मराठी बोलताना तुम्ही कुठले ईंग्रजी शब्द सर्रास वापरता?

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अपलोड on 5 July, 2018 - 10:53

आपल्याकडे मराठी बोलताना मध्ये हिंदी शब्द वापरले की ते कानांना खड्यासारखे टोचतात. काय तर आपल्याला त्याची सवय नसते. पण तेच ईंग्रजी या परकीय भाषेतील शब्द वापरले तर ते कानांना गोड वाटतात. काय तर सर्वांनाच आता त्या भाषेची सवय झाली आहे.

पण पिढी दर पिढी आपल्या मराठीतील ईंग्रजी शब्दांची टक्केवारी वाढू लागली आहे. येत्या पिढीत जी मुलेही ईंग्रजी माध्यमात शिकली आहेत आणि ज्यांच्या गेल्या तीन पिढ्याही ईंग्रजी माध्यमातच शिकल्या आहेत अश्यांच्या मराठी शब्दकोषावर ईंग्रजीचे अतिक्रमण वाढतच जाणार.

तर कुठेतरी हे थांबवायला हवे. आणि ते थांबवायची पहिली पायरी म्हणजे आपण कोणते ईंग्रजी शब्द सर्रास वापरतो याची यादी तयार करणे. ती झाली की मग त्यांचे पर्यायी शब्द तोंडी रुळवणे हे ज्याचे त्यालाच करावे लागणार.

आता ईथे काही शब्द ईंग्रजीतच बरे वाटतात किंवा त्यांचे मराठी प्रतिशब्द अवघड असतात. जसे की बस, ट्रेन, क्रिकेट, फूटबॉल, मोबाईल, चार्जर, थॅंक्यू, सॉरी, प्लीज .. ईथे धन्यवाद, क्षमस्व, कृपया हे शब्द काही अवघड नाहीत, पण रोज कामकाजानिमित्त प्लीज थॅंक्यू हे ईंग्रजी भाषेत बोलणे सोयीचे पडते.

पण काही शब्द उगाचच आपण सवयीने ईंग्रजीत बोलतो, किंवा तशी सवय लाऊन घेतली आहे. जे मराठीत बदलता येऊ शकतात त्यांची ईकडे यादी करूया.

फॅन - पंखा - एसी ऑन कर - एसी चालू कर
टाईम काय झाला? वेळ काय झाली?
आज मी लेट आलो - आज उशीर झाला
माझी कॅप कुठे गेली - माझी टोपी कुठे गेली - या पेनाची कॅप कुठे गेली - या पेनाचे टोपण कुठे गेले?
खूप टाईट बसलाय - खूप घट्ट बसलेय,
आज नाश्त्याला ब्रेड चालेल का? - पाव चालेल का?
विंडोसीटवर कोण बसलेय - खिडकीजवळ कोण बसलेय
हॅंकी दे ना प्लीज - रुमाल बोलू शकतो, भले ब्रांडेड का असेना
आज ऑफिसला नाही गेलास? - आज कामावर नाही गेलास?
आज फुल धमाल आली - आज खूप धमाल आली, खूप मजा केली
टेंशन कशाला घेतोयस? जास्त लोड घेऊ नकोस - चिंता कश्याला करतोयस? जास्त काळजी करू नकोस?
बिग बॉस - म्हणे मराठीत बोला - रेशम तू आज सेफ आहेस.. सई तू अनसेफ आहेस - अरे सुरक्षित बोला..
एक एक्स्ट्रा प्लेट मिळेल का? - एक आणखी ताटली मिळेल का ...
ब्लू, ब्लॅक, ग्रीन - काळा, निळा, हिरवा..
संडे, मंडे - सोमवार मंगळवार ..
हाफ - अर्धा, फुल - पुर्ण ...

लिस्ट वाढतच जाईल... पुढचे प्रतिसादात लिहितो..

बरेचसे मराठी शब्द आपण हळूहळू वापरणे सोडून दिल्याने ते वापरणे आता जुनाट वाटू लागले आहेत, आपल्यालाच काही मराठी शब्दांची लाज वाटू लागली आहे. तर हे प्रामाणिकपणे कबूल करत अश्या शब्दांचीही लिस्ट काढूया. काही तोंडात रुळलेले ईंग्रजी शब्द सोडून पुन्हा जुनाट मराठी शब्द वापरणे आपल्याला सोयीचे जाणार नाही, जमणारही नाही. पण जे शक्य आहे ते बदलता येतीलच.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न थकता, न कंटाळता धाग्यावर धागे काढण्याचे आपले कसब कौतुकास्पद आहे. असे माझे २ शब्द बोलून खाली बसतो.

हल्ली मी धागे काढत नाही. तुम्ही काही नवीन आयडी माझ्या नावावर मोजत असाल तर कल्पना नाही. आज सुट्टी होती म्हणून माबोवर जास्त रमता आले आणि हा धागाही काढता आला. जो फक्त आणि फक्त मराठीवरच्या प्रेमापायी काढला आहे.

अन्यथा एक दिवस असा येईल की आपण एका मराठी वाक्यात सरासरी 85 टक्के शब्द ईंग्रजी वापरत असू आणि उरलेले 15 टक्के मराठी शब्द व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या नियमात कसे बसवता येतील यासाठी आपापसातच भांडत असू...

एवढा समृद्ध शब्दकोष आपल्या भाषेला लाभला असताना या परकीय भाषेच्या कुबड्या बाजूला सारायची आज गरज आहे !

"टाईम काय झाला? वेळ काय झाली?" - किती वाजले?

"रुमाल बोलू शकतो" - रूमाल म्हणू शकतो.

"चिंता कश्याला करतोयस?" - कशाला

"अश्या शब्दांचीही लिस्ट काढूया" - यादी काढू

"पिढी दर पिढी" - काळानुरूप

फेरफटका धन्यवाद,
आपण दाखवलेल्या सुधारणांवर विचारविनिमय केला जाईल.
पण त्याचसोबत ईथे आपण स्वत: मराठी बोलताना कोणते ईंग्रजी शब्द सर्रास वापरतो हे देखील प्रामाणिकपणे नमूद करणे आवश्यक आहे.
मला कल्पना आहे की हे जड आहे. कारण सरासरी हुमायुन नेचरचा अभ्यास करता असे जाणवते की आपल्याला दुसरयांच्या चुका काढायला आवडतात पण स्वत:च्या कबूल करायला नाही.
अर्थात, ज्या कोणाला मराठी बोलताना ईंग्रजी शब्दांचा वापर गैर वाटत नसेल अश्यांचे या धाग्यावर स्वागत नाही.
भले चार लोकांनीच ईथे आपली लिस्ट द्यावी, वा त्यांनीही देऊ नये, पण ज्यांनी द्यावी ती प्रामाणिकपणे द्यावी.
जे चुका कबूल करू शकतात तेच सुधारू शकतात Happy

मूळ ईंग्रजी शब्द आहे तो ह्युमन नेचर. त्याचा अपभ्रंश हुमायुन नेचर. मराठीत मानवी स्वभाव. पण हा शब्द वापरायला खूप जड असल्याने मी पर्यायी ईंग्रजी शब्द वापरतो.

हाल्फ न लिहिता हाफ लिहिलेले दिसल्यावर अभिनंदन करणार होतो.
पण पुढे हुमायून नेचर दिसले, त्यामुळे अभिनंदन स्थगित.
शेपूट सरळ करण्यासाठी आणखी नळ्या मागवल्यात.

बाण जिव्हारी लागलेला दिसतोय. आणखी बाणही मागवलेत.

ईंग्रजी इंग्रजी
ईथे इथे

र्‍हस्व- दीर्घाच्या चुका टाळण्यासाठी जसं बोलतो, तसं लिहिणं हा एक फार सोपा उपाय आहे.
(हा उपाय वैगरे असं बोलणार्‍यांना लागू पडत नाही.)

विनोदी भाग वगळता
असं म्हणता येईल का? पण एकदम "ट्रान्सलेट"केल्याचं "फीलिंग" येतं.

<कानांना खड्यासारखे टोचतात>
हे काहीतरी नवीन आहे.

जेव्वताना दाताखाली खडा येतो, हे ऐकलंय. तांदूळ नीट न निवडल्याचा परिणाम.
कानाला टोचणारे खडे कर्णभूषणातले - जडजवाहिरापैकी का? की दुसरे कोणते?

'जोक्स द अपार्'ट अशी काही फ्रेज आहे म्हणे. तिच्यासाठी मराठीत काय करता येईल?
>>>>>

विनोदाचा/गंमतीचा भाग वगळता/सोडता
फ्रेज - वाक्यप्रचार?

जेवताना जसे खडे तोंडाला टोचतात तेच सेम फिलींग कानाला येणे.
फिलींग हा शब्द वर मानव यांनीही वापरला आहे. आजकाल सर्रास आढळतो. त्याला पर्यायी शब्द भावना (?) हा थोडाफार दवणीय वाटतो का?

टेबल = बाकडे
कॉम्पुटर = संगणक
कीबोर्ड, मॉनिटर, सी पी यु = ?
बॅचलर ऑफ इंजिनीरिंग = अभियांत्रिकी पदवीधर
पोस्ट ग्रॅजुएट = पदव्युत्तर

सिंबा, काय गलत आहे त्या विधानात? एवढे हसण्यासारखे>>>>>>>>> गलत हेच गलत आहे. या शब्दात गलत ऐवजी 'चुकीचे' वापरणे बरोबर मराठी ठरले असते Happy

आपल्या मराठी भाषा शुध्दीकरणाच्या मोहिमेला माझाही हा हातभार. आणि प्रतिसाद सुद्धा. याला मराठीत सुंदर म्हण आहे. एका दगडात दोन पक्षी!!!!

कीबोर्ड, मॉनिटर, सी पी यु

कीबोर्ड - कळफलक
मॉनिटर - चित्रदर्शी किंवा अहवालदर्शक
सी पी यु - मध्यवर्ती प्रकिया विभाग

इंग्रजी ही पोटापाण्याची भाषा आहे माझ्यासाठी तरी !!
तांत्रिक बोलणं सगळं त्यातच होतं ..

अवांतर पण संबंधित :
गप्पा मारताना साहेबी शब्द कटाक्षाने टाळते ..
म्हणून मला लोक "गटणे , मराठीच पुस्तक , मराठी शब्दकोश" असं काहीबाही संबोधतात .. छापील बोलते.
पण आता सवय झालीये सगळ्यांना त्यामुळे ते आधी ऐकतात मी काय बोलते ते , एखादा शब्द समजला नाही तर केविलवाणा चेहरा करून अर्थ विचारतात

बाकी कोणाबद्दल माहित नाही , पण नवरा शुद्ध मराठीत बोलू लागला आहे आता Happy Happy
अति श्रवणाचा परिणाम

Pages