तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

आज शनिवार.. शाकाहारी जेवण .. बाहेरूनच ऑर्डर केलेले.. सोबत नेहमीप्रमाणे एक अख्खी बाटली बीअर प्यायलो
मीठ, मीरपूड टाकून Happy

जेव्हा माझी घ्यायची वेळ येईल तेव्हा वडिलांसोबत घेऊ किंवा तेच विचारतील असे वाटलेलं >>>
अगदी सेम. हसु आवरत नाहीए.

बाटली संपवण्याचे सोडा भरलेला ग्लास देखील संपेल असे वाटेना, हे असलं पिण्यासाठी लोक पैसे खरच खर्च करतात? >> +1 आम्ही बाथरूममधे फ्लश केली.

जेव्हा माझी घ्यायची वेळ येईल तेव्हा वडिलांसोबत घेऊ किंवा तेच विचारतील असे वाटलेलं >> असं वाटत बिटत बसायचं नाही. मी बाबांना म्हटलं मला चव घ्यायचीय. बाबांनी ओल्ड मॉंक चा ग्लास समोर केला थोडं पाणी घालून. मी एक चहाचा चमचा घेतला नी चव घेतली. ब्याक! म्हटलं हे तुम्ही एवढं चवीने पिता? मग उरलेली बाबांनी संपवली Happy

पण नंतर जेव्हा मित्रमैत्रिणीनबरोबर वोडका घेतली तेव्हा खूप आवडली

मी बाबांना म्हटलं मला चव घ्यायचीय. << +१
मग काकाच्या घरी आम्ही जमलेलो असताना बाबा आणि काकाने आपल्याबरोबर माझाही ग्लास भरला बियरचा.
काहीही वाईट लागले प्रकरण. चार घोट झाल्यावर उरलेला ग्लास उद्या मला केसाला लावायला ठेवा म्हणून बाजूला ठेवून दिला.

मग एकदा मित्रमंडळींच्याबरोबर ३१ डिसेंबरच्या पार्टितही हेच झाले. पिणार पिणार गाजावाजा करून माझ्यासाठी आणलेला स्ट्रोज चा कॅन चार घोटापलिकडे गेला नाहीच.

नंतर ग्रॅड स्कूलमधे व्हाइट वाइन ट्राय केली ती मात्र आवडली. मग व्हाइट झिन्फण्डेल आवडली. दस द सागा बिगॅन! Happy

मला आजतागायत वडिलांनी विचारले नाही, आणि आता त्यांना माहिती आहे तरीदेखील.

पहिल्या ओल्ड मंक चा किस्सा पण आठवतोय
हॉस्टेल मंडळींची चांगली दोस्ती झाल्यावर एके दिवशी बसायचा प्रोग्रॅम ठरला. मी बीयर प्रकरणी तोंड पोळून घेतल्याने फार उत्सुकता दाखवली नाही पण फार नखरेही केले नाहीत.
हॉस्टेल ब्रँड अर्थातच ओल्ड मंक आणि सोबत चखना म्हणजे सुकी भेळ, भरपूर कांदा आणि फरसाण आणि त्यावर लिंबू पिळून असली काय अद्भुत चव येत असे की तोड नाही.
तर अशा पद्धतीने मग बसलो तेव्हा थोडा बिचकत कारण पटाईत दोस्त मंडळी खाली पेपर अंथरून त्यावर भेळ ओतून आणि चड्डी बनियन या मोकळ्या धकळ्या वेशात सज्ज झाली.
चिअर्स च्या घोशात पहिला घोट घेतला आणि ते जळजळीत द्रव्य घशातुन खाली उतरले. कोक thumsup, बर्फ असले लाड नव्हतेच, त्यामुळे टिपिकल हॉस्टेल च्या प्लास्टिक जग मधून पाणी.
पण जिगरी मित्र मंडळी असली की मैफिल खुलते तसे हॉस्टेल मधल्या पार्ट्या कायम खुलायच्या. आणि बाकी मंडळी तावातावाने काहीतरी वैचारिक तात्विक किंवा सामाजिक चर्चा करत असताना माझे जे विमान उडाले की एक पेग मध्येच धरशायी.

नंतर मग किती भरावा,किती पाणी घातले की सोसते आणि दुसरे दिवशी त्रास होत नाही हे अनुभवातून शिकत गेलो.

नंतर मग किती भरावा,किती पाणी घातले की सोसते आणि दुसरे दिवशी त्रास होत नाही हे अनुभवातून शिकत गेलो.
<<
हेच.
माणूस आयुष्याच्या वेगवेगळ्या वेळी खाण्या अन पिण्याची वेगवेगळी पद्धत शिकतो.

उदा. नुसत्या शेपूची भाजी मी आजकाल आवडीने करून खातो. लसूण मिरचीची फोडणी दिलेला पाणीदार शेपू अन त्यात कुस्करलेली ज्वारीची गरमागरम भाकरी. मस्स्त! एरवी खानदेशात शोपालक मिळतो. म्हणजे शेपू अन पालक मिक्स. त्यातला शेपू निवडून काढून टाकायचा अन पालकाची भाजी व्हायची.

तसंच, प्यायची किती? तर सकाळी त्रास होणार नाही, डोके दुखतेय असे वाटणारही नाही इतकी. ९०-१२० मिली. बाऽस.

बाकी कीबोर्ड मिळाला तर लिहितो.

मला आधी ते शेपू वाचून वाटलं भाभु सुरू झाला
>>>>
सर मी शुद्ध मांसाहारी आहे. माझे नाव हव्या त्या ड्यू आयडीशी जोडा पण हे शेपू भिंडी पालकशी जोडू नका..
बाकी द आरूची चर्चा चालू द्या. मागे बहुधा मी माझा पहिल्या पिण्याचा अनुभव लिहिलेला. मिळाला तर उद्या लिंक शेअर करतो. शुभरात्री शब्बाखैर खुदाफिज !

व्होडका आणि सिट्रस काँबो मस्त लागतं,
स्मिर्नॉफ ग्रीन अ‍ॅपल व्होडका आणि थोडा सोडा + थोडा स्प्राईट (गोडसरपणा अ‍ॅडजस्ट करायला)
वॅनिला व्होडका + सोडा + लिम्का
शिवास असेल तर ऑन द रॉक्स, ग्लास क्यूब्स चिल्ड करून ते वापरले तर आणिक बेष्ट
ओल्ड मंक ओल्ड गूड वे- कोक, बर्फ आणि थोडं पाणी

घरात मोठा फ्लास्क असेल मेटल चा तर एकदम एक मोट्ठा जाम बनवून घ्यायचा आणि बाकी कामं करताकरता प्यायचा... मज्जानू ईव्ह. फ्लास्क असल्यानी बर्फ वितळणे, ड्रिंक कोमट होणे हे प्रकार नाहीतच Happy

जपानी लोकांची गोष्टच वेगळी ...
ते सुरूवात करतात बीअरनी. पण पिण्याचा स्पीड बघूनच गरगरायला लागते. अक्शरशः घटा घटा पितात राव हे . आपले जेमतेम ३-४ घोट होइस्तोवर यांचा मग रि का मा .... असे २-३ मग संपवून गडी व्हिस्कीला सुरूवात करणार.
४-५ लार्ज कुठे जात नाहीत .... भरपूर गप्पा , हसणे आणि कुठलाही डान्स चालू असेल तरी बिनधास्त सामील होतात...म्युझिकही कुठलेही चालते...
मग भूक लागल्यावर जेवायला बसणार .... पण परत बीअर किंवा पेग पाहिजेच तोंडी लावायला.
मग शेवटी निघायच्या आधी लिकिअरचे २-३ शॉट्स......
शेवटी चालताही येत नाही धड... पण एकदम लाइव्हली .. हसत खेळत आनंदी वावर !

हाय्ला!
या जपान्यांची लिव्हरं कशी काय टिकतात म्हणे?
राईस वाइन्स उर्फ साके भयंकर ष्ट्रांग असतात. पण मस्त अनुभव असतो.

मी आज एक घरगुती कॉकटेल केले
पुदिन्याची पाने किंचित खलून घेतली ग्लासात मग त्यावर बर्फ घातला फोडून, काकडीचे दोन काप घातले आणि व्होडका लार्ज, वर लिंबू पिळून लिम्का ने टॉप अप केले.
एक वेगळीच रिफ्रेशिंग गंमतशीर चव आली.

काकडी आणि पुदिना दोन्ही एकदम ताजे करकरीत पाहिजेत नाहीतर त्याचा एक विचित्र smell येतो.
आणि व्होडका प्लेन फ्लेवर, ग्रीन अँपल सुद्धा चालू शकेल
लिम्का स्ट्रॉंग वाटत असेल तर sprite पण चालेल पण ते मला फार गोडूस वाटतं.

धुतले?
त्या शिक्रणाच्या धाग्यावर हलवा ही बातमी. बोलीभाषेतून बातम्या.
येडपट लेकाचे

बघा नं Sad
काय हल्ली भाषा झालीय वार्ताहरांची सुद्धा !

च्यायला तीसनं काय फरक पडतोय, इथं मॅकडॉवेल्सची ट्रिपल एक्स रमची चपटी/क्वार्टर तशीच तोंडाला लावून पित असे मी. मजा यायची, थोडं जळजळायचं पण व्हॅनिला बेस्ड ती चव आवडायची चार लार्ज प्यायचे असले तर मी सरळ चार चपट्या माझ्यापुरत्या वेगळ्या विकत घेत असे, सोबत ड्राय चकना काहीच नाही फक्त भरपूर लिंबू पिळलेल्या काकडी, कांदा , टोमॅटो, तंदुरी चिकन, उकडलेली अंडी, फारतर मसाला पापड. एक चपटी घोट घोट करत खाली उतरवली की निवांत पाऊण तास शिस्तीत खाणे, परत तीन चपट्या हेच रिपीट.

आधी अशी पीत असे, आताशा बंद झालंय.

दारुचा (सोमरस) वापर वेद काळा पासून प्रचलित आहे. शैव पंथीयांनी तिला "शिवरस" म्हटले आहे. . . रतिक्रीडेत असणारा आनंद अधिक उत्कट आणि मुक्त व्हायला हवा. हा मुक्त आनंद अडथळ्याचे निवारण झाल्याशिवाय व्यक्त होऊ शकत नाही. त्यासाठी त्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग मदिरा हा आहे. याला शैव परंपरेत शिवरस असे म्हणतात. ही दारू कशी प्यावी? तर कुलार्णवतंत्र या ग्रंथात सांगितले आहे -

पीत्वा पीत्वा पुनः पीत्वा यावत् पतती भूतले।
उत्थाय च पुनः पीत्वा पुनर्जन्म म विद्यते।।
आनन्दात् तृप्यते देवी, मूर्च्छनाद् भैरवः स्वयम्।
वमनात् सर्वदेवश्च तस्मात् त्रिविधमाचरत्।।

म्हणजे दारू पुन्हा पुन्हा प्यावी, पीता पीता जमिनीवर पडावे, उठल्यावर पुन्हा प्यावी म्हणजे पुनर्जन्म संपतो. दारू पिताना आनंदस्थानी देवी, मुर्च्छास्थानी भैरव आणि वमनस्थानी सर्व देवता संतुष्ट होतात. हिच्या गंधमात्राने पापनाश होतो, स्पर्शमात्राने पुण्य मिळते कारण हा शिवरस आनंदाची अभिव्यक्ती करणारा आहे.

बीअर व्हिस्की रमवरुन फिरुन मज आवडते आता फक्त व्होडका. पूर्वी सोड्यात आता ज्युसमध्ये
१. ६० मिलि व्होडका + १०० मिली किनली सोडा (कोणताही फ्लेवर नसलेला सोडाच हवा) + त्यात दोन तीन बर्फाचे क्युब्स + एक मिर्ची उभी कापून सगळ्या बिया काढून टाकून स्टरर म्हणून फिरवायची ऑर एक इंच लांबीचा मिरचीचा तुकडा टाकून द्यायचा + एक चिमूट मीठ + ताज्या हिरव्या लिंबाचा रस दोन चार थेंब === हा प्रकार पूर्वी खूप प्यायचो. आता कंटाळा आलाय.

२. कॉकटेल्सः (तशी बरीच करत असतो -- सोबत दिलेलं एवढ्यात केलेलं) ६० मिलि स्मर्नॉफ (नॉट फ्लेवर्ड) + १०० मिली घरी तयार केलेला ताजा संत्र्याचा रस किंवा सफरचंदाचा रस + एका लिंबाचा रस + मिर्चीचा तुकडा आणि ग्लासच्या काठाला लिंबू फिरवुन त्या रसाला माफक चिकटवेलं रॉक साल्ट.

किल्ली - हा ऍड करा तुमच्या धाग्यात
>>>>
कश्याला च्रप्स मनोरंजनाच्या शोधात येणारयांना दारूचा रस्ता दाखवत आहात...

इथे बऱ्याच जणांनी हे सगळं वाचून "माझीही दारू प्यायची इच्छा होतेय" असं म्हटलंय.
इथेच मराठी माणूस मागे पडतो. हे सगळं वाचून दारूची डिमांड खूप आहे आणि त्यात विविध पद्धतीने सर्व्ह केली की लोकांना आवडते, मी आता मस्त बार काढणार, असं कुणीही म्हणालं नाही, "बार काढण्यास काय करावे" असा धागा कुणी काढला नाही.

Pages