जो जे वांछील (शतशब्दकथा)

Submitted by स्वप्ना_राज on 30 June, 2018 - 09:49

निळ्या शर्टवाल्याचे वडिल भ्रमिष्ट झालेत. शालवाल्या बाईच्या नवर्याला ल्युकेमिया झालाय. ब्लॅक सूटवाल्याचा मुलगा ड्रग्ज घेतो.....

त्या मुलीने माझ्याकडे पाहिलंही नव्हतं तरी तिचे डोळे बघून मला वाटलं - एका माणसाला एव्हढं दु:ख असू शकतं? आधी माझा तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. पण तिने माझ्या डोळ्यात बघून जे सांगितलं ते फक्त मलाच माहित होतं.

मी म्हणालो 'हे मला जमलं तर किती लोकांना मदत करता येईल'.
'आणि श्रीमंत होता येईल, हो ना डॉक्टर?’

मी ओशाळलो.

तिने माझा हात हातात घेतला ‘तुमची खरंच तशी इच्छा आहे?’
‘हो'

आजकाल मी लोकांच्या नजरेला नजर द्यायचं टाळतो.
Be very careful what you wish for. You may just get it.
-----

वि.सू. कथेच्या शीर्षकात 'वांच्छील' असा जो शब्द आहे तो बरोबर लिहिलाय का? नसेल तर जरूर कळवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे.

शेवटाची ओळ वाचून THe monkeys paw कथेची आठवण झाली.

दोनदा वाचावी लागली मग समजली.
आतापर्यंतच्या तुमच्या शशक मध्ये ही सर्वात जास्त सरस वाटली मलातरी !
अजुन येऊद्यात Happy

आवडली.

===
दुसर्यांची दुःखं वाचण्याचं 'वरदान'(?) मिळालं आहे डॉक्टरला.

अ‍ॅमी, बरोबर Happy प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!!

साधना, Monkey's Paw वाचून शाळेत असताना जाम घाबरल्याचं आठवतंय. Happy पण त्या कथेशी ह्याचं साधर्म्य तुझ्या कॉमेंटनंतर लक्षात आलं.