तुम्ही पाहिलेल्या अंधश्रद्धा???

Submitted by कटप्पा on 4 July, 2018 - 12:50

रूम मेट चे आई बाबा इथे अमेरिकेत घरी आले आहेत, आणि रोज बरोबर 6 वाजले संध्याकाळी की लाईट्स चालू करतात. इथे 9 पर्यंत सूर्यप्रकाश असतो, तरी हा प्रकार चालू आहे.
मी कारण विचारले तर म्हणे की लक्ष्मी येते 6 ला दिवे लावले की. वादात पडायची इच्छा नसतेच, त्यामुळे काही बोललो नाही.

मग हळूहळू नीट विचार केला आणि जाणवले की असल्या काही अंधश्रद्धा आपण कळत न कळत मानत असतो.
उदाहरणार्थ - काही लोक रोज दाबून मटण, चिकन खातात पण शनिवार आला की अंडे पण शिवत नाहीत.

आणखी एक- माझा मित्र कार सुरू करताना रिव्हर्स गियर टाकत नाही जरी 1 इंचावर भिंत असेल तरी आधी फॉरवर्ड गियर टाकणार, 1 mm पुढे नेणार गाडी आणि मगच रिव्हर्स.

इतकेच काय मी सुद्धा देवाला लाच देतो, हे काम होऊ दे, इतके पैसे दान देईन, ही सुद्धा अंधश्रद्धाच.

तुम्हाला आठवतायत का अशा अंधश्रद्धा ज्या इतक्या कॉमन आहेत की आपण नकळत follow करत असतो?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यात मोठी अंधश्रद्धा म्हणजे लोक देव मानतात. त्यापुढे बाकी सगळ्या किस झाडकी पत्ती.
>>>>

ईथून तर सुरुवात होते.
हे मी करणीच्या धाग्यावरही लिहिलेले. तुम्ही न बघितलेला देव मानता आणि करणी वगैरे झूठ आहे म्हणत विज्ञानवादी असल्याचा दावा करता हे गंमतीशीर आहे.

पण अनुभवाने एक समजले आहे की लोकांना ईतर अंधश्रद्धांपासून दूर करायचे असेल तर त्यांच्या देवावरील श्रद्धेला तसेच राहू द्यावे. तिथेच घाव घालायला जाल तर लोकं पिसाळून उठतात आणि ईतर अंधश्रद्धांनाही मग पटवून घेत नाहीत.
ज्या समाजाला सुधरवायचे आहे थोडे त्याच्या कलानेही घ्यावे. लोकांचा देवावरचा विश्वास कायम राहू द्यावा. देवाच्या नावावर चालणारया निरुपद्रवी प्रथा चालू द्यावात. पण घातक प्रथांना विरोध करावा.

बाकी आमच्याकडे उंबरठ्यावर बसू किंवा उभेही राहू देत नाही. एकतर आत जा नाही तर बाहेर ये....
Submitted by भन्नाट भास्कर on 5 July, 2018 - 15:37>>>

चांगली आहे ही अंधश्रद्धा! मला आता आमच्या बेडरूमच्या दरवाजात उंबरठा बसवून घेतला पाहिजे. कारण बेडरूममध्ये AC चालू असतांना आई-बाबा कोणीतरी येतात आणि दरवाजातच उभे राहून दरवाजा अर्धा उघडा ठेवून काहीतरी बोलत राहतात. आणि मग विजेचे बिल जास्त येते असेही म्हणतात!!!

कश्याला कोण कडमडायला उंबरठ्यावर शिंकायला जातेय. >> मुद्दाम नाही कुणी जात. उंबरठ्यावर उभे असताना शिंक आली तर पुढे किंवा मागे उतरतात. त्यातही डावीकडे शिंकलं तर अमुक आणि उजवीकडे शिंकलं तर तमुक असंही आहे.

घरातून कुणी बाहेर पडलं की लगेच केर काढू नये किंवा आंघोळीलाही जाऊ नये असं आजी सांगायची. याचं कारण बहुतेक असं असेल की कुणी वारलं की अंत्यसंस्कारांनंतर लगेच घरात हे करतात, म्हणून एरवी करू नये.

अग्निशमन दलाची गाडी दिसली तर, गाढव ओरडतानाचा आवाज आला तर पटकन डोक्यावर हात ठेवायह्चा. घरी जाउन गोड खायला मिळते.
Submitted by मी_आर्या on 5 July, 2018 - 15:50>>>>

पोट धरून हसलो बुवा!!!
गाढवांचंं एकवेळ ठीक आहे, ती अनादी काळापासून ओरडत आली आहेत. पण अग्निशमन दलाची गाडी तर ब्रिटिशांनी आणली ना आपल्याकडे? मग ही अंधश्रद्धा कधी जन्माला आली????

<<घरातून कुणी बाहेर पडलं की लगेच केर काढू नये किंवा आंघोळीलाही जाऊ नये असं आजी सांगायची. याचं कारण बहुतेक असं असेल की कुणी वारलं की अंत्यसंस्कारांनंतर लगेच घरात हे करतात, म्हणून एरवी करू नये.<<
हो हो, हे पण आहे अजुनही.

इकडे शतकी धागा विणणारा प्रत्येक आयडी हां 'ऋ'चाच असतो ही अंधश्रद्धा पाहायला मिळाली.
>>> लोल...

अग्निशमन दलाची गाडी दिसली तर, गाढव ओरडतानाचा आवाज आला तर पटकन डोक्यावर हात ठेवायह्चा. घरी जाउन गोड खायला मिळते.
>>> हा हा

अजून एक .... रस्त्यातून चालत जाताना गाढव दिसलं की हाताच्या मुठी घट्ट आवळून ठेवायच्या . का? अक्कल जाते आपली Lol

सोमवारी केस धुवू नये मुलींनी . का? भावाच्या जीवाला धोका असतो

कात्री किंवा सूरी देताना सरळ हातात देऊ नये
का?? त्या व्यक्तींमध्ये भांडण होते . देते वेळी खाली ठेवायच्या या वस्तू...

सॅ नॅ उघड्या वर टाकू नये , पाल किंवा उंदीर ने खाल्लं तर आपण मरतो Lol

सोमवारी केस धुवू नये मुलींनी . का? भावाच्या जीवाला धोका असतो >>
वेळ लागतो बाथरुम एंगेज राहत जास्त वेळ, आणि सोमवारी उठायला उशीर झालेला असतो म्हणून Wink
कात्री किंवा सूरी देताना सरळ हातात देऊ नये
चुकुन हातात घुसु शकते
सॅ नॅ उघड्या वर टाकू नये , पाल किंवा उंदीर ने खाल्लं तर आपण मरतो >>
उघड्यावर टाकनं हाय्जेनिक नहिये पण तासं सांगितल्यावर आपण भारतीय ऐकणार नाही म्हनू अंश्रच्या माध्यमातुन सागावे लागते.
ह.घ्या.

वरील एकेक अंधश्रद्धा वाचत असताना आमच्या लहानपणी आम्हां मुलांमध्ये एक (अंध)श्रद्धा होती, ज्याची आठवण येऊन मला अजूनही हसायला येतेय.

रस्त्याने जाताना आम्हाला एखादा कुत्रा शी-शी करताना दिसला, की आम्ही सर्व मुले कुत्र्याकडे बघत स्वतःच्या दोन्ही हाताच्या तर्जनी एकमेकांत अडकवून जोर लाऊन विरुद्ध दिशेला ओढायचो. आणि एकमेकांना म्हणायचो. "बघ! बघ! आता कुत्रा शी-शी करायचा थांबेल, बघ!" आणि काय आश्चर्य! कुत्रा खरोखरच आपली आलेली शी करायची अर्धवट टाकून निघून जायचा. निदान आम्हाला तरी आमच्यामुळेच तसे झाले अशी (अंध)श्रद्धा असायची. Lol

बऱ्याच वर्षांपूर्वी एकदा लक्षात आलं (इसवी सन २००० पूर्वी) की जेट एअरवेजमध्ये row number 13 नसतोच. मग कळाले की जगातील अनेक प्रख्यात एरलाईन्समध्येही नसतो.

आगीचा बंब गेला की एकमेकांच्या डोक्यावर टपल्या मारायचा हा खेळ आम्हीही करायचो. नंतर अक्कल आली तसे जाणवले की आगीचा बंब जातोय म्हणजे काहीतरी दुर्घटना घडलीय आणि आपण खेळ कसले करतोय..

(कमकुवत मनाच्या व्यक्तींनी कृपया हा व्हिडीओ पाहू नये. यातील दृश्ये विचलीत करणारी आहेत )
ही अंधश्रद्धा ?
https://www.facebook.com/138345670157211/videos/182259335765844/?hc_ref=...

>>--अरे पण मला भाऊच नाहीये.

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत....

सोमवारी केस धुवून सगळ्या देश बंधुंचा जीव तुम्ही धोक्यात टाकताय चिन्मयी.

कोणाचे पैसे द्यायचे असतील तर मंगळवारी द्यावेत. तेच आपलं येणं असेल तर बुधवारी घ्यावं.>>>>>
हा असा व्यवहार कधी पूर्णत्वास पोहोचेल असं वाटत नाही.

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत....

सोमवारी केस धुवून सगळ्या देश बंधुंचा जीव तुम्ही धोक्यात टाकताय चिन्मयी.>>>>अरे बाप रे... Uhoh Proud

डिस्क्लेमर: फक्त विरंगुळा म्हणून वाचण्यासाठी लिहित आहे. पसरवण्यासाठी नव्हे Happy
(मला वाटते हा डिस्क्लेमर धाग्याच्या विषयातच असायला हवा होता)

>> माझा मित्र कार सुरू करताना रिव्हर्स गियर टाकत नाही

हो. हे मी सुद्धा बघितले आहे. त्या व्यक्तींना विचारले तर म्हणे प्रवासाची (विशेष करून चांगल्या कामासाठी जात असेल तर) सुरवातच मागचा गियर टाकून नको असे काहीसे असते म्हणे. माझ्या मते दुबळी मानसिकता बाकी काही नाही.

या व्यतिरिक्त माझ्या पाहण्यातील अंधश्रद्धा:

१. हातातल्या कात्रीचे किंवा चाकू/सुरी चे टोक चुकून स्वत:कडे किंवा बाजूच्या अन्य व्यक्तीकडे वळले तर ते टोक तीन वेळा लाकडावर आपटायचे (अन्यथा त्या व्यक्तीस भविष्यात शस्त्रापासून धोका राहतो म्हणे)

२. मांडी घालून उताणे झोपू नये (याचे कारण मृतदेहाला असे झोपवतात हे असावे)

३. दक्षिण दिशेला पाय (कि डोके) करून झोपू नये. (हे विज्ञानाने सिद्ध झालेय का? पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा मेंदूवर अनिष्ट परिणाम होतो असे याचे कारण दिले जाते)

४. लहान बाळाची ते झोपलेले असताना पप्पी घेऊ नये (कारण माहित नाही)

५. घरामध्ये सायंकाळची (चार नंतर) सूर्यकिरणे येऊ नयेत. (वास्तूशास्त्र या नावाखाली ज्या काही असंख्य श्रद्धा/अंधश्रद्धा आहेत त्यातलीच हि एक. वास्तुशास्त्र या विषयावर एक वेगळाच धागा होऊ शकेल)

६. लहानपणी हे एक असायचे: बोलताना पाल चुकचुकली कि जे बोलले जात असते ते खरे असते (काहीही!)

७. रात्री घराबाहेर कुत्रे रडत असेल तर ते अशुभ असते (लहानपणी आमच्या इथे जवळ एक साखर कारखाना होता. त्याचा भोंगा झाला कि आमच्या कुत्र्याला वाटायचे दूरवर दुसरे कुत्रे रडत आहे. म्हणून भोंगा संपला रे संपला कि हे पण त्याच आवाजात सुरु करायचे Biggrin )

८. पाहुण्यांना सरबत करताना लिंबू उभा कापू नये (कारण भुताला उतारा टाकायचा असेल तरच तो उभा कापतात म्हणून Lol )

९. बाळाच्या जावळाचे केस वाहत्या प्रवाहातच (नदीत) सोडावेत (कारण माहित नाही)

१०. कपडा फाटला/उसवला असेल तर तो अंगावर ठेवूनच शिवू नये (कारण माहित नाही. कदाचित सुई लागू शकते म्हणून असेल)

११. फक्त दहाच अंधश्रद्धा लिहू नयेत (जस्ट किडिंग! Lol )

शी येत असेल आणि ती थांबवायची असेल तर कडुनिंबाच्या झाडाला वाकडे दाखवावे. कशी काय माहित जोराजोरात वाकडे दाखवले की थोड्या वेळात प्रेशर गायब.
साळुंख्यांची जोडी दिसली की, तर्जनी व मध्यमा एकत्र जोडून त्याची तिनदा पप्पी घ्यायची, दिवस चांगला जातो..

अजुन धागा चीन आणि आफ्रिकापर्यन्त पोहोचला नाहीये Proud म्हणून ह्या आपल्याकडच्या अंधश्रद्धा आपल्याला फार वाटत असतील.
पण गेंडयाचे शिंग, वाघ नखे अन् इतर अवयव तसेच समुद्री घोड़ा मासा ह्याबाबत तस्करी होण्याची प्रमुख कारणे पाहिली तर नको त्या विषयातील अप्राकृतिक शक्ति मिळवण्याबाबतची अंधश्रद्धा हेच मुख्य कारण असते.

साळुंख्यांची जोडी दिसली की, तर्जनी व मध्यमा एकत्र जोडून त्याची तिनदा पप्पी घ्यायची,
>>>>

त्याची म्हणजे जोडीची घ्यायची की फक्त नराची पप्पी घ्यायची?

शी येत असेल आणि ती थांबवायची असेल तर कडुनिंबाच्या झाडाला वाकडे दाखवावे
>>>>>
त्यापेक्षा बेंबीत बोट टाकून हलवावे. हि अंधश्रद्धा नाही. मी असे करून कित्येकदा बिकट प्रसंगातून सहीसलामत बचावलोय.

{{{ कोणाचे पैसे द्यायचे असतील तर मंगळवारी द्यावेत. तेच आपलं येणं असेल तर बुधवारी घ्यावं.>>>>>
हा असा व्यवहार कधी पूर्णत्वास पोहोचेल असं वाटत नाही.
नवीन Submitted by सूनटून्या on 6 July, 2018 - 10:07 }}}

याकरिताच व्यवहारात मध्यस्थाची (दलाल / एजंट) नेमणूक झाली असावी. आपण आपलं देणं मंगळवारी दलालाला द्यावे. त्याने ते बुधवारी दुसर्‍या पक्षास द्यावे.

माझ्या ऑफिसच्या बिल्डिंगला १३वा मजला नाहीये.
आणि मेकरच्या आजुबाजुच्या कुठल्याच बिल्डिंगमधेही १३वा मजला नाहीये असं लिफ्ट्मनने सांगितले.

नोट देताना दोन बोटांच्या मध्ये देऊ नये, कात्री लागते इन्कमला..
संध्याकाळी पैशांचे व्यवहार करू नये..
शनीवारी दाढी, हेयरकट, नख कापू नये...

शी येत असेल आणि ती थांबवायची असेल तर कडुनिंबाच्या झाडाला वाकडे दाखवावे. कशी काय माहित जोराजोरात वाकडे दाखवले की थोड्या वेळात प्रेशर गायब. >>>> हे लहान पणी करत असू... काहीही... Lol
लहान बाळांच्या बाबतीतल्या अंश्र जास्त पाळल्या जातात.
१. दृष्ट काढणे, तीट लावणे. तिन्हीसांजेला बाहेर न नेणे. इ.इ.

Pages