे काय चाललंय मोड मध्ये आणि १० टक्के कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे... मोड मध्ये आमचा प्रेमळ संवाद ऐकत होते;)

माझ्याकडे बर्याच आहेत पण मी त्या मानत नसल्याने आता आठवुन लिहायची इच्छा नाही.

घरात तर आई आणी माझी नेहमी खडाजंगी होते यामुळे, पण आता तीने पण सोडुन दिलाय नाद

जेम्स वांड यांचे भभा / ऋ ला उद्देशुन असणारे प्रतिसाद ४ ते ५ धाग्यावर वाचल्यावर माझ्या
जेवां = ऋन्मेष
जेवां = सिम्बा
अशा दोन अंधश्रद्धा दृढ होउ लागल्यात. Lol
दिवे घ्या संबंधितांनी

बरेच दिवस रूनमेश= अडमीन/वेमा अशी माझी अंधश्रद्धा होती. >>
छ्या छ्या वेमांकडे एव्हढा वेळ कसा असणार, हां आता त्यानी आउट्सोर्स केला असेल तर नाही सांगता येणार Wink
बाकी माझी नाविन अंधश्रद्धा..
रुन्म्या= कटप्पा..

मधल्या बोटात अंगठी का घालायची नसते.. << मला अस ऐकल्याच आठवतय की श्राध्दाच्या वेळी किंवा फ्युनेरल च्या विधी मधे गवताच्या ट्वीग ची अंगठी मधल्या बोटात घातली जाते. i may be completely wrong

Pages