मुंबई पाऊस - मदत / माहीती

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 29 August, 2017 - 09:45

२००५ सालचा जुलै महिना......
शेवटचा मंगळवार......
२६ तारीख......

कोणताही मुंबईकर आयुष्यात विसरु शकणार नाही असा दिवस

ज्या दिवशी पावसाने संपूर्ण मुंबई ठप्प करून दाखवली.
तथाकथित नालेसफाईचा 'पोल-खोल' केला.
कित्येक जीव आयुष्याला मुकले, तर कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले.

आज १२ वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे का???
योगायोग पहा!
आजही महिन्याचा शेवटचा मंगळवार आहे.
सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबापुरीची पार तुंबापुरी झाली आहे.

मायबोलीकरांना आजचे अनुभव 'शेअर' करता यावेत म्हणून हा धागा!!!

तळटीप : या धाग्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेवर कोणाचे राज्य आहे, कोण कसे चुकले आदी राजकीय चर्चा करू नये, ही 'नम्र' विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीव्ही 9 वर live बातम्या चालू आहेत. फोनद्वारे मदत करतायेत. बरेच मुंबईकर जागून मदत करतायेत. चहा पाणी खाणे रस्त्यावर वाटतायेत. ग्रेट खरंच मुंबई स्पिरीट.

सर्व सुरक्षित राहोत आणि लवकर घरी सुखरूप पोचूदेत.

सायन ते कुर्ला दरम्यान पाच गाड्या अडकलेल्या त्यातल्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढलं असं दाखवतायेत. शंभर रिपोर्टर्स टीव्ही 9 चे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत असं सांगतायेत. पाण्याचा निचरा पूर्ण झाल्याशिवाय ट्रेन्स चालू होणार नाही असं दाखवतायेत. फायर ब्रिग्रेड, पोलीस आणि सेन्ट्रल रेल्वे यांनी एकत्रित प्रयत्न करून लोकलमधल्या अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं.

http://m.maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/rain-la...

ठाण्यात तिन जण पावसामुळे गेल्याची बातमी आहे,
शक्यतो घराबाहेर निघणे टाळावे, कारण एकवेळ पाऊस जरी ओसरला तरी निचरा व्हायला अन सफाई व्हायला वेळ लागतोच.
तसेच साथीचे आजार व्हायची शक्यताही जास्त असते

२९ ऑगस्टला पडलेल्या पावसाप्रमाणेच आजही दुपारपासून मुसळधार पाउस पडत आहे. त्यामुळे लोकांना मदत व्हावी, या उद्देशाने हा धागा वर काढत आहे.

आज शाळां ना सुट्टी आहे. मी घरीच राहणार. ( कारण पा ठदुखी) काल जामच पाउस होता. रात्र भर प ड तोच आहे. बेसमेंट मधे पाणी भर भरून ओतत आहेत पाइप्स. आज काय होते बघायचे.

वॉव, आज रोजच्या पेक्षा अर्धा तास आधिच पोचले ऑफिसला

ट्रेन्स अगदी वेळेवर, नो ट्रॅफिक , अन वातावरण खुप छान

पण ऑफिसमध्ये १०% जनता आलीये, माझी टीम पन निम्म्याहुन जास्त गायब, एक जी विरार वरुन येणार होती तीला मीच सुट्टी दिली, तिचा बच्चु आहे छोटा.

आज तारेवरची कसरत असणारे ईतक्या कमी लोकात मॅनेज करताना, बघु कसे होते

पाऊस वाढला तर मात्र काहि खरे नाही

मी पण आले. आटो मिळाली. जे आले आहेत ते कॉशस आहेत. दुपारी लवकर सोडतात कि काय ते बघावे.

मध्य रेल्वेचे काहि अपडेट मिळाले तर इथे कळवा....म्हणजे काहि प्रॉब्लेम असेल तर लवकर निघता येईल.....

हो ना अमा, मी तर कधीच अशी संधी सोडत नाही, बाकी कितीही दांड्या मारा पण अश्या वेळेला आलेच पाहिजे असे माझे मत.

तसेही आज वातावरण खुप छान आहे ईकडे, आम्ही ही मस्त कांदाभजी अन कॉफीची पार्टी केली.

असो अवांतर होतेय ईथे... सॉरी

हो ना अमा, मी तर कधीच अशी संधी सोडत नाही, बाकी कितीही दांड्या मारा पण अश्या वेळेला आलेच पाहिजे>>>>>>> अगदी अगदी.

मी तर एक वाजताच निघाली, अन टिमला पण सोडले.
मज्जा म्हणजे आजच्या ईतका सुकर प्रवास क्वचितच होतो.

अन त्यात फक्त अर्धा दिवसच काम केले.

मी कल्याण डाऊन गाडीत आहे, आणि तेही रोज पकडतो त्याच गाडीत. No late. गाडी दणादण पळतेय. धमाल!!! दिव्याला पोहोचलोय. गाडीत नेहमी एवढीच गर्दी आहे. (म्हणजे रिकामी) ऑफिस लवकर सोडलेले अनोळखी लोकं जास्त दिसताहेत. डोंबिवली आलं. आता दहा मिनिटात कल्याण. मग आमचंही होईल कल्याण. Lol

How is today's situation. My wife is travelling to Mumbai from Delhi. Her flight from Delhi was on time. Is there heavy rains today also? She has to go to Worli.

No problem. No rain. Everything is fine and clear, today.

Thanks

भारतातील सर्वात जास्त पाउस पडणारे शहर 'चेरापुंजी' चा विक्रम मुंबईने मोडला आहे. येत्या १२ तासातही अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. म्हणून हा धागा वर काढत आहे.

खरंच??
काळजी घ्या लोकहो. जमेल तितकी मदत करा गरज असेल त्यांना.

आज कोणी शक्यतो निघु नका घराबाहेर. मी महत्वाची मिटींग होती म्हणुन सकाळी सहा वाजता निघालेली आता पोचले ऑफिसला अन ह्या पावसामुळे मिटींगपण रद्द.

सगळीकडे भरपुर पाणी साचलेय, ट्रॅफिक जॅम, ट्रेन - वेस्टर्न बंद, मरे अन हार्बर लेट , सो गरज नसेल तर निघुच नका

Pages