भारतीय लोकांमुळे इतर जनतेला बसणारे कल्चरल शॉक अर्थात ओरांग इंडिया तमाशा.

Submitted by विक्रमसिंह on 2 July, 2018 - 02:13

प्रवास करताना किंवा परदेशी रहाताना किंवा भारतातच असताना आपल्या मुळे इतर जनतेला किती धक्के आणि त्रास आपण देत असतो याची कल्पनाच न केलेली बरी. इंडोनेशियात असताना आम्ही आपल्या अशा टिपिकल भारतीय पद्धतीला ओरांग इंडिया तमाशा (ओआयटी) म्हणजे भारतीय लोकांचा तमाशा म्हणायचो. ओआयटीची किती तरी उदाहरणे देता येतील

- कुठेही शिस्तीत रांग न लावता एकदम गर्दी करणे, जसा काही जन्माला येतानाच देवाने आपल्याला कायम रांगेत पुढे रहाण्याचा मान दिला आहे. दुकानामधे दुसर्‍या गिर्‍हाइकाशी दुकानदार बोलत असताना आपलेच घोडे पुढे दामटणे हे त्याचे दुसरे रूप.
- परदेशी विमानतळावर भारतात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार व इतर देशात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार यात शिस्तीच्या बाबतीत जमीन अस्मानाचा फरक दिसतो.
- सार्वजनिक अस्वछता आणि स्वछतेच्या आपल्या कल्पना.
- आपल्या मसाल्यांचा घमघमाट. कित्येक ठिकाणी म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना घरे भाड्यानी देताना अटी घातल्या जातात.
- मला ईंडोनेशियात लोक विचारायचे. तुमच्या बायका पोट उघड का टाकतात. (साडी घातलेल्या). बघण्याचा दृष्टीकोन वेगळा पण हाही त्यांच्या साठी शॉकच ना. (हा नुसता शॉक , पण ओआयटी नाही)

बर्‍याच वेळेला आपल्या गावीही नसते की आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होतोय.
तुम्ही पण असे शॉकलेले लोक पाहिले असतील. ओआयटी (त्रास देणारे शॉक) अनुभवले असतील.

टीप : मला आपल्याबद्दल टिका करायची नाही. आपले (भारतीयांचे) कित्येक गुण आवडल्याचे लोक आवर्जून सांगतात. त्याबद्दल वेगळा एक धागा काढायला हरकत नाही. पण बर्‍याच वेळेला आपल्याकडून अनाहूत पणे चुका होउ नयेत ही इच्छा. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सेम हियर Sad
आमच्या इथे एच आर ने ऑल फिमेल मेल लिस्ट ला मेल पण केले होते, केस विंचरल्यावर नीट गोळा करुन कचर्‍यात टाका वगैरे.पण फरक नाही.
त्या क्लिनर बायांना किमान वॉशरुम मध्ये व्हॅक्युम क्लिनर वापरायची परवानगी हवी.सध्या ते फक्त बाहेर कार्पेट साठी वापरता येते.

भारतात रेस्टरूम ची अवस्था खरच दयनीय असते. सार्वजनिक ठिकाणी तर न गेलेलच परवडते.
अमेरिकेत ती एक गोस्ट खुप चांगली आहे. मेन्टेन ही चांगली करतात आणि वापरतात ही चांगली. अगदी पार्क्स मधे आणि फ्रिवेवरील रेस्ट एरिया मधील रेस्ट रूम्स सुध्धा...

मी ह्या सध्या काम करत असलेल्या जर्मन एम एन सी मध्ये नुकताच जॉइन झालेलो तेव्हा ची गोष्ट.. म्हणजे साधारणतः ८-९ वर्षांपूर्वीची... आमची एक जर्मन कलिग तेव्हा चक्क ३ महिन्यांसाठी भारतात आली होती. सुरवातीचे ३-४ दिवस सोडल्यावर तीच्या लक्षात आले की आपल्याला इथे ३ महिने फक्त सँडविच वर काढुन शक्य होणार नाही, तसे तीनी माझ्या बरोबर कँटिन ला जेवायला यायला सुरुवात केली. वॉश-बेसीन मध्ये नंतर हात धुताना ड्रेनेज जवळ एक पांढरा गोळा तीला दिसला. डांबराची गोळी होती ती!! आपण सर्रास ती बेसीन च्या छिद्राजवळ नेहेमी ठेवतो, मला तिनी विचारले हे नक्कि काय आहे? "मॉटन-कुगेल" असे उत्तर दिल्यावर मात्र ती फार बुंगली होती Wink
तीला अनेक प्रकारांनी सांगितलं कि अग हे इथे ठेवल्याने झुरळं, किडे वगैरे येत नाही इ. इ. पण तरी तिला तो एक शॉक होता नक्कि :):)

तरी हल्ली पब्लिक रेस्टरूम्स आधीपेक्षा बऱ्या म्हणव्यात अशी स्थिती आहे. टुरिस्ट पब्लिक प्लेसेस मध्ये भारतात बऱ्याच वेळा फिरंगी पब्लिक दिसते. तिघी चौघींच्या ग्रुपमधले फिरंगी खूप वेळेस एकीला पुढे पब्लिक रेस्टरूमची अवस्था पाहण्यासाठी पाठवून ती ठीकठाक असेल तर इतरजणी जाताना पाहिलंय. इथे जन्म घालवूनही मला प. रे. मध्ये जाताना जीवावर येते, त्या बिचार्यांची काय अवस्था होत असेल?

हापिसातले वॉशरूम हा एक स्वतंत्र चर्चेचा मुद्दा होईल .
दक्शुतै , साधनाताई , अनु + १००००
सध्या पावसाचे दिवस आहेत . कधीतरी चपला सँडल्स मातीने खराब होतात, ओल्या होतात.
आमच्याकडच्या एक-दोन मुली , टॉयलेट मध्ये जाउन वॉटर जेटने चपला/पाय धुतात आणि सगळं थारोळ करून ठेवतात.
वॉशबेसिन काउंटरवर केस आणि पाण्याचे थारोळे हा तर नेहमीचा सीन आहे.
कधी कधी ईतक्या जोरात पाण्याचे हबके मारतात की समोर आरशावर पण पाणी उडते.
आपला मेकप कीट , क्रीम्स काउंटरवर पसरून ठेवणे ही पण एक सवय .

मध्यंतरी ऑफिसमध्ये फीटनेस प्रोग्राम चालायचा . काही मुली कपडे बदलायच्या आणि तसेच लेडीज रूममधल्या प्रत्येक हूकला कपडे लटकवलेले. आपण आत जाउन दरवाजा बंद केला तर लटणारी जीन्स आपल्या तोंडावर आपटणार .

काही बेसिक हायजीन च्या गोष्टी पण या मुलींना कळत नाहीत .
फार खेदाने , यांच्या आईने यांना काय शिकवले असं म्हणावं लागते किन्वा या मुली पुढे आपल्या मुलांना काय वळण लावणार याची काळजी वाटते.

मला तिनी विचारले हे नक्कि काय आहे? "मॉटन-कुगेल" असे उत्तर दिल्यावर मात्र ती फार बुंगली होती

---- ये कुछभी समझा नही. मॉटन कुगेल, बुंगणे म्हणजे काय?

दुसरे कोणी मेस क्लिनप करते म्हणून.स्वतःच्या घरी/सासरी नीटच असतील. >>>> ह्म्म असेलही कदाचित . म्हणजे सिविक सेन्श चा अभाव. चलता है अ‍ॅटिटुड .

दुसरे कोणी मेस क्लिनप करते म्हणून.स्वतःच्या घरी/सासरी नीटच असतील---- नाही. आमच्याकडे compulsory garbage segregation आहे. प्लास्टिक पिशव्या केराच्या टोपलीला लावायला मिळत नाही म्हणून सोसायटी पोर्टलवर endless emails / whatsapp group वर आरडाओरडा केराच्या टोपल्या घाण होतात, वास येतो, प्लास्टिक वापरू द्या. पण त्यांना पर्याय दिला की रोज केराची बादली धुवून वापरली तर घाण येणार नाही, दोन बादल्या घेऊन आलटून-पालटून धुवुन वापरा तर ते करायचे नाही. हिरव्या रंगाची बादली ग्रे झालेल्या आहेत. स्वतःची केराची टोपली धुवायची घाण वाटते!

पब्लिकः
आपल्या स्वतःमुळे/स्वतःच्या भुभूच्या शीमुळे/आपण केलेल्या कचर्‍यामुळे जगात/आपल्या उंबर्‍याच्या बाहेर उकीरडा झाला/रोगराई पसरली तरी चालेल. पण आपले घर आणि आपण मिरर सारखे स्वच्छ दिसले पाहिजे Happy
हे तत्व समजून घेतले की ऑफिस वॉशरुम मध्ये केसांचे गुंते/घरातल्या केराच्या टोपल्या रोज न धुणारे लोक/स्वतःच्या नवसाच्या मुलांना चिप चे रिकामे पाकीट खाली टाकताना पाहूनही न झापणारे लोक पाहून अजिबात आश्चर्य वाटत नाही.

@ हेला : "मॉटन-कुगेल" म्हणजे डांबराच्या गोळ्या जर्मन भाषेत आणि बुंगणे म्हणजे हुकणे/गंडणे इ. इ.

<<< सेक्स कंपॅटीबिलिटी हा मात्र काहींना यात तोटा वाट्तो. अॅरेंज मॅरेज केलेल्या माणसाबरोबर संसार वगैरे ठिक चालू आहे पण "व्हॉट विल हॅपन इफ ही इज नॉट गुड इन बेड " (डेटींग सुरु झाल्यावर , लग्नाला विचारण्यापुर्वी हे एक मोठ रिजेक्शनच कारण असत) हा प्रश्न ताबडतोब एक दोन क्लोज महिला कलिग्ज कडून आला. 'माहित नाही. भारतात असा काही डाटा नाही. /नसावा. सेक्स हा विषय अशा प्रकारे सहजगत्या चर्चीला जात नाही .' अस सांगितल. ते ही त्यांना सरप्राइझिंग वाटत. >>>
आताच https://www.bbc.com/marathi/india-42752768 हा लेख वाचला.
त्या #Her Choice मालिकेतील बाकीचे लेखपण चांगले आहेत.

या धाग्यावरचे प्रतिसाद वाचून मला जबरदस्त शॉक बसला!
"त्या" मंडळींपेक्षा "आम्ही" बरे म्हणायचे! आमच्या रेस्टरूम मध्ये नाही चालत असले अगोचर प्रकार Lol

माझ्या ऑफिसात मुली सॅ नॅ तसेच पेपर मध्ये फक्त गुंडाळून टाकायच्या. मग त्या गुंडाळ्या उघडायच्या आपोआप...एकदा मी डस्बिन उघडल्यावर मला उलटी यायची बाकी होती... बाहेर येऊन मी जो तमाशा केला...अगदी बॉस बाहेर आला त्याला मी सांगितलं की इथे असे प्रकार बाया करतात मला घाण वाटते... इथला डब्बा काढून टाका ज्यांचे केस , गुंडाळ्या वगैरे गोष्टी आहेत त्या कुठे टाकायच्या ते बायका बघतील....
( हे प्रेमाने, गपचूप वगैरे मुलींना 5 ते 6 वेळ सांगून कळलं नव्हतं ते अश्या प्रकारे बोलल्यावर कळलं. )
परत कमोड वर ही सुसू चे पिवळे थेंब ,ते क्लीन करायची तसदी ही लोकं घेत नाहीत. एक बाई तर टिशू रोल घरी घेऊन जायची...आय मिन सिरियसली???? 40हजाराच्या आसपास पगार घेणारी बाई ऑफिस चा टिशू रोल चोरते???? पण हे प्रकार होतात ऑफिसेस मध्ये.

अने, फार कॉमन प्रकार आहे हा, मला अज्जिबातच आश्चर्य नाही वाटलं. सी फोल्ड नॅपकिन्स पण घरी नेतात त्यात काय.

@ हेला : "मॉटन-कुगेल" म्हणजे डांबराच्या गोळ्या जर्मन भाषेत आणि बुंगणे म्हणजे हुकणे/गंडणे इ. इ.
<<
हायला
बुंगणे जर्मन शब्द आहे हे ठाऊकच नव्हते.

@ आ.रा.रा. आवरा अहो... Wink बुंगणे हा माय-मराठितला हितं पुण्य नगरितलाच शब्द आहे. किमान मी तरि तो इथे पुण्यातच ऐकला आहे

आपल्या मसाल्यांचा घमघमाट. याला खरे तर नाइलाज आहे......
Submitted by Mandar Katre on 4 July, 2018 - 22:25

पूर्वीच्या काळी तर मसाल्यांचा व्यापार होत असे ना? शाळेत इतिहासात शिकल्याचं आठवतंय!

एका ऑस्ट्रेलियन माणसाला भारतात आला त्याच दिवशी एअर पोर्ट वरून येताना (त्याला घ्यायला गेलेली चारचाकी) गाडी बंद पडली म्हणून थांबावे लागले असता (गाडी बंद पडली हा धक्का काहीच नाही) पहिल्याच दिवशी भर मुंबईत दिवस वर आलेला असताना, रस्त्याच्या कडेला परसाकडेला बसलेली (लहान मुले नव्हे तर मोठी) माणसे पाहून जो काही धक्का बसला होता की तो ते अधून मधून बोलून दाखवी. अगदी काही वर्षांनी त्याच्या गावी परत जाईपर्यंत तो त्यातून सावरू शकला नाही.

आमच्या काही अस्सल मुंबईकर मित्रांनी हे शक्यच नाही असे दृष्य फक्त रेल्वेमार्गाच्या शेजारीच दिसू शकते म्हणून त्याला खोटे पाडायचा बराच प्रयत्न केला होता.

हायला
बुंगणे जर्मन शब्द आहे हे ठाऊकच नव्हते.>>>> हे तर काहीच नाही. मी मागे लोकसत्तात एका भारतीय डॉ च्या परदेश दौर्‍याच्या अनूभवाबद्दल वाचले होते ( घरी न्युजपेपर मध्ये, नेट वर नाही ) हे डॉ काही कारणानिमीत्त इटलीला गेले होते. तर तिथे त्यांच्या मित्रासोबत ते एका स्थानिक डॉ ना भेटायला गेले. त्या डॉ च्या केबिन बाहेर एक पाटी होती, त्यावर रोमन लिपीत नासो, कानो, गलो असे लिहीले होते. मित्राला त्याबद्दल विचारले तर तो म्हणाला की ते डॉ ENT आहेत. भारतीय वा इतर लोकांसाठी म्हणून नाही तसे लिहीले तर तिथले बरेच उच्चार हे भारतीय भाषेशी साधर्म्य सांगतात असे मित्राने सांगीतल्यावर आपले भारतीय डॉ चाट पडले होते.

स्वच्छतेच्या बाबतीत आपण आपल्याबद्दल जेवढ बोलू तेवढ कमीच म्हणून आता इतर काही वागणुकीबद्दल अनुभव असतील तर सांगा.

- मला आमच्या साहेबांनी तोंड उघडे ठुन चावल्यावर होणार्‍या मचमचा आवाजाची जाणीव करून दिली होती. (जो आपल्याला नाहे , दुसर्‍याला जाणवतो)
- आपल्यापैकी बर्‍याच जणांचा पेशन्स कमी असतो. एकदा काम सांगितल्यावर होईपर्यंत त्याची मधे मधे सारखी चौकशी. साउथ इस्ट आशियात असल चालत नाही. रागवायच तर मुळीच नाही.
- हॉटेल मधे वेटर लवकर न आल्यास मोठ्याने ओरडून बोलवणे किंवा बोटानी जवळ यायची खूण करणे - बीग नो,नो.
- प्रत्येक देशाचे असे एक कल्चर असते. अगदी साधी गोष्ट, मीटींग वेळेवर चालू होणे , किंवा नेहमीच उशीरा होणे. आपण त्याच्या उलट करायला गेलो तर नक्कीच त्यांना शॉकिंग असते. अशा कितीतरी छोट्या गोष्टी असतात, त्या बारकाईने बघणे महत्वाचे ठरते.

काही मुली इतक्या हायजीन कॉन्शस की वॉशरुममधल्या नळाला हात लावायला सुद्धा टिशू पेपर काढतात. ढिगभर टिशू तर फक्त नळाशी संपर्क येऊ नये म्हणून संपत.

आमच्या काही अस्सल मुंबईकर मित्रांनी हे शक्यच नाही असे दृष्य फक्त रेल्वेमार्गाच्या शेजारीच दिसू शकते म्हणून त्याला खोटे पाडायचा बराच प्रयत्न केला होता.
>> Rofl Rofl Rofl

मला आमच्या साहेबांनी तोंड उघडे ठुन चावल्यावर होणार्‍या मचमचा आवाजाची जाणीव करून दिली होती.>>.
अतिशय राग येतो ह्या आवाजाचा, माझ एक कलिग आहे त्याच्याबरोबर एकदा बस्लो आणि मचाक ऐकुन परत बरोबर बसायची हिम्मत नाही झाली माझी. Uhoh

"आपल्या मसाल्यांचा घमघमाट. याला खरे तर नाइलाज आहे . भारतीय मसाल्याशिवाय जगू शकत नाहीत !" - नाइलाज नाहीये. स्वयंपाक करताना, बाहेरचे कपडे बदलून घरातल्या कपड्यात स्वयंपाक करणं, बेडरूम आणी क्लॉजेट मधे बाहेरचे कपडे ठेवून, दारं बंदं करणं, शक्य असल्यास, खिडक्या / दारं उघड्या ठेवून स्वयंपाक करणं आणी सहज शक्य असेल, तर तळणं, फोडणी करणं वगैरे गोष्टी घराबाहेर बॅकयार्ड मधे करणं, कपडे रेग्युलरली धुणं असे बरेच पर्याय असतात. मध्यंतरी एका इंडियन मुलाचा इंटरव्ह्यू घेताना, त्याच्या सुटाला फोडणी चा वास येत होता. हे नक्कीच टाळता येण्यासारखं आहे.

Pages