कांदेपोहे

Submitted by राजेश्री on 25 June, 2018 - 11:28

कांदेपोहे

कांदेपोहे हा नाष्टा अर्थात न्ह्याहरीचा असा भारी प्रकार की सुवासिनी जस कुंकवाला आणि मर्द जस चहाला नाही म्हणत नाहीत (नाही म्हंटल की त्यांसनी खुळ्यात काढलं जात .तस कोणत्याही वेळी घरी आलेल्या पै(हे पै म्हणजे खिशात एकही पै नाही असं सांगून आपल्या दारात रिक्षा घेऊन येतात आणि आपल्या कडील पै पै रिक्षा वाल्याला देण्यात धन्यता मानत असतात) पाहुण्यांना आपण पोहे खाणार का अशी ऑफर केली की ते नाही खाणार अस म्हणत नाहीत.मग मला वाटत कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी त्यांना पोहे खाणार का अस विचारलं.मग मी स्वयंपाक घरात येऊन खास पाहुण्यांसाठी म्हणून तोंड वेंगाडून (पाहुण्यांच लक्ष नसताना.दाखवलं की मम्मी माझ्या दंडाला जोराचा चिमटा काढून मला डाफ्रत असते.तीच म्हणणं कोणत्या पाहुण्याच्या रूपाने घरी देवमाणूस येईल सांगता येत नसत.पण गेली कित्येक वर्षे इथं देव माणूस राहिला, आमच्या घरी आजतागायत देव आडनावाचा माणूसही आलेला नाही.एव्हाना रमेश देव येऊन गेले असते तरी चाललं असत ना,ते तरी आमच्या घरी का येतील म्हणा आमी साधी माणस.असो विषय भरकटतोय आणि तुम्ही आपलं वाचत जाताय माझं ठीक आहे(का ठीक आहे म्हणजे काय, मी म्हंटल ना माझं ठीक आहे तर ते ठीकच असणार ना ,तुम्हाला असंबंध अस काही वाचत जात असताना आपण वाचणार होतो काय आणि वाचायला लागलोय काय हे कळायला नको का.
तर विषय पोह्यांचा होता.त्या विषयाला आपल्याला दडप्या पोह्यांसारखं दडपता येत नाही.त्यामागून पाहुण्यांचा विषय कसा निघाला मला कळलं नाहीये.बर आता आणि एकदा विषय निघालाच आहे तर सांगते मला आमच्या घरी पाहुणे आले की आजिबात आवडत नाही.आतापासून नाही तर लहानपणापासून.चाळीत असताना लहानपणी आमच्या घरी पाहुणे आले की मी योगीताच्याईच्यात जाऊन बसायचे.मी त्यांच्या घरी गेले रे गेले की त्या प्रश्न विचारायच्या की,कोण पाहुणे आले? एकदा आमच्या घरी पाहुणे आले मी सरावाने योगीताच्या आईच्यात जाऊन बसले. मग योगिता म्हणाली अग मायडे आज तायडीचा पेपर,तुमची मम्मी गावाला गेलीय.आणि आलेल्या पाहुण्यांना तू तुमच्या घरात एकटंच कस काय सोडून येऊ शकतेस.मग कुठं मला डोक्यात प्रकाश पडला की , " आले पाहुणे जा योगीताकडे "या डोक्यातील प्रोग्रॅम मध्ये घरी कोण नसेल तर थांब घरात या कमांडची अपवाद म्हणूंन दुरुस्ती करून घेतली पाहिजे.असो.आपण पोह्यांना फोडणी घालत होतो.हे आपलं पोह्यांविषयी मी तुम्हाला सांगत होते.ते पुढच्या भागात सांगेन तूर्त एवढं वाचून वाट बघा.(क्रमशः)

©राजश्री

Group content visibility: 
Public - accessible to all site users

:D:D
मला आमच्या घरी पाहुणे आले की आजिबात आवडत नाही.आतापासून नाही तर लहानपणापासून. >> मलापण Proud

मला आमच्या घरी पाहुणे आले की आजिबात आवडत नाही.आतापासून नाही तर लहानपणापासून. >>>> मलापण, बरे वाटले वाचुन की माझ्यासारखे आहे अजुन कुणीतरी

तुमचे कंस )) पूर्ण करा.
बाकी सहमत. आमच्याकडे पोहेवाले नाही..डायरेक्ट जेवणाला येणारे पाहूणे खूप आहेत. ते ही अजिबात आगाऊ सूचना न देता. दत्त म्हणून उभे राहतात ना..तसे.

@चिन्मयी ,त्या कंसात smily होत्या
त्या इथे error दाखवतात
त्यामुळे कंस राहिलेले असणार