दिवाळी अंक २००९ - घोषणा

Submitted by संपादक on 29 July, 2009 - 15:22

final_ad2.gif

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपलोडींगची अडचण इतक्या तांतडीने सोडवल्याबद्दल धन्यवाद; कार्य्क्षमतेचं कौतुक.

भाऊ, धन्यवाद. Happy

गिरीराज, बर्‍याच लोकांनी मुदत वाढवून देण्याबद्दल विनंती केल्यामुळे ('खास लोकाग्रहास्तव' Happy ) साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख आता २० सप्टेंबर (अमेरिकन ESTनुसार मध्यरात्री बारा)पर्यंत वाढवून देण्यात येत आहे. Happy

मात्र, ही मुदतवाढ अंतिम असेल. २० तारखेनंतर आलेलं साहित्य स्वीकारता येणार नाही.

तुम्ही कितीही वेळा वाढवल्यात तरी लोकं शेवटच्या दिवशीच हाती पेन-पेपर घेउन बसणार Proud म्हणजे मी कसा आज बसणार होतो लिहायला पण आता २० तारखेल Proud

२० तारीख का? आयला, नशिब जोरावर आहे म्हणायचे! Happy बघू, प्रयत्न करतो!
मूड लागला तर तासाभरात लिहून होईल, पण गेले काही दिवस मूडच गायब आहे! Sad काय करू? कोणतरी विषय सुचवा ना रे! ज्योतिष सोडून काहीही सुचवा! Happy

मी कांही व्यंगचित्र पाठवली आहेत. पण कोणती आपल्याकडे पोचली हे न समजल्याने, काही दोनदा
आपल्याकडे आली असतील. माझा हा वेंधळेपणा प्लीज सांभाळून घ्या.
- भाऊ नमसकर

संपादक महोदय!
लई धन्यवाद! तुम्ही मला दिवाळीसाठी उघडलेल्या चारही धाग्यावर सुतकताई करायला लावणार असे दिसतेय! Happy

हे सकाळी लिव्हले असते तर आज आयुष्यावर बोलु काही... चा प्रयोग अजुण मजेने बघता आला असता! निम्मे लक्ष अर्धवट लेखा कडेच लागुण राहिले होते ना! Happy

मुदत वाढविल्याबद्दल धन्यवाद. Happy
मुखपृष्ठावर मात्र अजूनही १२ सप्टेंबर हीच तारीख दिसते आहे. तिकडे कृपया बघावे. Happy

साजिरा, लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. Happy
अ‍ॅडमिन लवकरच बदलतील ते.

मग आता वाढीव मुदत लक्षात घेता तुम्ही लिहिणार ना? Happy

संपादक महोदय,
मी ११/०९/२००९ र्रोजी 'रजा' ही कथा पाठवली होती. ती आपल्याकडे पोचली की नाही हे समजल्यास मला
ती पुन्हा पाठवावी लागणार नाही. त्रास दिल्याबद्दल क्षमस्व,
निवास

अ‍ॅडमिन/ संपादक......
मी लेखन करित असताना, शेवटी, टिजर ब्रेक म्हंजे पॅराग्राफ तयार करण्याची सुविधा आहे कि काय हे तपासत असताना, माझा लेख दिसेनासा झाला. त्या अगोदर पुर्ण लेख मी सेव केला होता. पण सुपुर्त केला नव्हता. अन आता तो दिसत नाही. फक्त एकच पॅरा दिसतोय...... त्या तिजर ब्रेक ने जिथे ब्रेक केले तिथुन पुढचे काहीच दिसत नाही.

कृपया तो जर तुमच्या कडे सर्वर वर असेल तर मला देउ शकाल काय. अन्यथा माझा लेख पुन्हा लिहिणे अवघड आहे. कारण मी तो इतर कुठे ही सेव केला नव्हता......!

हेल्प प्लीज!

संपादक,

mee maaybolivar diwaliankanchya sahitya madhe ek katha lihit hote. tee apoorn aase mhanun mee save keli aani aata punha mala te sampaadit karayache aahe tar kuthe access karayache ka navyaane suruvaat karayachi? Please lavakar kalava kaaran mala katha purna karayachee aahe deadline chya aadhi.:)

पर्नु, अपूर्ण म्हणून सेव्ह केली असेल तर पुन्हा नवीन लेखन वर क्लिक करा.. मग दिवाळी अंक लेखन वर क्लिक करा.. डाव्या बाजूला माझे सदस्यत्व असा दुवा दिसेल. त्यावर क्लिक करा. तुम्हाला तुमची अपूर्ण कलाकृती तिथे पाहता येईल.

पर्णू, आपल्याला उत्तर द्यायला उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. आपल्या कथेची सुधारित आवृत्ती मिळाली आहे.

शंतनू, धन्यवाद. Happy

मी कथा आज पाठवली आहे.......... चालेल का दिवाळीसाठी? Sad

उशीरा पाठवल्या बद्दल क्षमस्व
माझ्या कवितेचे काय झाले ते कळल्यास आजन्म उपक्रूत राहिन

प्रिय संपादक,
दिवाळी अंकासाठीच्या लेखनासंबंधीची लिंक अद्यापिही कार्यान्वित असल्यामुळे मी आज एक नवीन कविता दिली आहे. तिचा अंकामधे समावेश होऊ शकेल का ते कळल्यास बरे होईल. धन्यवाद.
-मुकुंद कर्णिक

उशीरा पाठवल्या बद्दल क्षमस्व
माझ्या कवितेचे काय झाले ते कळल्यास आजन्म उपक्रूत राहिन >>>> Lol शुध्दलेखन तपासून पाठवली नव्हती का कविता??

अंक निघायची येळ झाली, अजून जाह्यरातींचा पत्त्या न्हाय..
काम चाललंय जनू.. मसुदा घिऊनशान चाललोय..
आता कसचं काम करतायसा, टाका म्हनावं भरारा जाह्यराती, आन हिकडं टाकूया त्यो मसुदा तसाच
हाय काय अन् न्हाय काय..

masuda111.jpgmasuda22.jpg

Pages