अफवेचे बळी

Submitted by हेला on 3 July, 2018 - 14:28

देशभरात मागच्या महिन्यात अफवेचे २५-२६ बळी गेलेत. कारण काय? तर मुलं पळवणारे संशयित म्हणून मारहाण झाली. कहर म्हणजे या मेलेल्यांपैकी एकही मुलं पळवणारा नव्हता. आसाम कि अरुणाचल मध्ये तर या अफवेबद्दल लोकांमध्ये जनजागृती कारण एक सरकारी अधिकारीच लोकांच्या मूर्खपणाला बळी पडला. परवा एकाला मारहाण करून पोलीस स्टेशन ला नेमल्यावर लक्षात आलं कि तो मुलगा त्याचाच होता. काल मालेगाव मध्ये अशीच दंगल झाली. पण या सगळ्या घटनेवर कळस केलाय परवाच्या धुळ्यातील घटनेने. अगदी मृतदेहांवरही लोक वर करत होते. रक्ताचा मांसाचा खच पडलेला होता. आणि यात त्यांना समाधान वाटत होत? कसलं होत हे समाधान ? कुणाला तरी मारल्याचं? कुणावरचा तरी राग बाहेर काढल्याचं? आपल्या मनातला न्यूनगंड मारल्याचं? कि उगाच टाईमपास करायचा म्हणून पाच मुडदे पडले याचं ?

लोक किती विकृत झालेत आणि किती बिनडोक आहेत याच या सध्या घडणाऱ्या घटना ज्वलंत उदाहरण आहेत. किमान सारासार विचार करण्याची मानसिकता सुद्धा आपण सोडून दिलेली आहे. झुंडशाही हि अजगरासारखी असते हे कधी कळणार आपल्याला काय माहित. आज ते आहेत उद्या आपण असू एवढं सुद्धा कुणाच्या लक्षात येत नाहीये.

काय आहे अफवा ? ग्रामीण भागात लहान मुलं पळवणारी टोळ्या आल्यात म्हणून... याला पुष्टी देण्यासाठी काही महाभाग कुठले तरी व्हिडीओ सुद्धा प्रसारित करत आहेत. सध्या कोणत्याही गावात गेलं तरी याच अफवेची चर्चा. कुणी म्हणतंय अमक्या गावात मागच्या आठवड्यात चार जण पकडले, त्या गावात कॉल केल्यावर तर ते म्हणतात आम्हाला तुमच्या गावात लोक पकडल्याचे कळालंय... किती हा बावळटपणा? गावातले विचारवंत जेष्ठ म्हणावेत असेही या अफवेला बळी पडलेत. कुणीतरी थोडा विचार तर करावा ?

लहान मुलांच्या अपहरणाचा मुद्दा देशात गंभीर आहे.. सोबतच तरुण मुली पळवण्याचे प्रकारही खूप वाढत आहेत.हि लहान मुले या तरुण मुलींचा थांगपत्ताही लागत नाहीये. यांची तस्करी होते हेही सर्वश्रुत आहे, पण हि एक मोठी इंडस्ट्री असल्यामुळे सगळे गप्प आहेत.
पण हे मुलं पळवणारे असे गावागावात फिरत नाहीत. गावात तर शक्यतो हे लोक जातच नाहीत. कारण ग्रामीण भागात आपला परका लगेच ध्यानात येतो. हे लोक शहरी भागातच गुन्हे करतात. सोबत अशा टोळ्यात न फिरता पूर्ण प्लॅन करून अपहरण करतात. पण आता तेही पहिल्यासारखे सोपे राहिले नाही. एका टोकाची बातमी दुसऱ्या टोकापर्यंत सेकंदात पोहचू शकते, यामुळे अशी अपहरणे आता कमी होत आहेत.

यापेक्षाही पोट धरून हसावे अशी एक अफवा. म्हणे या टोळ्या किडनी हृदय सुद्धा पळवतात. अक्कल गहाण टाकल्याचा इतका मोठा पुरावा कुठला असू शकतो? किडनी हृदय हे या खेळण्याच्या वस्तू आहेत का? खिशात हात टाकून चोरल्या... शरीराचे असे भाग हे फक्त हॉस्पिटल मधेच काढले जाऊ शकतात. हृदय तर जास्तीत जास्त ६ तास जिवंत राहू शकते. असले अवयव चोरून नेण्यासाठी मोठमोठ्या लॅब सोबत घेऊन फिरावे लगेल. असे पायी चालणारे वा कार ने फिरणारे असले काम करूच शकत नाहीत. इतके साधे लॉजिक... पण आपल्याकडे लॉजिक चालत नाही, झुंडशाही चालते. मेंढरासारखे चालायचे हे आपल्या DNA मधेच आहे.

हे अफवांचे पीक हळूहळू शमेलही पण तोपर्यंत किती बळी घेईल माहित नाही. यामुळे आता एक वेगळीच समस्या समोर येणार आहे. आपल्या लहान मुलांना कुठे घेऊन जाणेही लोकांना अशक्य होणार आहे. कुठे मुलगा रडायला लागला तरी लोक मारायला सुरुवात करतील. याहीपुढे जाऊन काही शक्यता पाहुयात. तुम्ही प्रवासात एखाद्या गावात गेलात. तिथल्या स्थानिकांशी काही कारणाने वाद झाला... त्यांनी फक्त मुले चोरणारी टोळी म्हणू बोंब मारावी, लोक शेकड्याने येऊन तुम्हाला मारायला सुरुवात करतील. आणि तुमचा जीव घेऊनच थांबतील. या निमित्ताने आपले एखादे जुने वैर पूर्ण करण्याचा सुद्धा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्याला लुटण्यासाठी अशीच आरोळी ठोकायची. चार पाच जणांनी मारायला सुरवात करायची सगळं काही चोरायचं, आणि मग मुलं चोर म्हणून ओरडायचं, लोक येऊन मारायला लागतील, चोर राहिले बाजूलाच. एखादा अनोळखी अशाच प्रकारे रस्त्यात अडवून त्याच्याकडून खंडणी मागितली जाऊ शकते, नाही दिली तर आरडाओरडा करील अशी धमकी दिली कि तो जवळच सगळं काही काढून देईल. कितीतरी भयंकर शक्यता या प्रकारांमुळे समोर येत आहेत. आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या घटना सुद्धा फक्त अफवेचेच बळी असतील अशी शक्यता सुद्धा आपण गृहीत धरू शकत नाही. अफवेच्या असून कुणीतरी आपले इप्सितही साध्य केले असेल... या घटना अशाच याचा पर्यटनावर सुद्धा गंभीर परिणाम होऊ शकतो.

प्रत्येक अनोळखी नवखा चोर आहे असेच समजून मारहाण केली जात आहे. या बिनडोक लोकांच्या च्या हेही लक्षात येत नाहीये कि आपलं गाव सोडलं तर आपणही बाहेर गावासाठी अनोळखी असतो. शहरात तर कुणीच कुणाला ओळखत नाही. हि परिस्थिती आपल्यावरही येऊ शकते. पोलीस म्हणतात संशयितांना पकडून आमच्या ताब्यात द्या. प्रत्येक अनोळखी संशयित म्हटला तर लोकांचं फिरणं अवघड होऊन जाईल. दिसला कि पकड आणि दे पोलिसात, पोलिसांनी त्याची चौकशी करून एक दोन दिवस डांबून मग सोडावे. सगळी अनागोंदी माजणार नाही का असल्या प्रकारामुळे ?

यापेक्षा पोलिसांनी सरळ सरळ प्रत्येक गावातील सरपंचांना, ग्रामसेवकांना गावकऱ्यांचे शंका निरसन करण्यासंबंधी निर्देश द्यायला हवे. लोकांना कायदा हातात घेऊ नये अशी सक्त ताकीद द्यावी. गावातील प्रतिष्ठित लोकांनी आपल्या गावकऱ्यांच्या डोक्यात वाळवळणारा हा अफवेचा किडा बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत. ठरवलं तर आठ दिवसात हे प्रकार बंद होऊ शकतील. गावागावात स्थानिकांना निर्देश देणे अवघड नाही. सरकारकडून तरी अजून ठोस अशी काही भूमिका दिसत नाहीये. आणि सरकार यावर ठोस कारवाई करत नसेल तर या प्रकरणामागे आणखी काही वेगळे प्लॅन आहेत का अशी शंका घ्यायला निश्चित जागा राहील.
_

श्रीकांत आव्हाड

https://www.facebook.com/shrikant.avhad/posts/2073791532687517

Group content visibility: 
Use group defaults

चाकूचा वापर हा भोसकण्यासाठी पण केला जाऊ शकतो आणि सर्जन शस्त्रक्रिया करून जीव वाचवूही शकतो, भाज्या, फळे कापून खायला वापरू शकतो.

त्यामुळे चाकूची धार बोथट करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तो चाकु कसा वापरावा याबाबत लोकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. जोपर्यंत लोकांची वृत्ती बदलत नाही तोवर ऑर्कुट काय, फेसबुक काय किंवा व्हाट्सअप्प काय तेढ प्रसवत राहणार.

चाकू आपणहून जाऊन कोणाला मारत नाही, तर त्या मागचा हात आणि किडलेला मेंदू मारतो हे यांच्या कधी लक्षात येणार, आज त्यांच्या चाकूची धार काढून टाकली तर ते दुसरं काहीतरी घेऊन येतील.

कुठे आणि कशाला आणि काय काय प्रतिबंधीत करणार?

हे वातावरण आताचा कसे निर्माण झाले? इतके दिवस नव्हते होत असे अनोळखी माणसे, ज्यांच्याशी आपला काही संबंध नाही त्यांना, पटापट मारण्याचे वेडगळ खेळ. म्हणजे आधी लोक प्रज्ञावंत मेंदूंची होती आता किडली? का कशामुळे?

प्रज्ञावंत मेंदू हे कसे मुसलमान धार्जिणे व अर्बन नक्षल आहेत, हा प्रचार आपण विकत घेतला, तेव्हापासून अन त्यामुळे.

असा प्रचार फक्त फ्रिन्ज करते, मला तुला त्याने काय होणार नाय, हा मूर्ख समज डोक्यात बसल्यापासून अन त्यामुळे.

<सर्व जनतेला अफवेवर विश्वास ठेवू नका व जमाव करुन कोणाला मारु नका अन्यथा कडक शिक्षा होईल असा आवाहनाचा एक 2 मिनीटाचा विडिओ आपले पंतप्रधान नक्कीच शूट करू शकतात, जर फिटनेस अवेअरनेसच्या विडिओ वर ३५ लाख खर्च करु शकतात तर..

सरकारी पातळीवर जनतेच्या पैशाने स्वतःच्या जाहिराती करणारे ह्या लोकांच्या जीवावर उठलेल्या अफवेच्या विरोधात पेपर, tv रेडिओ वर जाहिरात, या माध्यमातून जनजागृती करु शकतात.? +

सत्ताधारी पक्षाचं प्रचारतंत्र किती प्रभावी आहे, हे आपण पाहतोच आहोत. अनेक खोट्या, विपर्यास केलेल्या गोष्टी सोशल मीदियाद्वारे लाखो लोकांपर्यंत पोचवल्या जातात. तिथे हे उपाय करणं, त्यांना नक्कीच शक्य आहे. इच्छाशक्ती हवी.

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचे जास्तीत जास्त खासगी व्हॉट्सअ‍ॅप समूहांमध्ये अस्तित्व असेल. या समूहांमध्ये दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी, खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती येऊन धडकल्यास ती अन्य समूहांमध्ये जाण्यापासून रोखेल. हा धोरणात्मक निर्णय नसला तरी वरिष्ठ पातळीवरून सर्व पोलीसप्रमुखांना खासगी व्हॉट्सअ‍ॅप समूहांमध्ये अस्तित्व निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अफवा, दिशाभूल करणारी माहिती, महापुरुषांची बदनामी करणारा किंवा दोन समाजात तेढ निर्माण करेल असा मजकूर, छायाचित्र, चित्र फेसबूक, ट्विटर या माध्यमांवरून काढून टाकणे शक्य आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवरून दोन व्यक्तींमध्ये किंवा समूहात होणारा संवाद रोखणे, मध्यस्थी करणे पोलिसांच्या हाती नाही.

*समूहात सदस्य असलेला पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी ही अफवा आहे, हा महापुरुषाची बदनामी करणारा, दोन समाजात तेढ निर्माण करणारा खोटा संदेश आहे, तो पसरवू नका, पसरवल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, अशा सूचना देऊ शकेल.*

https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-police-to-keep-eyes-on-priva...

काल वाचलेल्या एक बातमीनुसार मेसेज कुठून जनरेट झाला हे कळण्यासाठी लोकेशन ट्रॅकिंग करायची परवानगी व्हाट्सअप्प ने सरकारकडे मागितली आहे.

हा उपाय किंवा वर लिहिलेला पोलिसांचा उपाय डेसपरेट उपाय म्हणून नजीकच्या काळासाठी उपयोगी वाटतीलही, पण हे करताना सामान्य नागरिक जास्त जास्त सरविलंस खाली येत जाईल, शेवटी राज्यकर्त्यांना (याच नाही, कोणत्याही राज्यकर्त्यांना) हवीशी वाटणारी समाजावर पूर्ण पकड असण्याची कल्पना खरी होईल.

Whatsapp ने सरकारच्या पत्रावर उत्तर देताना पूर्ण सहकार्याची तयारी दाखवली आहे पण सोबत सरकार आणि लोकांच्या मदतीची गरज असल्याचे म्हटले आहे. मुळात लोकांची कोणत्याही स्फोटक बातमीवर आंधळा विश्वास ठेवण्याची सवय जात नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. मेंढ्यांसारखं पुढच्याने ऊडी मारली की मागचा पण मारणार. यासारख्या बातम्या खोट्या असू शकतात ही शक्यता मान्य केल्याशिवाय पर्याय नाही.

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचे जास्तीत जास्त खासगी व्हॉट्सअ‍ॅप समूहांमध्ये अस्तित्व असेल.
<<
हे लोक न्यूट्रल आहेत असे तुमचे गृहीतक आहे.
dhule riots video 2013 असे युट्यूब सर्च करा अन गम्मत पहा. गणवेशात पोलीस काय करताहेत ते पहा.

<. यासारख्या बातम्या खोट्या असू शकतात ही शक्यता मान्य केल्याशिवाय पर्याय नाही.>
असंही नाही. आपल्याला न रुचणारी बातमी असली की ती खोटी असेल, अशी शक्यता व्यक्त करतात लोक.
दलित अत्याचाराच्या बातम्या आल्या, की त्या खोट्याच आहेत किंवा या बातम्या छापताच कशाला, अश्या प्रतिक्रिया असतात.
तेच पाकिस्तानने भारताला हरवून टी ट्वेंटी कप जिंकल्याचा आनंद मीरारोडच्या मशिदीत साजरा होतोय, अमक्या मोर्चात पाकिस्तानचा झेंडा दिसला, म्हटलं की लोकांचा चटकन विश्वास बसतो.
असं दोहोंकडे होतं हेही खरंय.

लोक न्यूट्रल आहेत असे तुमचे गृहीतक आहे.>>>>>>
अज्जिबात नाही,
कदाचित आत्ता होणारे लिंचीन चे प्रकार थांबतील या मुळे, पण पुढे जाऊन हर पोलीस स्टेट बनन्याकडे टाकलेले हे एक पाऊल ठरेल.

>>>>>>
मेंढ्यांसारखं पुढच्याने ऊडी मारली की मागचा पण मारणार. यासारख्या बातम्या खोट्या असू शकतात ही शक्यता मान्य केल्याशिवाय पर्याय नाही.
>>>
हो बरोबर आहे, पण 99% माणसे हे समजून घेत नाहीत इकडेच प्रोब्लेम येतो.

मायबोलीवरच पहा, इथले लोक शिक्षित असावेत असा संशय येण्यास वाव आहे. हे शिक्षित लोक इतक्या खालच्या पातळीवर येऊन , कधी प्रत्यक्ष भेटायची शक्यता नसलेल्यांनाही अतिशय खालच्या पातळीवर उतरून शिव्या देतात की शेवटी धागे बंद केले जातात, आईडीज उडवले जातात. हे करायचे समर्थन काय? तर समोरच्याला ह्याच भाषेत बोललेले कळते. ह्या समर्थनाची कुबडी घेऊन दोघेही नंगानाच घालतात. इथे प्रत्यक्ष भेट होत नाही म्हणून, नाहीतर शेवट मारामारीत होण्याची पूर्ण खात्री.

आणि तेच चित्र जेव्हा समाजात दिसते तेव्हा याचा दोष इतरांवर ढकलून मोकळे. अरे तुम्ही इथे जे करताहात तेच तिथे रस्त्यावरही होतेय. प्रत्येकजण यावरच अडून बसलाय की समोरचा शहाणा होत नाही तोवर मी वेडाचार चालूच ठेवणार.

कधी प्रत्यक्ष भेटायची शक्यता नसलेल्यांनाही अतिशय खालच्या पातळीवर उतरून शिव्या देतात की शेवटी धागे बंद केले जातात, आईडीज उडवले जातात>>>>>>

साधना गल्लत होतेय का काहीतरी?
लोक भेटायची शक्यता नसल्यानेच एकमेकांना शिव्या द्यायला धजतात,एकमेकांशी खच्चून मतभेद असणारे id समोरासमोर आले तर बेसिक सौदारहायनेच वागतात, (अजूनतरी)

स्फोटक आणि खोटे मेसेज पाठवून हे बेसिक सौदरहय नष्ट करायचा प्रयत्न चालू आहे, त्याबद्दल आपण बोलतोय

साधना. मिक्सिंग अप टू टोटली डीफ्रंट थिंग्स.

रस्त्यावर गाडी चालवत असतांना कट मारला म्हणून, ओवरटेक केले म्हणून होणारे भांडण ते मारामारी ह्या घटना वेगळ्या. आणि कोण्या अफवेवर विश्वास ठेवून अनोळखी व्यक्तींना बिनबुडाच्या संशयाखातर जीवानीशी ठार मारुनच शांत होणे हे सर्वस्वी वेगळे आहे.

अवांतर, तरी रिलेटेड-
सिम्बा, <बेसिक सौदारहायनेच > , <बेसिक सौदरहय>>> बेसिक कशाने वागतात? कोणता शब्द आहे का? सौहार्द्र का? Happy

अफवेवर विश्वास ठेवून अपरिचिताचा जीव घेण्यापर्यंत मजल जाते याचाच अर्थ समूहाच्या मनात कशा/कोणाबद्दल तरी प्रचंड संताप आहे, तो बाहेर पडायची वाट बघतो आहे आणि तो संताप मनातच ठेवून वावरणा-या लोकांना इतर काहीही कामधामउद्योग नाहीये. लोकांना व्हॉऍ/ फेसबुक वाचायला, त्यावर विचार करायला आणि शहानिशा न करता कृतीही करायला इतका वेळ कसा असतो? या रिकाम्या वेळाबाबत काही करता येईल का?

लोकांकडच्या रिकाम्या वेळेवर उपाय म्हणूनच ते दिवसाला इतक्या पैशात इतका डेटा किंवा दिसामाजी इतका डेटा फुकट, अशा योजना आल्या असाव्यात.

>>>> सौहार्द्र >>> Happy
>>>>>
लोकांना व्हॉऍ/ फेसबुक वाचायला, त्यावर विचार करायला आणि शहानिशा न करता कृतीही करायला इतका वेळ कसा असतो>>>>

लोक विचार करत नाहीत हाच मुद्दा आहे ना...
प्रत्येकाला ब्रेकिंग न्युज देऊन गृप मध्ये मोठेपणा घ्यायची इतकी घाई असते की एखादी बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरते.

लोक विचार करत नाहीत हाच मुद्दा आहे ना...
प्रत्येकाला ब्रेकिंग न्युज देऊन गृप मध्ये मोठेपणा घ्यायची इतकी घाई असते की एखादी बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरते.>>> १००% खरं आहे. मी किती ' जबाबदार' नागरिक आहे हे दाखवायचं असतं.

इथे एखा द्या आयडीवर/आर्टिकल वर तुटून पडणारी जनता आ णि हे मॉब लिची.ग चे प्रकार, सेम वाटतात का? आएक मानसिक्,एक शारिरीक. पण त्या मागची प्रवृत्ती तीच , अ से जाणवते का?
इथे पॉलिटिकल, सामाजिक, जात धर्म ह्या विषयावर सतत लिहिणार्‍या आयडीना प्रश्न - ते सतत अस्वस्थ असतात का आतून? आ त खदखद असते का? असल्यास का असते? त्यान्च्या डे टू डे जगण्यात त्याना ते अनुभव वै यक्ति क रित्या आलेले असतात का?
का ह्या जमावाप्रमाणे त्याना बाहेरून फीड मिळतो?

हे कुचकट प्रश्न नाहीत. बर्‍याच धा ग्यान्वर जाणवले, ते खरे आहे का हे फक्त ज्या त्या आयडीला माहित (त्यान्च्या आत काय हे त्यानाच ठावूक. आअम्हला फक्त सिम्प्टम्स दि सू शकतात)

मला उलत वाटतं. रोजचे पेपर , मित्र नातलग परिचितांकडून येणारे व्हॉट्सपॅ फॉर्वर्ड वाचूनही ज्यांना काही वाटत नाही, त्यांच्यातल्या संवेदना जाग्या आहेत का? "मला काय त्याचं?" असं म्हणून शांत झोप लागत असेल, तर तुम्हाला सुखी म्हणायचं की आणखी काही?

दुसर्‍या एका धाग्यावर "जे चाललय ते अ तिशय गलिच्छ आहे. (समाजात).
हिटलर शी नात साम्गणारा ब्राह्मण्द्वेष दिसतो."
असं लिहिणारे मुस्लिमद्वेष, ख्रिश्चन द्वेष, विचारवंतांना वेचून मारणं, वेगळा विचार करायची आणि तो बोलून दाखवायची आगळीक करणार्‍याला झुंडशाहीचा वापर करून नामोहरम करणं (अमीर खान ते सुषमा स्वराज), सतत खोट्या गोष्टी पसरवल्या जातात तेव्हा मूगडाळीचा तुपात थबथबलेला हलवा खाण्यात मग्न असणार.

जोवर माझ्याबाबत यातलं काही होत नाही, तोवर मी रिअ‍ॅक्ट होणार नाही (किंवा मनात , जे चाललंय, ते छानच तर चाललंय) असं म्हणणार्‍यांसाठीpolitics.jpg

भरत ने शेअर केलेल्या पोस्टर वरचा कंटेंट एकदम पटला.
पॉलिटिक्स पासून लांब राहणे, एखाद्या गोष्टीबाबत स्वतःला वाईटपणा येईल या भीतीने स्टँड न घेणे हे दोन्ही प्रिव्हिलेजेस आहेत

स्वतःच्या मुलीबरोबर प्रवास करणाऱ्या माणसाला kidnapper समजून हल्ला ---- हा माणूस स्वतःच्या दोन वर्षे वयाच्या मुलीला मारत होता!

सन्शय आला तर त्या व्यक्तीला पोलिसान्च्या हवाली करा, मग पुढचे काम त्यान्चे आहे, त्यान्ना करु द्या. मरे पर्यन्त मारण्याचा अधिकार यान्ना कुठे मिळाला आहे, कायदा हातात घेण्याचे धाडस होतेच कसे? Sad

कायदा हातात घेण्याचे धाडस होतेच कसे? Sad
नवीन Submitted by उदय on 9 July, 2018 - 01:29
<<

कायदा !
भारतात कायदा अस्तित्वात तरी आहे का ?

मुळात ज्या देशात पोलीसच दिवसाढवळ्या महिलांचे विनयभंग करतात, लोकांकडून चिरिमीरी गोळा करत फिरत असतात त्या देशात गुन्हेगाराला पोलींसांच्या हातात देऊन काय फायदा ? उलट पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत ते गुन्हेगारच एक-दोन जणांना खलास करतील. अश्या गुन्हेगारांना जागच्या जागेवर शासन करणे हेच योग्य आहे.
---
त्या धुळ्याच्या घटनेत डोके ताळ्यावर असणार्‍या काहि लोकांनी, त्या पाच जणांना ग्रामपंचायत कार्यालयात बंद करुन पोलीसांना फोन केला, मात्र घटनेचे गांभिर्य ओळखून ताबडतोप घटनास्थळी पोहचायच्या ऐवजी पोलीसांना यायला तीन-चार तास लागले. यावरुनच तिथल्या कायद्याचे रक्षण करणारे पोलीस किती कार्यक्षम आहेत हे लक्षात येते.

{अश्या गुन्हेगारांना जागच्या जागेवर शासन करणे हेच योग्य आहे.}
हे आले झुंडशाहीचे समर्थक.
गुन्हेगार आहे हे ठरवणार आपणच. शिक्षही आपणच देणार.

Pages