वाळवंट

Submitted by धनुर्धर on 20 June, 2018 - 08:58

राखेच्या खाली तापतात निखारे
पाठीमागे जेव्हा बोलतात सारे
आपलाच कोणी असा वार देतो
उधळून स्वप्ने लावतात वारे

खंत कशाला आता दुःखांची
सुखेही झाली हिरमूसलेली
ओढून पाय चालतोच आहे
वाट ही माझ्यावरी रूसलेली

शरीरात या जरी प्राण आहे
मनात वादळ हैराण आहे
मृगजळ जरी दूरून वाटे
वाळवंट माझे वैराण आहे

..........धर्नुधर........

Group content visibility: 
Use group defaults