कोकाटे कौन बनेगा करोडपतीमध्ये

Submitted by प्रथमाद्वितिया on 5 July, 2018 - 13:25

अत्यंत हृदयस्पर्शी घटना.....

एकदा ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांची निवड बच्चनजींच्या "कौन बनेगा करोडपती" या कार्यक्रमामध्ये झाली. कोकाटे हॉटसीटवरती बसलेले होते. लगेच बच्चनजींनी प्रश्न टाकला,

"शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किती मुस्लिम होते?"

आणि ऐकल्याबरोबर कोकाटेंच्या चेहऱ्यावरील कळी खुलली. बस्स्स्स्स, ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो तो आलाय. आता आपण लिहलेला भुरटा इतिहास वैश्विक होणार म्हणून हृदय आनंदाने भरून आले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले पण एवढ्यात लगेच बच्चनजींनी उत्तराचे ऑपशन्स दिलेत ते पुढील प्रमाणे.
A) 2
B) 4
C) 7
D) एकही नाही.

अरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरे रे रे. आता मात्र पायाखालून जमीन सरकली. चेहऱ्यावरील कळी पूर्ण खुलून धोत्र्याचं फुल झालं. बाजूला दगड असता तर बहुधा बच्चनजींचा चेहरा फुटला असता पण ही तर विचारांची लढाई.

मित्रानो, प्रसंग फार बाका होता. चोहोबाजूनी शत्रू वेढा टाकून बसलेला. इकडे आड तर तिकडे विहीर अशी परिस्थिती झालेली. एका बाजूला बक्षिसाची रक्कम आणि दुसऱ्या बाजूला आयुष्यभर मेहनत करून शिवरायांच्या सैन्यात जबरदस्तीने घुसविलेले मुस्लिम मावळे. एका बाजूला मोहमाया तर दुसऱ्या बाजूला लाखो हृदयांची अवहेलना. पण अशा परिस्थितीही कच खाईल आणि पैश्यांसाठी इमान विकेन तर तो शिवबाचा मावळा कसला? पट्ठ्याने वापरला गनिमी कावा.

"Phone a Friend" ही lifeline वापरली आणि पुरुषोत्तम खेडकर साहेबाना फोन लावला. खेडेकर साहेबसुद्धा प्रश्न एेकून गहिवरले आणि चालून आलेली नामी संधी दवडायची कशाला म्हणून कोकाटेंचं बोलणं मधेच थांबवून आणि नेहमीच्या 57% मध्ये बोनस म्हणून 3% मिळवून सर्वाना ऐकू जाईल अशा आवाजात ओरडले, "60% श्रीमंत 60%, सहावर शून्य साठ साठ....

कोकाटेंनी मध्येच थांबवले आणि असे कुठलेही option उपलब्ध नसल्याचे सांगितले. हुश्श, आता मात्र आवेश ओसरला. माथ्यावरचा सूर्य मावळतीस गेला. कोमात गेलेले खेडेकर शुद्धीवर येईपर्यंत वेळ संपला. फोन कटला.

हाय रे दैवा, कसली ही भयंकर परीक्षा? हेच का फळ आमच्या आयुष्यभराच्या कमाईचं, ही तर आमच्या आत्म्याची अवहेलना. कसा दाखवणार चेहरा आम्ही रयतेस? काय परिणाम होईल त्या कोवळ्या मनावर, ज्या कोवळ्या मनात उगवलेल्या भगव्या पहाटेवर आम्ही हिरवं सावट पसरवलं आणि सर्वधर्मसहिष्णू विचारांवरती ब्राह्मणद्वेषाचा मुलामा चढविला?

पण मावळा डगमगला नाही. लगेच दुसरा गनिमी कावा खेळला. 50-50 ही lifeline वापरली. मग दोनच options उरले.
C) 7
D) एकही नाही.

मग ऑप्शन C) 7 निवडून, technical mistake मुळे 5 चा आकडा डिस्प्ले झाला नाही असा कांगावा करून बाजी मारून न्यायची असा बेत मनात ठरला. पण आपल्या निर्णयात एकटं न पडता बरेच लोक आपल्या सोबत आहेत असं भासवलं तर अजूनच छान, म्हणून शेवटी Public Poll ही lifeline सुद्धा वापरायचं ठरविलं.

पण हाय रे दैवा, आता तर कहरच झाला. 98% लोकांनी option 'D) एकही नाही'ला पसंती दर्शविली. तेलही गेलं नि तूपही गेलं, हाती धुपाटणे आलं. आता मात्र मावळा बावरला. मैदान सोडल्यापेक्षा मरण पत्करावं म्हणून उत्तर दिलं C) 7. उत्तर चुकलं. बच्चनजींनी within second सीट खाली करवून घेतली आणि एकाच प्रश्नात तिन्ही lifeline वापरणारा स्पर्धक म्हणून त्यांचा वेगळा सत्कार करण्यात आला. मागील दरवाज्याने बाहेर पाठवून, जाण्यायेण्याचा खर्च देण्यात आला.

(तीन चार दिवसांपूर्वी कोकाटे बाजारातून छन्नी हातोडा विकत घेताना काही लोकांना आढळल्याची माहिती समोर येत आहे. मादाम तुसा संग्रहालयातील बच्चनजींचा पुतळा तुटण्याची शक्यता दिसते आहे. कुणाची भेट झाल्यास "पुतळा मेणाचा आहे" ही आठवण करून द्यावी.)

लेखक अज्ञात

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

?