अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार?

Submitted by कटप्पा on 7 July, 2018 - 00:24

Long वीकएंड साठी फ्लोरिडा आलो आहे. मी 2 अशा गोष्टी ट्राय केल्या ज्या परत कधीच नाही करणार.

१. ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते.

२. सिगारेट -पहिल्यांदा सुट्टा ओढला- 4 तास गुंगीत होतो. कानावर खडा आता. नेव्हर अगेन !!!

तुमच्या पण असे अनुभव असतील जे एकदा ट्राय केले पण परत कधीच नाही करणार?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहान असताना तंबाकूच्या पत्तीचा तुकडा हळूच तोंडात टाकून बघितला होता (मोठी माणसे का खातात? बघू तरी)... नंतर वॅक वॅक वॅक थू थू थू तोंड वाकडे तिकडे Biggrin ... पुन्हा आयुष्यात कधी नाव सुद्धा काढले नाही Lol

किंगफिशर बियरचा एक घोट. एव्हडी कडू होती कि मेलेल्या माणसाच्या तोंडात ओतली तर जिवंत होईल.

गावच्या ओढ्याला पुलावर पाणी येते. पाण्याला ओढ असते त्यामुळे कोणी पार करत नाही. मी दहावी मधे असताना पार केलेला पेपर होता म्हणुन सोबत सायकलही होती. मधोमध गेल्यावर सायकल वाहुन जाऊ लागली माझा हि तोल जाऊ लागलेला नापास झालो असतो तरी चालले असते असे वाटले. पण सायकल उचलुन घेतली आणि पार केला. पेपरही दिला.
त्यानंतर बारावी मधे आल्यावरही नेमका पेपरच्या दिवशी ओढा आलेला. पण पुन्हा ट्राय केला नाही. आणी आता नवीन पुल बांधलाय. त्यामुळे असा प्रोब्लेम येत नाही.

मित्राने सांगितले म्हणून रिमझीम घातलेल फुलचंद पान खाल्ल होतं, बकाबक ओकलो आणि जे काही विमान उडाल. त्या वासाचीही शिसारी बसलीये आता.

आत्याच्या गावी गेले होते शालेच्या सुटीत. बाकी माझ्याएवढ्या सोबतच्या मुली मशेरी घासत होत्या. मलाही म्हणाल्या तु पण लाव मशेरी. आम्हाला काय होत्येय का? तुलाही नाही होणार.
मी पण दोन बोट मशेरी लावली. आणि जी चक्कर आली. गरगरायला लागलं. मग उलटी झाली तेव्हा बरं वाटलं.
त्यानंतर कधीही मशेरी लावली नाही. म्हणजे घरी मशेरी प्रकार नसल्याने लावण्याचा प्रश्नच आला नाही म्हणा.

१. भांगयुक्त पान खाल्लेले अजाणतेपणे गोड पान म्हणून खायला दिलेले गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत! १८ तास झोपून होतो उलट्या झाल्यावर!

लहान असताना एकदा पप्पा पाटणकर काढा पीत होते , मला वाटले कोक आहे, म्हणुन खुप हट्ट करत अक्षरश: रडुन प्यायले होते .
ईईई भयानक कडु होते, कदाचित विष सुद्दा यापेक्शा गोड असेल असे वाटले होते. परत कधीच पिणार नाही हे नक्की. अगदी कारल्याचा रस देखिल यापेक्षा जास्त गोड लागतो चविला

- ऋन्मेष -

1) सिगारेट, बीअर, व्हिस्की, शॅम्पेन प्रत्येकी एकदा ट्राय केलेय.
बीअर - 7-8 सिप मारले कसे बसे
व्हिस्की - याक्क.. एकच सिप! बास्स !
शॅम्पेन - चक्क आवडली चव Happy
सिगारेट - ना चव ना ढव. लोकं फक्त धूर आत घेत सोडायची मजा कशी घेऊ शकतात आणि त्यात बरबाद कसे होऊ शकतात हे कोडे उकलवायला एकदा ट्राय केलेली. पण आजही ते माझ्यासाठी कोडेच आहे Happy

2) एकदा लहानपणी उत्सुकता मिटवायला मोरारजी देसाई बनायचा प्रयत्न केलेला. फक्त थू थू थू Happy
सुदैवाने ग्लास घासून जागेवर ठेवायची अक्कल होती Happy

3) वॉटरस्पोर्टस - मजा आली पण मरता मरता वाचलो. मग विचार केला जगात ईतरही बरयाच मजा आहेत. आयुष्य धोक्यात आणि जीव टांगणीला लावत का मजा करा. म्हणून ते पहिले आणि शेवटचे.

4) जॉबला लागल्यावर मित्रांसोबत कुतुहल शमवायला डान्सबारमध्ये गेलेलो. मित्र अनुभवी होते मी नवखा. एकाने एक मादक पेय आणून दिले. म्हणाला, हे घे पी. हे पोरीसुद्धा पितात. मी फक्त हसलो. त्या पेयाची किंमतही 280 रुपये होती. हे मला तेव्हा समजले जेव्हा ते मी एका जवळच नाचणारया मुलीला दिले. ती गोंधळली. मी पुन्हा हसलो. म्हणालो, माझ्याकडे तुला द्यायला हेच आहे. जास्त अपेक्षा ठेऊ नकोस. आणि तुझ्याकडचेही मला काही देऊ नकोस. एकंदरीत वातावरण काही भावले नाही. अंगावरच आले. निव्वळ पैश्यांची लयलूट. मित्र सरकारी नोकरीत होते. वरकमाई होत होती. ते उडवायचे असे मार्ग शोधले. वाईट वाटले. कॉलेजमध्ये असताना कधी माझ्यासमोर मान वर करून दारू प्यायले नव्हते. असो. पुन्हा त्यांना कंपनी द्यायला कधी गेलो नाही.

5) एका रॅन्डम नेट (गर्ल) फ्रेंड सोबत डेटला गेलो होतो. फारसा छान अनुभव नव्हता. मग मन सुद्धा खात राहिले. त्यानंतर खरीखुरी गर्लफ्रेंड आयुष्यात आली. आणि एकूणच ऑनलाईन फ्लर्टींग कमी झाली. किंवा ऑनलाईनच राहिली.

6) डिप्लोमाला असताना डिग्रीचा ड्रॉईंगचा पेपर डमी बसलो होतो. मैत्रीखात्यात बसलो होतो. पुन्हा कधी हिंमत केली नाही.

7) बेंचवर फॉर्म्युले लिहून कॉपी करणे माझ्यासाठी फार कॉमन होते. पण एकदा अचानक पेपरच्या दहा मिनिटे आधी जागा बदलली. त्यामुळे नाईलाजाने पहिल्यांदा चीट्स ठेवाव्या लागल्या. जेव्हा वापरायला बाहेर काढली तेव्हाच धाड पडली. मी कसा वाचलो ते माझे मलाच माहिती आहे. निव्वळ नशीबाने दिलेला दुसरा चान्स. पुन्हा कधी मग अशी हिंमत केली नाही.

मधले विषयांतर वेमा ने उडवलेले दिसत आहे. छान !!

माझं आणखी एक -
मित्र एकदा स्त्रीप क्लब ला घेऊन गेला होता- 2 डान्स पण घेतले थोडीही फीलिंग आली नाही. नंतर गिल्टी फील मात्र खूप दिवस होती. नंतर कधीच नाही गेलो ! फर्स्ट n लास्ट.

जेव्हा माणिकचंद मार्केट मध्ये नवीन आला होता तेव्हा खाला होता मित्रा मूळे. मरणाची चक्कर आली होती . नंतर खाण्याची हिम्मत झाली नाही.

आम्ही एकदा लातूरला गेलेलो. रात्रीची बस सकाळी पोहोचायच्या ऐवजी संध्याकाळ होता होता पोहोचली. घाई घाईत काम उरकले आणि निघालो. ज्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी जेवणाचा आग्रह धरला. मला घरी जाण्याची घाई होती, त्यापुढे जेवण महत्वाचे वाटत नव्हते. पण यजमानांचा आग्रह इतका होता कि तो मोडवला नाही. त्या नादात पुण्याकडे जाणारी बस सुटली. यजमान म्हणाले आज इथेच रहा. मला परक्या ठिकाणी परक्या लोकांच्या घरात राहणे योग्य वाटत नव्हते. त्यामुळे संधी घेण्याचे ठरवले. नको नको म्हणत असताना आम्ही रिक्षा करून लातूर बस स्टँड ला पोहोचलो.

पण सकाळपर्यंत काही पुण्याकडे जाणारी बस आलीच नाही. सकाळी सकाळी अकलूज ची (गाव लक्षात नाही ) एक बस होती. कंडक्टर म्हणाला अकलूज हून पुण्याला जा. लवकर जाल. कसे बसे पुण्याला पोहोचलो.

ती संपूर्ण रात्र स्टँडवर काढली. पुन्हा असा चान्स कधी नाही घेणार.

कोलेजात असताना एक चांगली मैत्रीण होती तिचा अचानक किस्स घेतला. ती शॉकड. त्यानंतर ती जी कायमची दुरावली ती दुरावलीच. नंतर खूप प्रयत्न करूनही ती कधी बोलली पण नाही. एका चांगल्या मैत्रिणीला मुकलो. त्यातून बाहेर यायला मला सुद्धा खूप अवघड गेले. पुन्हा अशी चूक कधी झाली नाही. होणार नाही.

परिचित भिन्न लिंगी मैत्री एक टाईम बॉम्ब असते. ठिणगी पेटतेच- कधी 10 दिवसात तर कधी 10 वर्षानंतर. वाईट नका वाटून घेऊ।

एका टिम मेंबरला पर्फॉर्मन्स इशु मुळ फायर करायच होत. पीआयपी प्रोसेस सुरु करायची होती. पण त्या टीम मेंबरचे बरेच पर्सनल प्रॉब्लेम्स चालू होते. मी इमोशनल होवून त्याला संधी द्यायच ठरवल. ट्रेनिंग सेश्न्स सुरू केले. वन ऑफ दी बिगेस्ट मिस्टेक. त्या टीम मेंबर कडून काम करवून घेता घेता नाकीनऊ आले. इमोशनल ड्रेनिंग वेगळेच. तेव्हापासून टिम मेंबर्सचे पर्फॉर्मन्स इशू असतील तर , अतिशय प्रॅक्टीकल अ‍ॅप्रोच ठेवायचा प्रयत्न करते. मधनं मधनं दयाबुद्धी जाग्रुत झाली तरी वरच्या लोकांना (ज्याना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आणि अक्कल आहे) कंन्सल्ट करते आणि त्यांचा सल्ला फॉलो करते.

केसांना हायलाईट्स करायच ठरवल. एक गोल्डन ब्राऊन शेड निवडली. माहित नाही पण केल्यावर ती गोल्डनच दिसत होती. ब्राउन वगैरे काही नव्हती. मधून मधुन तो सोनेरी पट्टा चमकताना पाहून जो धक्का बसला. त्या स्पा वालीचा खुन करावासा वाटत होता. (गन नव्हती नाहितर तो एक किस्सा इथ लिहिता आला असता. Happy ) खुप दिवस लागले ते सगळ निस्तरायला. तेव्हापासून केसांना हायलाईट्सचा धसका घेतलाय मी. आणि परत कधीच केले नाहीत.

Pages