ती रोजच्याप्रमाणेच आजही यांत्रिकतेने तिच्या कंपनीच्या संकुलात शिरली. शिस्तबद्ध रीतीने लावलेली झाडे, नेत्रसुखद रंगीबेरंगी उमललेली फुलं असणारी छोटेशी बाग, ह्यातून आत जाणाऱ्या रस्त्यावर ती वळली. बागेतून आलेल्या वाऱ्याच्या झुळकेसरशी ती आनंदली. सुगंध दरवळला तसा तिच्या चित्तवृत्ती उल्हसित झाल्या.
“म्हणजे तो इथेच बागेत आहे तर!” तिने अनुमान लावला.
आता तिची नजर भिरभिरत त्याला शोधू लागली. एका सुरंगी फुलांच्या ताटव्याजवळ तिला तो दिसला! त्याची ऐट, सतेज सोन्याप्रमाणे भासणारी कांती आणि तिची कळी खुलावी म्हणून सुगंधाची उधळण करणे हे सगळे पाहून ती भलतीच प्रभावित झाली. ती धडधडत्या अंतःकरणाने त्याच्या जवळ गेली.
हसतमुखाने स्वागत करणारा, तिचा दिवस आनंदाने समृद्ध करणारा तो, तोच होता!
सोनचाफा!
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
भारी लिहलय!
भारी लिहलय!
मस्त!
मस्त!
सोनचाफ्यावरुन माझ्या गावाकडील घराच्या अंगणातला हिरवा चाफा आठवला. आहा!
आत्मकथा म्हणता येईल हिला
आत्मकथा म्हणता येईल हिला खरं तर! आज सकाळीच सुचली.
धन्यवाद अक्षय दुधाळ , शाली
खूपच छान... चाफ्याचा मंद
खूपच छान... चाफ्याचा मंद सुगंध मलाही आवडतो.
धन्यवाद पवनपरी11
धन्यवाद पवनपरी11
सोनचाफा खुप छान लिहिलाय
सोनचाफा खुप छान लिहिलाय
आमच्याकड़े सोनचाफा कलमासोबत अजुन काही चाफा प्रकार आहेत. नागचाफा, हिरवाचाफा अन् कवठीचाफा (इकडचा आयडी नव्हे बर्र का )
धन्स अंबज्ञ
धन्स अंबज्ञ
नागचाफ्याचा वास खूप गोड असतो असं श्यामची आई मध्ये वाचलंय.
हिरवा चाफ्याचं ते गाणं माहित आहे, "लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का " आणि कवठीचाफा म्हणजे भूत आणि रहस्य कथा एवढच माहितेय !!
प्रत्यक्षात सुगंध नाही अनुभवला.
अरे वा किल्ली ताई मस्तच आहे
अरे वा किल्ली ताई मस्तच आहे ही पण शशक...
धन्स आदीसिद्धी
धन्स आदीसिद्धी
किल्लीताई छानेय हीही शशक.
किल्लीताई छानेय हीही शशक. भारीच आवडली! सोनचाफ्याचा बहर असतोच धुंद करणारा!
शब्द कमी पडले तर सोपं आहे की
धन्स जुई
छान लिहिलंय
छान लिहिलंय
धन्स सायुरी
धन्स सायुरी
खूप सुंदर किल्ली.
खूप सुंदर किल्ली.
व्वा !!! मस्त
व्वा !!! मस्त
अहाहा! मस्तच आहे कथा.. आवडली.
अहाहा! मस्तच आहे कथा..
आवडली.
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
छानच
छानच
धन्स सामो, प्रसन्न, देवकी,
धन्स सामो, प्रसन्न, देवकी, मन्या ऽ , समांतर
किल्ली..छानच आहे श श क ....
किल्ली..छानच आहे श श क .... मलाही चा सुगंध खूप आवडतो