हार्ट रेट मॉनिटर कसा निवडायचा?

Submitted by सई केसकर on 3 July, 2018 - 01:51

मला हार्टरेट मॉनिटर घ्यायचा आहे. पण मला त्याबाबद्दल उलटसुलट माहिती मिळाली आहे. इथे कुणी असे हार्टरेट मोजणारे असतील तर त्यांचे अनुभव ऐकायला आवडतील.

चेस्ट स्ट्रॅप वाला मॉनिटर अधिक चांगला की रिस्ट बँडवाला?
पूर्वी माझ्याकडे चेस्ट स्ट्रॅप वाला (टायमेक्सचा) मॉनिटर होता. पण आता नवीन प्रकारचे बरेच रिस्टबँड्स बाजारात आलेत. हे कितपत रिलाएबल असतात?
शक्यतो भारतात मिळणारे (आणि अँड्रॉइड कम्पॅटिबल) ब्रँड्स सजेस्ट करावे ही नम्र विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एम आय बँड चेक कर सई. सर्वात स्वस्त पडेल. थोडा हाय एन्ड हवा असेल तर फिटबिट सर्ज. आता फास्ट ट्रॅक चे पण आलेत.
(एम आय यात वर्णभेद इश्यु होते असं माझी मैत्रिण म्हणते.आता ते फिक्स झालेत.नॉन व्हाईट लोकांचे हार्ट बिट डिटेक्ट व्हायचेच नाहीत म्हणे.(खरे खोटे गुगल करुन तपासावे लागेल.))
आता इश्यु फिक्स्ड आहेत.

व्यायाम करताना हवा आहे का? का स्टेशनरी? कारण बीपी मापक जे यंत्र येते त्यात हार्ट रेट आटोमाटीक येतो.
फिट बिट मध्ये ही सुविधा आहे माझ्यामते. माझे फिट बिट मोडले व आता घेणार नाही.

>>>व्यायाम करताना हवा आहे का? का स्टेशनरी?
दोन्ही. कारण रेस्टिंग हार्ट रेट सुद्धा फिटनेसमुळे सुधारतो.

शीर्षकावरून तुम्हाला केवळ हार्ट रेट मॉनिटर हवा आहे.. फिटनेस ट्रॅकर नाही असे गृहीत धरले.

मी स्वतः फिटबिट वर्सा वापरतो आणि अ‍ॅक्टिव लाईफ स्टाईल जगतो (आठवड्याला ५०-६० मैल रनिंग) पण माझ्या मते नुसते हार्ट रेट मॉनिटरिंग हे जास्त करून कंपिटिंग अ‍ॅथ्लिट्स, गोल सेट करून सिरियस वर्कआऊट करणारे किंवा पेशंटस ह्यांच्या साठीच अधिक ऊपयोगी आहे..

फिटबिट स्टेप काऊंटिंग, कॅलरीज, फिटनेस (हार्टरेट सहित), अ‍ॅक्टिविटी , स्लीप , कोचिंग, गोल सेटिंग, फूड, सोशल आसपेक्ट असे सगळे ट्रॅक करते त्यामुळे ओवरऑल फिटनेस ट्रॅकिंग साठी चांगले आहे.
तुम्हाला अ‍ॅक्टिविटी दरम्यान हार्टरेट फॅट बर्निंग, कार्डिओ, झोन ट्रेनिंग आणि पीक अश्या लेवल्स वर किती वेळ होतात आणि किती कॅलरीज बर्न झाल्या वगैरे माहिती हवी असेल तर ती फिटबिट मध्ये मिळते. हिस्ट्री आणि ट्रेंड अ‍ॅनालिसिस ही अ‍ॅप मध्ये दिसते. रेस्टिंग हार्ट रेटचीही हिस्ट्री आणि ट्रेंड अ‍ॅनालिसिस अ‍ॅप मध्ये दिसते.
फिटबिट (खासकरून वर्सा) अ‍ॅक्युरसी बद्दल (दोन महिन्यांच्या रिसर्च आणि वापराअंती) माझे मत अतिशयच चांगले आहे (९/१० मार्क्स).. तुम्हाला अनेक ब्लॉग ही सापडतील.

चेस्ट स्ट्रॅप रोजच्या वापरासाठी ईन्कन्वियंट वाटतात. रिस्ट बँड आणि चेस्ट स्ट्रॅप अ‍ॅक्युरसी मध्ये थोडा फार फरक पडू शकतो पण ते ही ऊपकराणातल्या टेक्नॉलॉजीवर अवलंबून असते.

पण मी आधी म्ह्णणालो तसे, कंपिटिंग अ‍ॅथ्लिट्स, गोल सेट करून सिरियस वर्कआऊट करणारे किंवा पेशंटस नसल्यास हार्ट रेट ची माहिती पहिले काही दिवस पोस्ट वर्कआऊट डिटेल्स म्हणून वाचायाला एनकरेजिंग वाटते.. पण थोड्याच दिवसात ती अवांतर वाटू लागते.
म्हणून ओवरऑल सगळीच माहिती देणारे फिटबिट सारखे एखादे ऊपकरण निवडावे.