माझी सायकल...

Submitted by राजेश्री on 24 June, 2018 - 10:35

माझी सायकल...
मी आहे म्हणून सायकल आहे असं होतं नाही.माझी सायकल शेजारचा भैय्या वापरतो.तो चालवतो म्हणून सायकल व्यवस्थित चालते अस आहे.मग कधी कधी मी चल आपण फिरून येऊ म्हंटल की माझी सायकल भैय्या मूळ सुस्थितीत असते.सायकल घेऊन तीनेक वर्षे झाली कुरकुर वैगेरे नाही करीत ती.तरीही एक वीस पंचवीस किमी जायचं तर टायर पंक्चर झालं तर काय घ्या म्हणून मग मी खिशात पन्नासेक रुपये आणि पाटीवर पाण्याची बाटली अडकवून सफारीला निघतो.सायकल आनंद देतेच पण सायकल पाय कुठं लिकेज वैगेरे नाही ना यातलं मर्म देते.उतार येते सायकल पळते. मन तर आधीच सुसाट पळलेले असते.चढ येतात मन थबकत,मन आणि सायकल दोहोंची कुरकुर एकत्र जाणवू लागते.एक हट्टी मन पायांना सायकल वरून खाली उतरू देत नाहीच.मग चढाच फळ मिळतो उतार म्हणत उतार येतो.सायकल चुंगत जाताना मन सुसाट सुटते.हात सोडले तर काय हुयील लयत लय म्हणत पहिल्या वेळी एक टाळी मारून बघण्याइतका हात सोडला जातो.मग दोन टाळ्या ,मग तीन टाळ्या मग सायकल थोडी लुडबुडते.टाळ्या वाजवायच बास करा नायतर कपाळमोक्ष झाल्यावर दुसरी टाळ्या वाजवत बसतील म्हणत आता डोळे आजूबाजूचा निसर्ग टिपू लागतात. डोळ्यांमागोमाग मन पोहचत आणि हात एक एक मिलियन डॉलर किंमतीचे निसर्गाचे कॅनव्हास कॅमेरात साठवून ठेवायला सरसावतात.
कित्येक अगणिक असे कॅनव्हास हिरवाईने नटलेला परिसर हवा या इथे उभा रहा,झाडे हवीत ही बघा इथे,पावसाच्या प्रतीक्षेत नांगरून ठेवलेलं शेत हे बघा इथे.हिरवा आनंद झाला का टिपून.मग हा बघा असाच अर्धवट कुणी कोणत्या कारणाने कापून ठेवलेला वृक्ष,या वृक्षाच्या हाकेच्या अंतरावर हिरवाईने नटलेले त्याचे बांधव आणि हा असा भुंडा कसा ,नेमकं काय झालं नाही माहीत.या दुःखाच्या कडाला फार डोईजड होऊन द्यायचं नसत निसर्गच शिकवतो हे कारण पुढे रान हिरवागार करायला खळखळ पाणी सोडलेलं असत आणि जमिनीतून खळाळून उसळणार पाणी बघून मनाच औदासिन्य पण खळाखळा धुऊन निघत असते.एक कडेला हे उसळत पाणी समोर हिरवागार शेत आणि मग शेताच्या कडेला राखणीला सज्ज असणारा डोंगर .या निसर्गात ही प्रत्येकाने आपापली कामे वाटून घेऊन किती शिस्तबद्ध चलनवलन सुरू असत नाही.जमीन आई आणि आभाळ पिता आई या हवा,पाणी,झाडे,वेली,पशु,पक्षी यांना अंगाखांद्यावर घेऊन जोजवते,वाढवते ,लक्ष ठेवते आणि आभाळ दुरून लक्ष ठेऊन मायेची पाखर घालत राहतो.
मी सायकल बद्दल बोलत होते,सायकल घेऊन गेल की माझी सायकल ही सजीव होते आणि निसर्गातील प्रत्येक गोष्ट ती माझ्यासमोर पुन्हा नव्याने उलघडत राहते.....

#सायक्लोथॉन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान

हात सोडून चालवायची चान्गलीच सवय झाली होती

एक दिवस उतरणीवर सायकल वेगात असताना पाय चाकाला लाऊन थाम्बवायला गेलो
सिनेस्टाइल उलटा पडलो Happy

( ब्रेक न मारता सायकलच्या चाकाला पाय लाऊन थाम्बवायची पण खोड लागली होती) Wink