धक्का (शतशब्दकथा)

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 2 July, 2018 - 03:51

धक्का (शतशब्दकथा)

"अरे म्याडम चला लवकर...ट्रेन जाईल.." तो तिला धक्का देतंच गर्दीत दिसेनासा झाला ... पहिला दिवस
"चलो म्याम…….." दुसरा दिवस
"बाजू......Excuse" तिसरा दिवस
असाच पंधरवडा गेला.

अन ऑफिसमध्ये सोळाव्या दिवशी ...
“का रे असा काय फुगलायस?”
“धक्का बसलाय रे त्याला, सगळ्या जणींनी मिळून धुतला... आणि त्यात गेल्या आठवड्यात ऑफिसमध्ये हेल्पर म्हणून लागलेली ती पण होती ... हा घेतो तसा तिने पण चान्स घेतला”
"सांगत होतो लेका ... वेळीस सुधार. पण जित्याची खोड.. जा तोंड धुवून ये, काय विचार करतोयस ?"
"आजकालच्या पोरी जबरदस्त शिव्या देतात रे आणि हातात बांगड्या भरलेला हात पण मजबूत बसतो..."
गाल चोळत खाली मानेने तो डेस्कवर जाऊन बसला. कायमचा सुधारला.

..... ©मयुरी चवाथे-शिंदे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy
.असच पाहिजे अश्या लोकांना त्याशिवाय जागेवर येत नाहीत +१

कायमचा सुधारला.>>> असे माणसं ईतक्या सहजासहजी नाही सुधरत. (simply atonement or punishment is not sufficient, seed of the sin should be washed from the heart; and it's very very difficult.)

धन्यवाद मी चिन्मयी, प्रणिता जाधव, किल्ली.

पद्म - एकदम सायकिक नसणारे सुधारतात देखील ... समाजात लाज उरावी म्हणून