मुंबई पाऊस - मदत / माहीती

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 29 August, 2017 - 09:45

२००५ सालचा जुलै महिना......
शेवटचा मंगळवार......
२६ तारीख......

कोणताही मुंबईकर आयुष्यात विसरु शकणार नाही असा दिवस

ज्या दिवशी पावसाने संपूर्ण मुंबई ठप्प करून दाखवली.
तथाकथित नालेसफाईचा 'पोल-खोल' केला.
कित्येक जीव आयुष्याला मुकले, तर कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले.

आज १२ वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे का???
योगायोग पहा!
आजही महिन्याचा शेवटचा मंगळवार आहे.
सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबापुरीची पार तुंबापुरी झाली आहे.

मायबोलीकरांना आजचे अनुभव 'शेअर' करता यावेत म्हणून हा धागा!!!

तळटीप : या धाग्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेवर कोणाचे राज्य आहे, कोण कसे चुकले आदी राजकीय चर्चा करू नये, ही 'नम्र' विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे आज एवढा पाऊस झाला..
ईथे कुठे पाणी साठत नाही. आणि कोरोनामुळे न्यूज चॅनेल बघत नसल्याने बातम्या काही कळतच नाहीत.
भरती आहे का सोबत. ती आली तर मिठीचा प्रॉब्लेम होतोच..

आज पण सुरु आहे पाउस. काल मला ऑफिसला जाता आले रिक्षा मिळाली दोन्ही वेळेला. जून महिन्याच्या रेन फॉल पैकी ४४% पाउस काल
झाला आहे. एम एम आर रीजन मध्ये चार दिवसात अति पावसाची शक्यता आहे असे आय एम डी ने सांगि तले आहे. अ‍ॅज पर टाइम्स हेडलाइन्स.
आमच्या इथे लेडीज दूर राहणार्‍या होत्या त्यांना तीन साडेतीन ला सोडले. मी पाचला निघाले.

Pages