तुम्ही पाहिलेल्या अंधश्रद्धा???

Submitted by कटप्पा on 4 July, 2018 - 12:50

रूम मेट चे आई बाबा इथे अमेरिकेत घरी आले आहेत, आणि रोज बरोबर 6 वाजले संध्याकाळी की लाईट्स चालू करतात. इथे 9 पर्यंत सूर्यप्रकाश असतो, तरी हा प्रकार चालू आहे.
मी कारण विचारले तर म्हणे की लक्ष्मी येते 6 ला दिवे लावले की. वादात पडायची इच्छा नसतेच, त्यामुळे काही बोललो नाही.

मग हळूहळू नीट विचार केला आणि जाणवले की असल्या काही अंधश्रद्धा आपण कळत न कळत मानत असतो.
उदाहरणार्थ - काही लोक रोज दाबून मटण, चिकन खातात पण शनिवार आला की अंडे पण शिवत नाहीत.

आणखी एक- माझा मित्र कार सुरू करताना रिव्हर्स गियर टाकत नाही जरी 1 इंचावर भिंत असेल तरी आधी फॉरवर्ड गियर टाकणार, 1 mm पुढे नेणार गाडी आणि मगच रिव्हर्स.

इतकेच काय मी सुद्धा देवाला लाच देतो, हे काम होऊ दे, इतके पैसे दान देईन, ही सुद्धा अंधश्रद्धाच.

तुम्हाला आठवतायत का अशा अंधश्रद्धा ज्या इतक्या कॉमन आहेत की आपण नकळत follow करत असतो?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल्ली तल्या ११ आत्महत्या वाल्या कुटुंबाला शेवटच्या क्षणी वडलांचा आत्मा येऊन जिवंत करेल असं वाटत होतं हे वाचून कसंतरी वाटलं. Sad
आपण मरण्याचा निर्णय घेतला.ठिक आहे.पण सज्ञान नसलेली लहान मुलं पण आपल्याबरोबर मरावी हे कोणी कसं ठरवू शकतं?
अलिबाग मध्ये सेम घटना घडली आहे.(ही बहुधा गरिबीमुळे असावी.)

https://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-buradi-family-suicide-cc...
http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Five-family-members-sui...

रुन्म्याचा नविन आय्डी आहे का हा? जाणकारांनी प्रकाश टाकावा?
Submitted by अग्निपंख on 5 July, 2018 - 10:38>>>

हो, तसं त्याने स्वतः प्रांजळपणे कबूल केलं आहे.
इथे वाचा : https://www.maayboli.com/node/66381

उंबराच्या झाडाला पहाटे प्रदक्षिणा घालायच्या. लग्न लवकर होते म्हणे पण हे करताना कोणी पाहु नये. पाहिल्यास फेर्या वाया जातात. Proud

मीठ हातावर देऊ नये. अगदी मिठाचं भांडसुद्धा हातात देऊ नये..प्रेम कमी होतं म्हणे.
तिनाचा प्रभाव मोठा आहे. खायचे जिन्नसही तीन नग देऊ नयेत.
जेवताना शिंक आली तर थोडं पाणी प्यावं.
बाहेर जात असताना कोणालाही शिंक आली तर थोडं थांबावं.
कोणाचे पैसे द्यायचे असतील तर मंगळवारी द्यावेत. तेच आपलं येणं असेल तर बुधवारी घ्यावं.
नखं मंगळवारी कापावीत. शनिवारी नको.
जन्मवारी केस कापू नयेत.

या अंधश्रद्धा.मला वारशात मिळू शकतात.

भेट म्हणून रूमाल देऊ नयेत, भांडणं होतात! Uhoh
विवाहित मुलगी माहेरी रहायला आली असेल, तर सासरी जाताना तिने बुधवारी जाऊ नये. (जाशील बुधी, तर येशील कधी?- अर्थात, बुधवारी ती सासरी गेली, तर परत माहेरी भेटायला यायला मध्ये बराच काळ लोटतो म्हणे. मला वाटतं, मुलीने जाऊ नये, आणखी रहावं म्हणून एखाद्या आईनेच ही म्हण तयार केली असावी Happy )

१०१/ ५०१/ १००१ ची अंधश्रद्धा नाहीये, त्यामागे एक भावना असते, की ज्याला आहेर म्हणून १०१ रुपये मिळाले आहेत, त्याने १०० स्वत:कडे ठेवून, वरचा १ रु. दान करावा. म्हणजेच आपल्याला विनासायास जे मिळाले आहे, तेच थोड्या प्रमाणात का होईना, पण आपणही पुढे द्यावे.
पण आता पाकिटालाच १ रु चिकटवून मिळत असेल तर काय बोलणार! Lol

अगोदर क्रिकेटचे फार वेड होते तेव्हा, आपली टीम खेळत असताना जर फलंदाज हळू हळू रन बनवत असेल तर आम्ही रिमोटने व्हॉल्युम वाढवायचो विरुद्ध टीमची फलंदाजी असताना व्हॉल्युम कमी करायचो Happy

जन्मवारी केस कापू नयेत.
>>>
हे आमच्याकडेही असते.
तसेच जन्मवारी उपवास करू नये. मग कुठलाही उपवासाचा सण का त्या वारी आला असेना.

माझा मित्र कार सुरू करताना रिव्हर्स गियर टाकत नाही जरी 1 इंचावर भिंत असेल तरी आधी फॉरवर्ड गियर टाकणार, 1 mm पुढे नेणार गाडी आणि मगच रिव्हर्स. >>>>

यात अंधश्रद्धेपेक्षा टेक्निकल काही आहे का ?
कारण २-३ जणांकडून ऐकल्य डायरेक्ट रिवर्स गिअर नसते टाकयचा

माझ्यस मित्राची आई त्याला आवडत असून्ही तांदूळ खाऊ नाही द्यायची, लग्नात पाऊस पडतो म्हणायची

साधारण असेच एक म्हणजे जन्मतारीखेच्या दिवशी म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी लग्न करू नये.

तान्ह्या बाळांना आरसा दाखवू नये. त्यांना दात लवकर येत नाहीत.

घरात आरसा घेऊन कवडसा पाडायचा खेळ करू नये. पनवती लागते.

मीठ हातावर देऊ नये. अगदी मिठाचं भांडसुद्धा हातात देऊ नये..प्रेम कमी होतं म्हणे.>>>
हे मी माझ्या ऑफिसमध्ये (!) कात्रीच्या बाबतीत ऐकलं होतं. कात्री हातात दिली तर भांडणं होतात म्हणे!!! Proud

तिनाचा प्रभाव मोठा आहे. खायचे जिन्नसही तीन नग देऊ नयेत.>>>
हे आमच्या गावी सर्रास आहे. जेवताना ४ माणसे एका ओळीत बसण्याइतकी जागा नसेल तर ३ ऐवजी दोनच पाने वाढली जातात. मी तिथे (तिसरा) बसतो म्हटल्यावर अनेक जण (यात तरुण मंडळीही आली), "थय नको बसू. तीन जणांनी बसता नये" आदी सांगतात. मग मी त्यांना खालील प्रश्न विचारतो.
१. शंकराला बेल वाहतात, त्याला पाने किती असतात?
२. गुरुदेव दत्तांची मूर्ती किती मुखी आहे?
३. अध्यात्मात माणसाच्या किती प्रवृत्ती (गुण/दोष) सांगितले आहेत? (सत्व, रज, तम)
इतके झाल्यावर त्यांना (तात्पुरते) थोडेसे पटते!

अवांतर - इथे मुंबईत बहिणीचे लग्न झाल्यापासून घरी आम्ही तिघेच आहोत. (आई-बाबा आणि मी) मग आम्ही सुद्धा तिघांनी एकत्र बसू नये का??? (अर्थात हा प्रश्न गावी विचारू शकत नाही, तो माझ्यावरच उलटण्याची शक्यता आहे! Proud Proud ::)

Submitted by अग्निपंख on 5 July, 2018 - 10:38>>>
इकडे शतकी धागा विणणारा प्रत्येक आयडी हां 'ऋ'चाच असतो ही अंधश्रद्धा पाहायला मिळाली. Lol

हाताखाली हात धुतले कि प्रेम कमी होते.
लहाण्पणी गावाकडे ड्बा टाकायला गेलो कि कमीत कमी एका हाताचे अंतर ठेऊन बसायचो Proud
टिटवी डोक्यावरून उड्त चालली कि खाली बसायच नाहीतर घरातील कुणीतरी वारतं अशी समजूत
घरात नख काढली कि दळिद्री येते
उशीवर बसल कि चोरीचा आळ येतो
कावळ्याचा स्पर्श झालेला व्यक्ती मृत झालाय अशी अफवा पसरवायची Uhoh

साधारण असेच एक म्हणजे जन्मतारीखेच्या दिवशी म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी लग्न करू नये.
Submitted by भन्नाट भास्कर on 5 July, 2018 - 15:14

बरोबरच आहे. जर तू वाढदिवसाच्या दिवशी लग्न केलंस तर आयुष्यभर तुझा वाढदिवस साजरा करायला तुझे मित्र वगैरे येणार त्यादिवशी आणि तुला आणि वहिनीला लग्नाचा वाढदिवस (anniversary) साजरी करायला मिळणार नाही!!! Proud Proud Proud

आपल्याकडचा सर्वात मोठा देव तर पैसा आहे.

पैसा मोजू नये. कमी होतो.

पैसे कात्रीत देऊ नयेत. पैसा जातो.

बोटांच्या मध्ये खड्डे असतील. तर पैसा हातात टिकत नाही.

डाव्या हाताने प्रसाद घेऊ नये तसे पैश्यांचे व्यवहारही करू नयेत.

नोटेला फक्त एकच घडी घालावी. दुसरी घडी घातली की पैसा गेलाच म्हणून समजा.

संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी कोणाला पैसे देऊ नयेत.
तसेच घराचा दरवाजा उघडाच हवा अन्यथा लक्ष्मी परत जाते.

बोहनीला उधारी करू नये.

वर्षाच्या पहिल्या दिवशी (मराठी वर्ष की एक जानेवारी कल्पना नाही) मोठा खर्च करू नये.

मनीप्लांट चोरून आणले आणि फोफावले की पैसा वाढतो.

वर्षाच्या पहिल्या दिवशी (मराठी वर्ष की एक जानेवारी कल्पना नाही) मोठा खर्च करू नये.
Submitted by भन्नाट भास्कर on 5 July, 2018 - 15:24

एक जानेवारीच असेल. कारण मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हणजे तर 'गुढीपाडवा' आणि हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक गणला जातो. लोक ठरवून यादिवशी २/४ चाकी घेतात!

फुटका आरसा घरात ठेउ नये. नखे मन्गळवारी व शुक्रवारी कापावीत. फळे झेलु नये.. महाग होतात.
उम्बर्यावर शिन्कु नये. चुकुन झाल्यास, उम्बर्यावर पाणी टाकावे. कुत्रे मान्जरी यान्च्यावर खरकटे पाणी फेकु नये.. अन्गावर मोस वै येतात.
सोमवारी अजुनही आई गहु दळायला देत नाही.
दिवेलागणीला घर झाडु नये. लक्ष्मी जाते.
सोमवारी नखे, केस कापु नयेत. पाठीवर भाउ असेल तर मुलीन्नी डोके धुवु नये.
नागपन्चमीला सुर्योदयाच्या आधीच केस विन्चरुन घ्या असे आमची आई आम्हाला सान्गायची. आता हे शक्यच नाही. सुर्योदयानन्तर केस विन्चरले तर नागाच्या तोन्डात केस जातात.
नागपन्चमीला तवा चुलीवर/ गॅसवर ठेवु नये. काही कापु नये. भात शिजवु नये.
म्हणुन आमच्याकडे खीर कान्होले बेत असतो त्या दिवशी.

बाबा टुरवरुन येणार असतील आणि यायला उशीर होत असेल तर आई उम्बर्यावर खडे मीठ ठेवुन वर पालथे भान्डे घालायला सान्गायची. तेव्हा फोन वै चन्गळ नव्हती... अगदी लॅन्डलाईन सुद्धा ऑफीसातच पहाय्ला मिळायचे.
एकन्दरीतच जाड/ समुद्री मिठाच फारच महत्व आहे. मागे एकदा एका बिबिवर हा विषय झाला होता. फेन्गशुईमधे ही
नैऋत्य , इशान्य अशा अपोझिट दिशेला, निगेटिव्ह एनर्जी असते अश्या बाथरुम, टॉयलेट या ठिकाणी मातीच्या बोळक्यात जाड मीठ ठेवावे असे म्हटलय. पाण्यात जाड मीठ घालुन त्या पाण्याने घरातली लादी पुसावी असे म्हटलेय. आपल्याकडे नजर / दृष्ट उतरवणे हा प्रकार ही जाड मीठ घेउनच होतो. नन्तर ते मीठ चुलीच्या धगधगत्या निखार्यावर किन्वा वाहत्या पाण्यात टाकतात.

आम्ही लहान असतान्नाच्या अन्धश्रद्धा:
आकाशात बगळे उडत जात असतील, तर ,"बगळ्या बगळ्या कवडी दे, असे हाताची नखावर नखे घासत म्हणायचे. नखावर सफेद डाग येतात ते म्हणजे कवडी. Proud
अग्निशमन दलाची गाडी दिसली तर, गाढव ओरडतानाचा आवाज आला तर पटकन डोक्यावर हात ठेवायह्चा. घरी जाउन गोड खायला मिळते.

वादळ सुटले असेल तर जाड/खडे मीठ बाहेर टाकायचे.. भुत दिसते म्हणे ! Uhoh

विक्षिप्त मुलगा, येस्स बरोबर आहे. मी सुद्धा हाच विचार करून एकदा नकार दिलेला. गर्लफ्रेंडला घेऊन रजिस्टर लग्न करायला गेलेलो तेव्हा आम्हाला जी तारीख मिळाली ती माझ्या वाढदिवसाची होती. मी म्हटले आयुष्यातील दोन सेलिब्रेशनचे दिवस एकाच दिवशी नकोत. दोन वेगवेगळ्या मजा हव्यात. एक मजेचा दिवस कमी का करा? आणि पुढच्या आठव्ड्याची तारीख घेतली. पुढे आणखी एका कारणास्तव पुढचा महिना उजाडला. आता दोन्हींमध्ये चाळीस दिवसांचे अंतर आहे.
पुढे नऊ महिन्यांने पारंपारीक पद्धतीनेही विवाह केला. त्यामुळे लग्नाचे वाढदिवसही दोन दोन झालेत. या दोघांच्या मध्ये आणखी एक लग्न केले. पण त्या बायकोला अंधश्रद्धेच्या भरात सोडले म्हणून तो दिवस साजरा करत नाही..

पुढे नऊ महिन्यांने पारंपारीक पद्धतीनेही विवाह केला. त्यामुळे लग्नाचे वाढदिवसही दोन दोन झालेत. या दोघांच्या मध्ये आणखी एक लग्न केले. पण त्या बायकोला अंधश्रद्धेच्या भरात सोडले म्हणून तो दिवस साजरा करत नाही..
Submitted by भन्नाट भास्कर on 5 July, 2018 - 15:33

आता हे काय नवीन????
Breaking News की काय?

उंबरयावर शिंकू नये फनी आहे. कश्याला कोण कडमडायला उंबरठ्यावर शिंकायला जातेय. बाकी आमच्याकडे उंबरठ्यावर बसू किंवा उभेही राहू देत नाही. एकतर आत जा नाही तर बाहेर ये.

घरात फुटका आरसा ठेऊ नये आमच्याकडेही
तसेच पाकिटात फाटकी नोट ठेऊ नये.
फाटकी अंतर्वस्त्रे घालू नयेत. बाह्यवस्त्रे फाटकी चालतात. उलटंच आहे मेले. सुपरमॅनला ठिक आहे.

विक्षिप्त मुलगा,
ती सुद्धा एक अंधश्रद्धाच होती. माझी आणि गर्लफ्रेंडची पत्रिका जुळवल्यावर मृत्युयोग आला म्हणून तिच्याशी पारंपारीक पद्धतीने लग्न करण्याआधी आणखी एक लग्न करावे लागले. त्या बायकोला सोडले तसे मृत्युयोग टळला आणि मग गर्लफ्रेंडशी लग्न करायला मोकळा झालो.
त्या लग्नाची आणि घटस्फोटाची पंचवीस ते तीस हजार किंमत मोजावी लागली. अंधश्रद्धेपोटी अक्कलखाती जमा. पण घरचे मोठ्या मुश्कीलीने आंतरजातीय, आंतरप्रांतीय, आणखीही बरेच काही आंतर आंतर असलेल्या आणि पत्रिका न जुळणारया लग्नाला तयार झालेत त्यात आणखी वाद नको म्हणून या अंधश्रद्धेला विरोध केला नाही.
पण लग्न होताच त्या बुवांनी दिलेली खड्याची अंगठी भिरकावून दिली. अरे हो, त्यातल्या खड्याचे 6-7 हजार आणखी अक्कलखाती जमा झालेले..

Pages