छोल्याची भजी

Submitted by हसरी on 7 October, 2009 - 02:43

साहित्य

भिजलेले छोले १.वाटी , हिरव्या मिरची ३ (आवडीनुसार), मिठ (अंदाजे), आलं लसणाची पेस्ट (आवडीनुसार ), बेसन, तेल , सोडा , हळद

छोले ४-५ तास भिजवावेत

मिक्सर मध्ये छोल्याची भरड काढावी , मिरच्या वाटुन किंवा तुकडे करावे
भांड्यामध्ये छोल्याची भरड,मिरच्या, आलं लसणाची पेस्ट ,मिठ,हळद , सोडा घालावा बेसन पिठ आवश्कतेनुसार (भज्याचे पिठ करतो त्यानुसार) घ्यावे तेलाची मोहन घालावी तळुन काढावे

टिप : आपल्या आवडीनुसार धने-जिरे पुड किंवा ओवा घालु शकता

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users