सुपारीबाज राजकुमार हिरानीला अनावृत्त पत्र

Submitted by प्रथमाद्वितिया on 6 July, 2018 - 14:04

सुपारीबाज राजकुमार हिरानीला अनावृत्त पत्र
.
नमस्कार.

सर्वप्रथम संजू या तुझ्या चित्रपटाला मिळत असलेल्या विक्रमी व्यावसायिक यशाबद्दल अभिनंदन. असे यश तुला नवीन नाही. जेवढे मोठे व्यावसायिक यश तेवढे तो चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला. तुझा हा हेतु निश्चितपणे सफल झाला असेल. अर्थात हे यश अनेक कारणांनी डागाळलेले आहे. तू तर आपल्या व्यवसायाशी चक्क व्यभिचार केला आहेस याची तुलाही कल्पना असेल. तू हे केवळ मित्रप्रेमापोटी केलेस, की यात भरपूर पैसा आहे (आणि हे सिद्धही केलेस) म्हणून तू हे ठरवलेस की मित्राची प्रतिमा उजळ करून त्याला पुढेमागे राजकारणात आणण्याचा डाव आहे, याची मला कल्पना नाही. परंतु आपल्या कलेशी व्यभिचार करताना दुसरीकडे तुझ्या या मित्राची प्रतिमा काही भाबड्यांच्या मनामध्ये उजळवण्यात तू यशस्वी झाला आहेस हे नक्की.

सचिन तेंडुलकर, अनेक राजकारणी, चित्रपटक्षेत्रातील लहानमोठे कलावंत या सार्‍यांनी या चित्रपटाचे तोंड भरून कौतुक केले आहे. यामुळे मी या चित्रपटाबद्दल तुला उद्देशून काही लिहिणे याची किंमत कस्पटासमान आहे याची मला कल्पना आहे. तरीही हे सारे मुंबईत राहणारे असूनही मुंबईविरूद्ध जे भयानक षडयंत्र रचण्यात आले, त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार या सर्वांनी केला, हेही सर्वांच्या लक्षात आले आहे. अर्थात असे कौतुक करताना आम्ही चित्रपटाचे कौतुक केले, म्हणजे प्रत्यक्ष घटनेचे समर्थन केले असा त्याचा अर्थ नाही असे म्हणण्यास ते मोकळे आहेत. आता यापुढे या मुंबई बाँबस्फोटात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याची शक्यता इतक्यात यायची नाही. अन्यथा यांना त्याची आठवण करून देता आली असती.

आता तू तुझ्या व्यवसायाशी व्यभिचार केलास म्हणजे नक्की काय केलेस?

सर्वप्रथम एका खासदाराच्या घरामध्ये शस्त्रास्त्रे आणली जातात, याची कोणतीही जबाबदारी या खासदाराने घेतल्याचे दाखवले नाहीस. या खासदाराच्या पत्नीने मदर इंडियाची भूमिका केली होती तेव्हा हाही तिच्याबरोबर होता. मात्र स्वत:वर प्रत्यक्षात वेळ आली तेव्हा याने त्याला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी याला वाचवण्यासाठी राजकारण्यांचे पाय धरले. तू हे दाखवले नाही.

हा बंडूदादा प्रत्यक्षात कोण होता? संजूच्या वडलांनी हाजी मस्तानसारख्या माफियासमोर नर्गिस यांच्याशी लग्न करेनच असे सांगण्याचा पराक्रम केला होता. त्याच धर्तीवर मुलाचाही पराक्रम दाखवण्यासाठी हा प्रसंग बनवलास की नाही?

तू सर्वात मोठा बदमाशपणा केलास तो असा. दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीसशी संजय दत्त याचे संबंध होते हे तू सांगितले नाहीस. संजय दत्तने त्याच्याकडून ही शस्त्रे मागून घेतली हे तू सांगितले नाहीस. याशिवाय दाऊद-अनीस हे तर बॉलिवूडमध्ये दहशत पसरवणारे असल्याचे संजय दत्तला माहित होतेच, पण त्यांच्याकडे एके५७ रायफल्सचे काम काय, हँडग्रेनेड्सचे काम काय, हे प्रश्न संजूला पडलेच नाहीत? त्याने याबाबतीत पोलिसांना कळवले असते, तर कदाचित मुंबईतल्या स्फोटांच्या कटाचा सुगावा आधीच लागू शकला असता. त्याने तसे तर केलेच नाही, उलट ही शस्त्रास्त्रे व हँडग्रेनेड्स ठेवून घेतल्याचे सांगितले ते कशासाठी, तर स्वसंरक्षणासाठी. धमक्या याच्या वडलांना येत होत्या आणि त्यांचे संरक्षण करणार होता हा, या हँडग्रेनेड्सनी आणि एके५७रायफल्सनी. तेही वडलांना न सांगता. बरे, याला जे प्रश्न पडले नाहीत, ते नंतर याच्या वडलांनादेखील पडले नाहीत. अन्यथा आपला मुलगा देशद्रोही आहे कळल्यावर त्याने काय करायला हवे होते हे सांगायला नको.
तरीही ‘मी तर केवळ रायफल ठेवून घेतली’ असा याचा वडलांसमोरचा बचाव तू दाखवलास. या देशद्रोह्यांनी आणून दिलेली शस्त्रास्त्रे संजूने केवळ स्वत:च्या गाडीत ठेवून घेतली नाहीत, तर ज्या गाडीतून शस्त्रास्त्रे ती आणली गेली, ती गाडी तिच्यातील इतर शस्त्रास्त्रांसह व दारूगोळ्यासह तीन दिवस त्याने स्वत:च्या घरात ठेवली होती. तू हे तरी कोठे दाखवलेस? उलट तू काय दाखवलेस, तर आरडीएक्सचा ट्रक त्याच्या घरी असल्याचे कुठल्या तरी वर्तमानपत्रात छापून आलेले कसे खोटे होते! माध्यमांनी असा खोटा प्रचार केला हे दाखवण्यासाठी तुला एक कुडमुड्या संपादक दाखवावा लागला. शिवाय या कुडमुड्यासमोर ‘मेरा बेटा कोई गुजरा वक्त नहीं की जो लौटकर वापस नहीं आ सकता.’ हा बोगस डायलॉग मारण्याची संधी तू याच्या वडलांना दिलीस. एका खासदाराच्या घरामध्ये छोटा राजनसारख्याचा वावर चालू होता, हे सांगायचे तू कसा विसरलास?

आम्ही संजय दत्तपर्यंत कसे पोहोचलो हे सांगताना पोलिस अधिकारी एम. एन. सिंग जाहीरपणे म्हणाले होते की मुंबईतील एका प्रभावी राजकारण्याचा त्यांना फोन आला व त्यांनी युसुफ नलवाला याला पकडून त्याच्याकडून माहिती मिळवण्यास सांगितले. त्याला पकडल्यावर संजय दत्तसह इतरांच्या सहभागाची माहिती त्यानं मिळाली. एम. एन. सिंग यांनी हेदेखील सांगितले की याच राजकारण्याने पुढे याला मदत केली. हा राजकारणी कोण, हे सर्वांनाच माहित आहे. परंतु याला याच्या वडलांनी या राजकारण्याच्या पायावर टाकले, माफी मागायला लावली. या राजकारण्याने हा निर्दोष असल्याचा पवित्रा घेतला आणि त्यामुळे अचानक याच्यावरचे आरोप बदलले गेले हे सर्वांना माहित आहे. हेही तू दाखवले नाहीस. केवळ टेररिस्ट नसल्याची नौटंकी वाजवलीस.

याची तेव्हाच्या आघाडीच्या नायिकांशी प्रेमप्रकरणे होती. त्यांच्यातली एक पुढे हिंदी चित्रपटांची महानायिका बनली, तर दुसरी एका मोठ्या औद्योगिक घराण्याच्या मालकाची पत्नी बनली. याचे याच्या बहिणींशी अतिशय तणावाचे संबंध होते. हे सारेच आता हयात आहेत, त्यांच्या संसारांवर त्याचा परिणाम होईल म्हणून तू ही सारीच प्रकरणे गाळली असतील हे समजू शकतो. परंतु याचा गैरफायदा तू कसा घेतलास ते पुढे सांगितले आहे.

या देशात असे अनेक जण दारू-अमली पदार्थांच्या व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत. त्यांच्यातले अनेकजण व्यसनाशी झगडत त्यापासून मुक्ती मिळवण्यात यश मिळवतात. परंतु यांचे माफियांशी संबंध नसतात, त्यांच्याकडे एके५७ रायफली – हँडग्रेनेड्स वगैरे तर नसतातच नसतात. हे लोक तीनशेपेक्षा अधिक महिलांशी सेक्स करत नसतात. याची वेश्यांची गणती तर वेगळीच. त्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी अमेरिकेला जाण्याची संधीही मिळत नाही. तरीदेखील कल्पना असतानाही दहशतवादी कारवायांमध्ये सामील असलेल्यांशी थेट संबंध ठेवण्याची देशद्रोही कृती करणार्‍या संजूबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी तू या ड्रग्जप्रकरणाचा तू छान उपयोग करून घेतला आहेस. एरवी हा ड्रग्जच्या व्यसनातून बाहेर येण्याबाबत तू गंभीर असतास, तर तू ते विनोदी पद्धतीने दाखवले नसतेस. त्या छपरी मित्राचे पात्र उभे करून त्यावर जेवढा वेळ घालवलास, त्या वेळाचा तुला हे गंभीरपणे दाखवण्यास उपयोग झाला असता. पण तुझा तो हेतु नव्हताच.

एखादी व्यक्ती अनेक कारणांमुळे वादग्रस्त असेल तर त्यातल्या एखाद्या कारणावरून सहानुभूती निर्माण करून घेत त्यापेक्षा कितीतरी भयंकर स्वरूपाच्या कारणाकडे दुर्लक्ष होईल, अशी स्थिती निर्माण करण्याचे कसब तुझ्याकडे चांगलेच आहे. मागे नाही का, मुन्नाभाईमध्ये गुंडांचे उद्योग विनोदी पद्धतीने सादर करून आणि त्यातही गांधींना हाताशी धरून तू तुझ्या याच मित्राला लोकप्रिय करण्यात यशस्वी झाला होतास. त्यामुळे तू इकडे पडद्यावर सहेतुक बदमाशपणा करतो आहेस आणि दुसरीकडे तो रणबीर कपूर अभिनय करण्याचा प्रयत्न करत आहे, हे खरे तर अतिशय हास्यास्पद झालेले आहे. या ठोकळ्याचा अभिनय करण्यात खरे तर काही आव्हानात्मक नाही. तरीदेखील नसलेल्या कथानकातील 'उत्कृष्ट' अभिनयासाठी त्याला मोठमोठी पारितोषके मिळाली तरी आश्चर्य वाटणार नाही.

तेंडुलकरसारख्याला एवढीही समज नसावी की तुझ्या संजूने हँडग्रेनेड्स आणि एके५७ रायफल्स मागवल्यानंतर यात या लोकांचा दुसरा काही मोठा कट आहे, ही साधी गोष्ट याला कळायला हवी होती. त्याने एवढे जरी पोलिसांना सांगितले असते तर मुंबईतील तीनशेएक लोकांचे प्राण वाचू शकले असते आणि कदाचित सातशे-आठशे लोक जखमी झाले नसते. बरे, याला ते ट्विट करण्याची तरी गरज होती का? गप्प बसला असता तर काही बिघडले असते का? की यांना खरोखरच या प्रकाराच्या गांभिर्याची जाणीवच नाही? एरवी तावातावाने बोलणार्‍या सुहेल सेठलाही याबाबतीत तुझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीच आठवण आली हाही योगायोग कसा? त्याची स्मरणशक्ती तर इतकी तल्लख की राजकपूर यांचे चरित्र लिहिताना नर्गिस यांच्याशी असलेल्या त्यांच्या विवाहबाह्य प्रकरणाचा उल्लेखच केला नव्हता हे त्याला आठवले. तसे करण्याचे कारण काय तर त्याच्याशी संबंधित लोक हयात असल्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला असता. याची दुसरी बाजू काय, तर हे संबंध विवाहबाह्य असल्याचे त्या कारणाखाली दडवता आले. तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुझा हा काळा उद्योग खपवू पाहणारा सुहेल उगाचच उघडा पडला. अशा लोकांचेही तुझा चित्रपट चालण्यात सहकार्य आहे हे तुझ्या लक्षात आलेच असेल.

प्रत्यक्षात नसलेल्या व्यक्तिरेखांचा वापर करून त्यांच्यामार्फत सहानुभूती निर्माण करण्याचा तुझा प्रयत्न तर लगेच लक्षात आला. हे न कळण्याइतके पब्लिक बुद्दू आहेत असे तू समजला होता का? उदा. पुस्तक लिहिण्याबाबत लेखिकेचे मतपरिवर्तन घडवून आणले की समोरच्या भाबड्या प्रेक्षकांचेही मत तसे बनलेच. त्याचप्रमाणे नंतर या अस्तित्वात नसलेल्या मित्राला पश्चाताप होऊन त्याचे मतपरिवर्तन झाल्याचे दाखवले की आणखी काही भाबड्यांना पैसे वसूल झाल्यासारखे वाटणार. आणि हा मित्र तरी कसा की याच्या टेररिस्ट असल्यावरून रागावलेला. टेररिस्ट असल्याचे छापून आलेला कागद सदैव खिशात ठेवून फिरणारा. आणि नंतर येरवडा तुरूंगाच्या भिंतीच्या बाहेर येऊन तो तुरूंगातून प्रसारित होणार्‍या एफ.एम. रेडियोवर याचे रडगाणे ऐकल्यावर इतक्या वर्षांच्या आपल्या गैरसमजाबद्दल पश्चाताप होऊन ढसाढसा रडणारा. तसे रडत रडत याने खिशातला तो कागद फाडून टाकला म्हणजे प्रेक्षकांच्या मेंदूला ऑर्गॅझम आलाच समजा. त्यात पुन्हा तुरूंगातून सुटल्यावर हाच अस्तित्वात नसलेला मित्र भेटायला येतो, तेव्हा पुन्हा एकदा असाच ऑर्गॅझम. पाच-दहा मिनिटात दोनदा. ते पाहून ही भाबडी जनता त्याच्या टेररिस्ट नसण्याचे गोडवे गाऊ लागणार यात आश्चर्य ते कसले! अखेर न्यायालयाने याला शिक्षा सुनावताना तो टेररिस्ट नाही हे सांगितले म्हणजे तुझा हेतु सुफळसंपूर्ण झाला; एवढेच नव्हे तर या भाबड्या प्रेक्षकांचेही लक्ष केवळ न्यायालयाने काय सांगितले यावरच खिळून राहते.

अस्तित्वात नसलेली ती लेखिका आणि मित्राचे बहुतांशी बोगस पात्र या चित्रपटातून वगळले असतेस तर तुझा हा डाव कितपत यशस्वी झाला असता? संजूबाबा देशद्रोही किंवा दहशतवादी असण्याचा मुद्दा केवळ बाँबस्फोटांपुरता असल्याचा सोयीस्कर समज करून देऊन त्याचे या माफियांशी प्राचीन काळापासून असलेल्या मित्रत्वाच्या संबंधांवरून तू अगदी अलगदपणे लक्ष वळवलेस. तुझे हे कौशल्य वादातीत. त्याच्यातला माणूस पाहण्याची इच्छा असलेल्यांची देशद्रोहाची कल्पनाच किती भोंगळ असावी हे सहज लक्षात येते. तरी संजूमधला माणूस पाहण्याची इच्छा असल्याचे सांगणार्‍यांचा दांभिकपणा तू तुझ्या अशा विस्कळीत हाताळणीमुळे उघडा पाडलास. कारण तो दहशतवादी नसल्याचे प्रमाणपत्र त्याला देण्याचा तुझा एकमेव हेतु होता.

बॉलिवूडमध्ये दहशत पसरवलेल्यांशी असलेले याचे आधीपासूनचे संबंध, नंतर मुंबई बॉंबस्फोटांच्या निमित्ताने दहशतवादी बनलेल्या याच लोकांशी असलेले याचे संबंध, आता यांचा संबंध केवळ बॉलिवुडपुरता राहिलेला नाही तर हे आता भयंकर दहशतवाद माजवणार आहेत याची कल्पना येऊनही त्याबाबत काही न करणारा संजू देशद्रोहीच आहे हे तुला माहित नसेल असे नाही. परंतु तू तर निव्वळ सुपारी घेऊन चित्रपट बनवण्याचा उद्योग केलास.

बाकी अतिशय विस्कळीत कथा, अतिसामान्य विनोद, सुमार संवाद आणि सुमार संगीत ही तुझ्या चित्रपटाची लक्षणे नव्हेत. म्हणून म्हटले की त्यात रणबीर कपूरने अभिनय करण्याचा प्रयत्न करणे हाही विनोद आहे. विकी कौशल हा एरवी चांगले काम करण्यासाठी ओळखला जातो. त्याचीदेखील तू पूर्ण माती केलीस.

हा दारूडा होताच. ड्रग्जच्या आहारीही गेला होता. पहिली पत्नी ब्रेन ट्युमरवरील उपचारांसाठी अमेरिकेत असताना हा इकडे एका प्रसिद्ध अभिनेत्रीशी प्रेमप्रकरण करत होता. नंतर दुसरे लग्न केल्यावर पती व पत्नी अशा दोघांचेही विवाहबाह्य संबंध होते हे तर आणखी विशेष. याआधी वेश्यांव्यतिरिक्त तीनशेपेक्षा अधिक जणींशी सेक्स, नंतर बॉलिवूडमध्ये दहशत बसवणार्‍या माफियांशी मित्रत्वाचे संबंध आणि नंतर याच मैत्रीतून निव्वळ देशद्रोही उद्योग अशी याची कहाणी. आणि तरी हा माणूस म्हणून नेहमीच चांगला समजला जात होता ही फार मोठी गंमत.

तरीही स्वत:चे डोके बाजूला ठेवणार्‍या कोणाला हा चित्रपट पाहून हा व्यसनमुक्त झाल्याचे कौतुक वाटत असेल किंवा हा दहशतवादी किंवा देशद्रोही नव्हताच अशी कोणाची समजुत पटली असेल, तर तू त्यात यशस्वी झालास असे म्हणावे लागेल.

एकवेळ एका पुस्तकातील दुष्प्रचाराला दुसरे पुस्तक लिहून उत्तर देता येऊ शकेल, परंतु एका चित्रपटातील दुष्प्रचाराला दुसरा चित्रपट काढून उत्तर देणे फार कठीण. त्यामुळे संजय दत्तची निव्वळ काळी प्रतिमा धवल करण्याचा तुझा प्रयत्न कितीही ढिसाळ असला, तरी अनेक भाबड्यांमुळे यशस्वी झाला आहे हे मान्य करावेच लागेल. आता तुझे पाचशे की किती कोटी जमा झाले की त्यातले थोडे खर्च करून आता याच्यावर खरा खरा सिनेमा काढ. काढशील का? तेवढे धाडस दाखवणार का?

'ब्लॅक फ्रायडे' पाहिलास ना? त्यात पोलिस तपासाची काही बाजू झाकली होती असे म्हणतात. तरी दहशतवादी कृत्यात सामील असलेल्या एका सामान्य गुन्हेगाराची माणूसपणाची बाजू दिसली होती. कारण त्यात फालतु विनोद नव्हता की काही नव्हते. त्यात कोणाला कसले प्रमाणपत्र द्यायचे नव्हते. तुला येथेही तसे करायचे असते तर तुला नसलेली बोगस पात्रे त्यात आणता आली नसती. आणि मग महत्त्वाच्या गोष्टी झाकूनही संजूबाबाला सहानुभूती मिळाली नसती. तुला सुपारीबाज म्हणण्याचे हेही एक कारण आहे.

बाकी काही नाही तरी एवढी विक्रमी आर्थिक कमाई करूनही अखेर तू सुपारीबाजांच्या यादीत जाऊन बसलास. ही तुझी खरी कमाई. बाकी पुढे काही पुरस्कार वगैरे मिळाले तर तेही याच सुपारीबाजीसाठी असतील हे लक्षात राहू दे म्हणजे झाले. तू तर या देशद्रोह्यासाठी सुपारी घेतल्यावर 'कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना' या अजरामर गाण्याचा दुरूपयोग करण्याचा बदमाशपणा करण्यासही कमी केले नाहीस.

राजेश कुलकर्णी यांचा लेख.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

प्रथमाद्वितीया यांनी राजेश कुलकर्णीचे हिरानीला लिहिलेले पत्र इथे टाकणे म्हणजे सुपारीबाजपणा समजावा का?

मुळात तुमचा प्रत्येक धागा हा म्हणजे कोणा दुसर्‍याच व्यक्तीची पोस्ट का असते?

चित्रपट पाहून त्यातल काय चांगल काय वाईट ठरवून त्यातील चांगल्या गोष्टींच अनुसरण करणे आणि वाईट गोष्टी पासून लांब राहणे हे सर्वस्वी प्रत्येक प्रेक्षकावर आहे.

बाकी अतिशय विस्कळीत कथा, अतिसामान्य विनोद, सुमार संवाद आणि सुमार संगीत ही तुझ्या चित्रपटाची लक्षणे नव्हेत. म्हणून म्हटले की त्यात रणबीर कपूरने अभिनय करण्याचा प्रयत्न करणे हाही विनोद आहे.>>>
तुम्ही चित्रपट पाहिला का??
एखाद्याची व्यक्तीरेखा साकारणं सोप नाही.

आता मला चित्रपट आवडला म्हणून मी माझ मत मांडल मग भलेही तुम्ही मला वाईट समजा.
जर तुम्ही इतरांची पोस्ट शेअर करू शकता तर मी सुद्धा माझ वैयक्तिक मत मांडू शकते.

चित्रपट पाहून त्यातल काय चांगल काय वाईट ठरवून त्यातील चांगल्या गोष्टींच अनुसरण करणे आणि वाईट गोष्टी पासून लांब राहणे हे सर्वस्वी प्रत्येक प्रेक्षकावर आहे.>>>>>> +111111111111

दुसर्याची व्यक्तीरेखा साकारण सोप नाही...बरेच कष्ट घ्यावे लागतात त्या व्यक्तीरेखेला पडद्यावर न्याय देण्यासाठी...मग ती व्यक्तीरेखा पाॅझिटीव्ह किंवा निगेटीव्ह शेड्स असलेली असो... Happy

प्रथमाद्वितिया ,
कोणी काहीही म्हणो.. तुम लगे रहना... छोडना नही.
ईथे काही वात आणण्यात वाकबगार आयडीजच्या बुडांखाली बुडबुडे तयार करण्याचे पोटेंशिअल दिसते आहे नक्कीच तुमच्यात.
पुलेशु.

कडक पत्र आहे

पण राजकुमार हिराणी मुन्नाभाईमध्ये आधी शाहरूखला घेणार होता. शाहरूखकडे वेळ नव्हता. मग संजय दत्त आला. तर बेनेफिट ऑफ डाऊट राजकुमारला तरी देऊया ...

बाकी काही असो, मला पत्र फार आवडले. चांगलीच मुस्काडात वाजवलीय. पण राजेश कुलकर्णींनी हे पत्र सोशल मिडीयावर हिंदीत लिहीले असते तर बरे झाले असते. आम्हाला अ‍ॅक्टिंगशी मतलब आहे हो, त्या बाँबस्फोटात अनेक लोक गेले, गचकले , तडफडले याच्याशी आम्हाला काय घेणे देणे? ते आमच्या घरचे होते का? आम्ही असल्या लोकांवरच सिनेमा बनवणार, आणी तिकडे हॉलीवुडवाले रामानुजन यांच्यावर सिनेमा बनवणार.

>>रश्मी+१<< +१

नाहि नाहि म्हणता उदात्तीकरण (किंवा गंभीर गुन्हे/प्रसंगावर पांघरुण) झालेलं आहेच. सुनील दत्तवर बायोपिक काढुन त्यात संजय दत्तचा एक चॅप्टर टाकला असता तर ते जास्त योग्य ठरलं असतं...