उपेक्षित (शतशब्दलेख)

Submitted by किल्ली on 29 June, 2018 - 03:09

१०० शब्दांचा लेख अशी श्रेणी असती तर हा लेख तिथे टाकला असता. तूर्तास, एक प्रयोग समजून गोड मानून घ्या.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अगदी वाजत गाजत तिचे आगमन होते, तिच्या येण्याची वार्ता सहज सर्वांना समजते. पण तरीही ती दुर्लक्षित! लक्षवेधक असलेली ती आपल्या अस्तित्वाची जाणीव वारंवार करून देत असते. बरं, ती एकटीच येते असंही नाही, सखे, सवंगडी बरोबर घेऊनच येते. भविष्यात घडू पाहणाऱ्या महत्वाच्या घटनांमध्ये तिचा मोठा वाटा असणार हे माहित असूनही लोक तिला उपेक्षित ठेवतात. तिच्या येण्याविषयी नाना तर्कवितर्क लढवले जातात. ती ओरडून जगाला जाब विचारते आणि तिचा प्रभाव अधिक वाढवते.
तिच्या येण्याने शरीरातला कण अन कण भारून जातो, कुठेही लक्ष लागत नाही.

प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी येणारी, सर्वपरिचित, कुठल्याही ऋतूचं वावडं नसणारी अशी, विशेषकरून लहान मुलं जिला प्रिय आहेत, अशी ती, सर्दी!!

-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शाली ,अंबज्ञ ,आनंद.,पवनपरी11 धन्यवाद Lol Proud
सध्या सर्दीने हैराण असल्यामुळे असंच सुचतंय.. Lol
इतका छान पावसाळा सुरुये, पण आम्ही बघा , काय लिहितोय Lol Lol

छाने! Lol

सुरुवात बघा ना वाचून परत -

अगदी वाजत गाजत तिचे आगमन होते, तिच्या येण्याची वार्ता सहज सर्वांना समजते. पण तरीही ती दुर्लक्षित! लक्षवेधक असलेली ती आपल्या अस्तित्वाची जाणीव वारंवार करून देत असते. बरं, ती एकटीच येते असंही नाही, सखे, सवंगडी बरोबर घेऊनच येते.

Lol