वेळ (शतशब्दकथा)

Submitted by स्वप्ना_राज on 24 June, 2018 - 02:52

'सुधीर, क्लायन्टला समजावायचं काम तुझं आहे.........ओह, हे, हॅलो, ये क्या कर रहे हो.....’

फोनवरचं बोलणं थांबवून पराग घाईघाईने गाडीतून उतरला. पण त्याच्या ओरडण्याचा त्या बाईवर यत्किंचितही परिणाम झाला नाही. हातातल्या वाटीत बोट बुडवून तिने कसल्यातरी राखाडी मिश्रणाचे आणखी दोन टिळे परागच्या बीएमडब्ल्युच्या बॉनेटवर ओढले आणि पुढे निघून गेली.

‘हॅलो पराग....’

समोरच्या दोन्ही बाईकवाल्यांनी एव्हाना त्यांच्या बाईक्सवर लावलेले पाचही टिळे पुसून टाकले होते. परागसुध्दा ग्लव्ह कंपार्टमेन्टमधलं फडकं काढायला कारमध्ये घुसला.

‘पराग?’
'यू वोन्ट बिलीव्ह इट. आत्ता एक बाई.....'

परागचे शब्द घश्यातच अडकले. ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलेला एक ट्रक त्याच्या कारजवळून प्रचंड वेगाने गेला आणि दोन्ही बाईकर्सना उडवून पुढे झाडाला जाऊन धडकला.

--

डिस्क्लेमरः अंधश्रध्दा पसरवण्याचा हेतू नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे.
मायबोलीवर शशक चा पाऊस.
भारी आहेत तुमच्या सगळ्या शशक

मस्त !!!!!
पसरल्या तर पसरू देत अंधश्रद्धा

मस्त !!!!!
पसरल्या तर पसरू देत अंधश्रद्धा >>>> अगदी

<<अंधश्रध्दा पसरवण्याचा हेतू नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.>>
तुमचा हेतू नसेल पण हीच गोष्ट पुढे करून आणखी अंधश्रद्धा पसरवून त्यावर विश्वास ठेवणारे अनेक लोक आहेत.

तात्पर्यः अश्यावेळी आपण त्या>> त्यावर विश्वास ठेवणारे अनेक <<लोकांवर विश्वास नाही ठेवायचा. हाकानाका.
त्यातून विश्वास ठेवला असे नुसते भासवायला त्यांचा अनुभव https://www.maayboli.com/node/66431 इथे द्यायला सांगायचं Light 1

<<अंधश्रध्दा पसरवण्याचा हेतू नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.>>
तुमचा हेतू नसेल पण हीच गोष्ट पुढे करून आणखी अंधश्रद्धा पसरवून त्यावर विश्वास ठेवणारे अनेक लोक आहेत. << आणि मग तीच गोष्ट whats app आली की माबो वरच अंधश्रद्धा धाग्यावरयेइइल Lol