अधुरी एक कहाणी... (शतशब्दकथा)

Submitted by मनस्विता on 5 July, 2018 - 03:22

पाऊस सुरू झालेला पाहून अॅना मोहरली. फेलिक्सने ज्याला ती लाडाने फेलिस म्हणायची, नुकतीच तिला मागणी घातली होती. आज संध्याकाळी त्यांच्या मीलनाचा मुहूर्त ठरला होता. मीलनाची ओढ आणि हा पाऊस तिची हुरहुर वाढवत होता.

दिवसभर पडणारा संततधार पाऊस आता थांबला होता. प्रणयरंगात रंगण्यासाठी दोघांनी एक जागाही शोधली होती. बागेतला हवा तसा एकांत देणारा कोपरा होता तो.

ती घटिका आली आणि फेलिस तिथे पोहोचला तेव्हा अॅना त्याची वाटच पाहत होती. त्याला पाहून अॅना झक्क लाजली. फेलिसने तिला आपल्या बाहुपाशात ओढले आणि...

'डासांचा प्रादूर्भाव टाळा आणि मलेरिया दूर पळवा' अशी घोषणा करत महानगरपालिकेची गाडी औषधाच्या धूराचा झोत त्या बागेच्या कोपर्यान् कोपर्यात मारून गेली!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिला परिच्छेद वाचतानाच शेवट डासांवर संपेल असे वाटत होते( दुसऱ्या वाचलेल्या कथेमुळे ) आणि ते खरे ठरले.पण छान आहे ट्विस्ट.

पद्म, गोल्डफिश, विनिता.झक्कास, धन्यवाद!

पहिला परिच्छेद वाचतानाच शेवट डासांवर संपेल असे वाटत होते( दुसऱ्या वाचलेल्या कथेमुळे ) आणि ते खरे ठरले.पण छान आहे ट्विस्ट.

Submitted by गोल्डफिश on 5 July, 2018 - 13:40 >>
मी दुसरी कथा वाचली नाहिये.