Submitted by ..सिद्धी.. on 30 June, 2018 - 11:37
डोळ्यात अश्रू भरून आले
आठवणींनी मनात गर्दी केली
शब्दही गहिवरले
तु गेलास तेव्हा..
तो पहिला पाऊस
चिंब भिजवून गेला
तुझा पहिला स्पर्श
हलकीशी ओढ लावून गेला..
रोज रात्री झोपल्यावर
चेहेरा तुझा स्वप्नात येतो
येईन मी लवकरच
असं आश्वासन देऊन हसतो
खळी तुझ्या गालावरची
पुन्हा तुझ्या प्रेमात पाडते
ओठावरचं हसू तुझ्या
चांदण्याचा शिडकावा करते..
तुझा आवाज कानावर येताच
सकाळ माझी बहरून येते
प्रेमळ नजरेचा एकच कटाक्ष
न बोलताच सारं काही सांगतो...
तुझ्या परत येण्याने
सूर मला गवसला
मनात माझ्या प्रीतीने
जुईचा सुगंध पसरला.......
------- आदिसिद्धी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगदी छान जमलीय सिद्धू!!
अगदी छान जमलीय सिद्धू!!
मस्तच
मस्तच
मस्त
मस्त
छान जमलीय!
छान जमलीय!
धन्यवाद जुयु सायुताई परीताई
धन्यवाद जुयु सायुताई परीताई आणि अक्षयदादा
भारीच
भारीच
धन्यवाद पंडितजी
धन्यवाद पंडितजी
सो स्वीट!!!!
सो स्वीट!!!!
लय सुचू राहिल्या ग तुला कविता...
मला फारशी कळली नाही पण
मला फारशी कळली नाही पण वाचायला छान वाटली.
धन्यवाद मेघाताई आणि शालीकाका.
धन्यवाद मेघाताई आणि शालीकाका...