रेशमी नात्यात लपली काचण्याची कारणे
काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
चांदण्या रात्रीत हाती हात असताना तुझा
शेकडो दिसली मला मी हरवण्याची कारणे
गीत गुणगुणतो कधी तर ताल मी धरतो कधी
तूच तर दिधली मला झंकारण्याची कारणे
व्हावयाचे तेच झाले बेवडा झालो अता
दर्पणी तू शोध माझ्या बहकण्याची कारणे
आज मज रडणे रडाया एकही खांदा नसे
कोण पुसतो? आज अश्रू गाळण्याची कारणे
धर्म, जाती, पंथ नाना, घासती सांधे किती?
हरवली कोठे दुव्यांना सांधणारी कारणे?
काम झटपट व्हावयाला लाच द्यावी लागते
अन्यथा देतात कामे टाळण्याची कारणे
षंढ सारे वाकती का आज अन्यायापुढे ?
का निखारेही विसरले पेटण्याची कारणे?
का हवी कारण मिमांसा व्यर्थ तुज "निशिकांत"रे?
हास-या पुसती कळ्या का उमलण्याची कारणे ?
निशिकांत देशपांडे मो.नं.-- ९८९०७ ९९०२३
E mail ;- nishides1944@yahoo.com
षंढ सारे वाकती का आज
षंढ सारे वाकती का आज अन्यायापुढे ?
का निखारेही विसरले पेटण्याची कारणे?
वाह!!
वा!
वा!
अतिशयच अप्रतिम !
अतिशयच अप्रतिम !
निनाद, शाली, अमीत सर्वांचे
निनाद, शाली, अमीत सर्वांचे मनापासून आभार प्रतिसादासाठी.
व्हावयाचे तेच झाले बेवडा झालो
व्हावयाचे तेच झाले बेवडा झालो अता
दर्पणी तू शोध माझ्या बहकण्याची कारणे
वाह!!
व्हावयाचे तेच झाले बेवडा झालो
व्हावयाचे तेच झाले बेवडा झालो अता
दर्पणी तू शोध माझ्या बहकण्याची कारणे.. अप्रतिम !